आयुष्य गेलं निम्मं नाही कळलं मला… आवड होती खूप पण जपल्या नाही मी कला. (Live for yourself)
जबाबदारी आणि कर्तव्य यांना मुळी मी दोष देतच नाही… तेव्हा खूप काही करायचे होते पण गेलेली वेळ परत येत नाही.
प्रतिष्ठा आणि नावाच्या पांघरुणा खाली झाकून घेतले स्वतःला… ते पांघरून काढून फेकून दिले तेव्हा ओळखू लागले माझीच मी मला.
प्रेम माया काळजीचे वेल माझे चारी बाजूला फोफावले… त्या नादात मात्र मी माझ्याच श्वासांवर प्रेम करायची विसरले.
वेळ अजूनही गेली नाही सावरेन म्हणते स्वतःला… स्वतःवरती खूप प्रेम मि करेल हे सांगेल माझ्या प्रत्येक श्वासाला.