मीच माझ्या रूपाची राणी ग…. | Feel like a Queen

Feel yourself like a Queen .सुंदर….. ह्या शब्दाचा अर्थ खरंतर आजच्या काळात फक्त चेहऱ्यावरील सौंदर्य, चेहरा पूर्ण प्लेन असणे चेहऱ्यावर अजिबात डाग नसणे …स्लिम ट्रिम, गोरेपणा ह्या निकषावर मोजले जाते.

मी आत्ता भारतात आले होते तेव्हा टीव्हीवर एक जाहिरात यायची.. नीट आठवत नाही जाहिरात कोणत्या साबणाची होती… पण त्यात असे होते की ती मुलगी आईचा फोटो… सोशल मीडियावर डाऊनलोड करते आणि तिच्या फोटोला खूप व्ह्यूज मिळतात. तेव्हा ती म्हणते मी तर मेकअप करून फोटो टाकला नाही मग एवढे व्ह्यूज कुठून आले.. तेव्हा ती मुलगी म्हणते. तु make up न करता ही खूप सुंदर दिसतेस. आणि जेव्हा तिच्या आईला जाहिरातीमध्ये दाखवली जाते…. खरंच ती बिना मेकअपचे असते का आता ह्या जाहिरातीवर हसावे कि रडावे तेच कळेना.
बऱ्याच जाहिरातीमध्ये मुलीला जेव्हा शाळेत आईस सोडवायला जाते. तेव्हा शहरातील एकदम सुंदर आणि छान अशी आई दाखवली जाते. काय तर म्हणे संतूर mum….का बरं गावाकडची आई काही आई नसते का मग गावाकडच्या आईवर एखादी जाहिरात काढली तर काय हरकत आहे. असे मला खूपदा वाटून जाते.
सौंदर्य म्हणजे काय.. तिला विचारा जी पहाटे पाच वाजता उठून
गुराढोरांचे शेण काढून…. पंधरा-वीस माणसांचा स्वयंपाक करून… सगळे धुणे भांडे उरकून घर लख्ख करून… अकरा वाजता शेतातील कामाला हजर होते. तरीही तिच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद आणि हास्य असते.
संध्याकाळी सहा वाजता येऊन परत सगळ्यांचा स्वयंपाक भांडी घर लख्ख करून हसऱ्या चेहऱ्याने सगळ्यांची अंथरूने पांघरूणे देऊन… समाधानाने जी पाठण जमिनीवर टेकवते.

तिच्या चेहऱ्यावर आलेल्या प्रत्येक काळ्या डागात तिने गाळलेल्या घामाचे गुलाब फुललेले असतात. पायाच्या टाचेला पडलेल्या भेगांमध्ये घराच्या एकजुटीचे प्रयत्न असतात. तिच्या चरभरीत हातांमध्ये घरासाठी पाहिलेली मऊ मऊ स्वप्ने असतात. डोळ्यांनी खालच्या वर्तुळांमध्ये… समाधानाने भरलेली रांजणे असतात.

अशी ह्या माझ्या गावाकडच्या … मैत्रिणीनसाठी आणि त्यांच्यातल्या प्रत्येक मैत्रिणीसाठी मीच माझ्या रूपाची राणी ग… हे तंतोतंत लागू पडते .

मैत्रिणींनो सौंदर्य हे चेहऱ्यावर आणि शरीरावर मोजले जात नाही.. ते पाहिले जाते ते तुमच्याकडे आत्मविश्वास किती आहे. आपण कसेही असो. फक्त आत्मविश्वास आपल्याकडे असने म्हणजे आपण निम्मे जग जिंकल्यासारखे आहे.
आपण जे आहोत जसे आहोत ते आत्मविश्वासाने जगासमोर मांडायला शिका. निर्भीडपणे बाहेर पडा. मग बघा मीच माझ्या रूपाची राणी ग… ह्या गाण्याची धून.. आपोआप डोक्यात वाजायला लागेल.

Leave a Comment