“बघा ना ताई मी तिला इतका जीव लावला बहिणीसारखा आणि शेवटी ती माझ्या दुसऱ्या मैत्रीणीला सांगते की मी अशी आहे.तशी आहे. “misunderstanding in friendship हो की नाही?
आहे की नाही हा कॉमन विषय मैत्रिणींनो……
आपल्या शेजारी, समोर बिल्डिंगमध्ये मुलांना शाळेत सोडायला आणायला जाताना झालेली मैत्री किंवा अशीच अचानक भेटलेली आणि खूप जवळची झालेली मैत्रीण. काही दिवसांनी आपल्याला खूप जवळची वाटू लागते नव्हे अगदी जीव की प्राण वाटू लागते ती आपल्याला खूप जीव लावते आपणही तिला खूप जीव लावतो. सुखदुःखात दोघीही एकमेकांच्या उपयोगाला येतात. दोघींचे एकमेकींशिवाय पानही ढळत नाही. बाकीच्या बायकांना मत्सर वाटावा इतक छान सगळं चाललेले असते. आणि अचानक दोघी एकमेकींबरोबर बोलायच्या बंद होतात. एकमेकांचे तोंडही पाहत नाहीत. बाकीच्या मैत्रिणींना प्रश्न पडतो नक्की झाले काय. मग प्रत्येक जण आपापल्या डोक्यात येईल तो ग्रहमान आणि एकाचे दोन करून आजूबाजूला ते पसरवले जाते. तर महत्त्वाचा मुद्दा आहे नक्की दोन मैत्रिणींमध्ये दुरावा का येतो?
सगळं छान चाललेले असताना कोणीतरी एकीला जाऊन सांगते अग ती तुझ्याविषयी अस बोलत होती व दुसरीला ही सेम तेच जाऊन सांगते आणि दोघीही हाच ग्रह डोक्यात धरून एकमेकांशी बोलायचं बंद होतात. कितपत योग्य आहे हे मैत्रिणींनो? इतक्या दिवसाची तुमची मैत्री कुणाच्यातरी सांगण्यावरून तुटू शकते? खूप ठिकाणी मी हे पाहिले आहे अनुभवले सुद्धा आहे. मैत्रिणींनो जेव्हा एखादी मैत्रीण आपल्याला जीव लावते अगदी रक्ताच्या नात्यांपेक्षा जास्त तुम्ही आजारी असता तेव्हा तुमची देखभाल करते तुम्हाला डबा देते तुमच्या मुलांना शाळेत डबा देते तुमची सारखी विचारपूस करते हे सगळे तुम्ही कसे विसरता जेव्हा कोणीतरी तिच्याबद्दल तुम्हाला येऊन काहीतरी सांगते.
चला मी म्हणते ती म्हणली असेल कोणाजवळ काहीतरी तुमच्याबद्दल तिने शंभर वेळा दाखवलेले चांगले गुण तुम्ही लक्षात ठेवाल कि एक दुर्गुण लक्षात ठेवाल?आहे ना विचार करण्यासारखी गोष्ट. शंभर चांगल्या गोष्टी पुढे तिने चार-पाच वाईट केलेल्या गोष्टी आपण दुर्लक्षित करू शकत नाही का?किंवा समोरासमोर बसून डायरेक्ट हा विषय तुम्ही सॉल्व करू शकता पण नाही आपण तिसऱ्या मैत्रिणींनी वाईट सांगितलेली गोष्ट मात्र लक्षात ठेवून उगीचच एकमेकांवर रुसून बसतो.
मग त्याला पुढे इगो चे स्वरूप येते. दोन चांगल्या मैत्रिणी झाल्यामुळे दोन चांगले घरेही जोडली जात होती तीही आपोआपच विखुरली जातात. मग त्यांच्या मुलांना प्रश्न पडतो आई मावशी बरोबर बोलायची बंद का झाली. मैत्रिणींनो द्या सोडून… रागाच्या भरात आपण काहीतरी बोलून जातो तीही काही तरी बोलून जाते. म्हणून आपण एका ताटात जेवलेले सुखदुःखात सहभागी झालो होतो ते सगळे विसरून जायचे का? बरं आपण न बोलून हा मुद्दा सॉल्व होतो का? नाही उलट आपण तो मुद्दा मनात धरून ठेवतो याचा आपल्यालाही त्रास होतो आणि त्या मैत्रिणीलाही त्रास होतो. समोरासमोर बसून एकमेकांची माफी मागून पुढचे आयुष्य सुंदर होऊ शकते. पटायला थोडंसं अवघड वाटेल पण करून पहाल तर खूप सोपे वाटेल.
मैत्री ही आयुष्यातील खूप सुंदर गोष्ट आहे अगदी सुगंधी कुपिसारखी जितकी समजून उमजून जपून ठेवाल तितकीच ती बहरते आणि सुगंधही देते.
Agadir barobar ..halli asach hotly…ani mag Kuni don Paule mage hatat nahi nahi pudhehi jaat nahi…ek sunder naate…Kuna tisaryachya jalfalatamule dhumsat rahate…..