आठवण आपल्या माणसांची | Homesick

खरं तर आजचा विषय थोडा वेगळा आहे आठवण आपल्या माणसांची (homesick)

परवा माझी शाळेतील मैत्रीण आणि मी ,आम्ही दोघीजणी फोनवर गप्पा मारत होतो. बोलता बोलता सहज तिने मला विचारले “होय ग ते पिच्चर मध्ये दाखवतात परदेशात गेल्यावर इकडे तुमच्या आई-वडिलांचे खूप हाल होतात आणि तुम्ही तिकडे खूप मज्जा करता पण मी बघते तुमच्या बाबतीत असे काहीच नाही मग पिक्चर मध्ये असे का दाखवतात?

खरंतर मी तिला तात्पुरते उत्तर दिले. पण फोन ठेवल्यानंतर मी ही विचार करायला लागले पिक्चर मुळे इंडियातील लोकांचा आपली माणसे तिकडे गेल्यावर कशी वागतात याचा खूप मोठा गैरसमज करून ठेवलेला आहे. आहेत तशीही लोक आहेत पण ती किती पाच टक्के बाकीच्या 95 टक्के लोकांना त्या पाच टक्के लोकांमुळे नाहक बदनाम केले जात आहे आणि तसेही भारतात राहूनही किती मुले आई वडिलांची सतत सेवा करत आहेत?

नोकरीमुळे पुणे मुंबई गाठलेली कितीतरी कुटुंबे आहेत वर्षानुवर्ष आई-वडिलांना भेटत नाहीत मग याचा अर्थ असा होतो का कीं ते आई-वडिलांची सेवा किंवा आई-वडिलांची काळजी करत नाहीत? आम्ही परदेशात जरी असलो तरी प्रत्येक क्षणी आम्हाला घरच्यांची आठवण होत असते. आज काय भाजी केली भेंडीची सासुबाईंना भेंडीची भाजी किती आवडते हे जेवताना एकदा तरी म्हणल्याशिवाय राहत नाही. खीर केली की भाऊजींना माझ्या हातचे किती खीर आवडते हेही आठवल्याशिवाय राहत नाही. आमची आई याची भाजी छान करते माझ्या भावाला याची भाजी अजिबात आवडत नाही हे सतत आठवत राहते.

खरंतर या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. इतक्या छोट्या छोट्या गोष्टींची आम्हाला आठवण येते तर आई-वडिलांना आम्ही कसे विसरू?

आम्ही इकडे आजारी पडतो पण चुकूनही कधी सासू सासरे आणि आई-वडिलांना सांगत नाही की आम्ही आजारी आहोत का तर ते काळजी करतील. दररोज संध्याकाळी कामावरून आल्यानंतर कधी एकदा घरच्यांशी बोलतोय असं होते. त्यात सणवार आले की आपण तिथे असायला पाहिजे होतो असे नेहमी वाटत राहते.

तुम्ही काय बाबा आता तिकडचे झाले तुम्ही काय आता पैसेवाले जरा आई-वडिलांकडे पण लक्ष देत जा असे सर्रास टोमणे मारले जातात पण आपला मुलगा किंवा मुलगी आपल्यासाठी काय आहे आणि काय करतात हे फक्त परदेशात ज्यांची मुले राहतात त्यांच्याच आई-वडिलांनाच माहीत असते. बरं हे बोलतात कोण तर ज्यांना परदेशात जायचे असते पण जाता येत नाही काही कारणाने असे लोकं.कीव येते अशा लोकांची.

परदेशात जाऊन मुले जेव्हा प्रगती करतात. त्यां प्रगतीमागे रक्ताचे पानी केलेले असते. कशासाठी तर आपले आईवडील बहीणभाऊ सुखाने रहावे यासाठी आणि त्यांचे सगळे व्यवस्थित झाल्यानंतर ते इकडे स्वतःचा विचार करतात हे पिच्चर मध्ये थोडे दाखवणार आणि आई वडिलांचे कसे हाल करतात हे जास्त दाखवणार.5%परदेशात आलेले लोक अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतात आणि त्यांच्या मुळे चुकीचा गैरसमज पसरला जातो.मनापासून सांगते प्रत्येक परदेशी असलेला मुला….मुली ची डोळ्याची एक कड कायमच पानावलेली असते आपल्या घरच्यांच्या आठवणीनी. सतत मायेच्या स्पर्शासाठी आसुसलेले असतात.

कधी एकदा सुट्ट्यांसाठी भारतात येतो असे आम्हाला होत असते. जेव्हा सर्व बॅगा भरून आम्ही एअरपोर्टवर जातो भारतात येण्यासाठी तेव्हा आमच्या चेहऱ्यावरला आनंद जगातील सगळ्यात मोठा आनंद असतो. पण हे कधी चित्रपटांमध्ये दाखवले जात नाही.

Leave a Comment