जाग्या व्हा मैत्रिणींनो आयुष्याचा निम्मा टप्पा संपला….(a statue of sacrifice)
एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला.
करा तुमची बकेट लिस्ट पूर्ण नका ठेऊ मनात काही..
तुम्हाला वाटते तुम्हीच आहे सर्व काही…
पण एक लक्षात ठेवा तुम्ही गेलात तरी तुमच्या वाचून काहीही अडत नाही.
किती आम्ही घर स्वच्छ आरशासारखे ठेवतो नका दाखवू जगाला
चार पैसे दिले तर तुमच्या पेक्षाही जास्त घर स्वच्छ ठेवतील असेही सापडतील त्यांना.
किती आम्ही काम करतो पाय आपटून सांगता तुम्ही घराला,
तुम्ही किती झिजलात तरी नाही फरक पडत कुणाला.
अजूनही वेळ गेलेली नाही सावरा जरा स्वतःला,
तुमच्यातला तिरसटपणा कुठून आला लागा आता शोधायला.
आजचा दिवस शेवटचा आहे असं म्हणून जगा
जगणं किती सुंदर होईल मग तुम्ही बघा.
घर संसार जॉब करता करता विसरू नका स्वतःला,
आहेस तू किती मौल्यवान हे कळू द्या जगाला.
त्यागाची मूर्ती म्हणून ठेवतील तुम्हाला काही दिवस मखरात.. कौतुकाचा हारही घालतील गळ्यात,
पण एक लक्षात ठेवा त्याबदल्यात तुमचे पंख ही छाटतील नाही उडून देणार तुम्हाला आभाळात.
द्या फेकून त्यागाचे टॅग.. घ्या उंच भरारी
मग बघा तुमच आयुष्य कसे घेईल उभारी.