मोकळा श्वास | Relaxing

घे मोकळा श्वास.. आहे तुझ्या पंखात बळ दे स्वतःला विश्वास.(relaxing)

खूप झटलीस घरासाठी स्वतःसाठी जगून बघ.. मुलां नातवांसाठी खूप केलस स्वतःसाठी काही करून बघ.

अजून खूप दिवस आहेत असं म्हणून टाळू नकोस

सूर्य चाललाय अस्ताला नजर जरा उचलून बघ.

स्वच्छंद जगण्यासाठी पैसा लागत नसतो….कितीही कर घरासाठी त्याचा हिशोब लागत नसतो.

आहेस तू कर्तुत्ववान दे स्वतःला ग्वाही… स्वच्छंद जगण्यासाठी नाती तोडावी लागत नाही.

जे जे आहेत तुझे छंद.. पूर्ण तर करून बघ. घरचेही देतील साथ तुला… त्यांना विश्वासात तर घेऊन बघ.

@सीमाशंकर

Leave a Comment