ऑस्ट्रेलियामध्ये येण्याची योग्य पद्धत |How to get Australian visa?

ऑस्ट्रेलियामध्ये जॉब साठी आणि फिरण्यासाठी कसे यायचे हा प्रश्न मला नेहमी विचारला जातो. How to get Australian visa?

जेव्हा जेव्हा मी भारतात येते किंवा भारतातून बरेच जण फोन करूनही हा प्रश्न विचारतात. बऱ्याच जणांचा असाही गैरसमज आहे की आपलं कुणीतरी परदेशात असेल तर आपल्यालाही भारतातून अगदी सहज जॉब मिळतो. किंवा कोणी नातेवाईक असेल, मित्र असेल तर तुमच्या ओळखीवर आम्हाला तिकडे घेऊन चला असेही म्हणतात.

खरंच इतके सोपे आहे का ऑस्ट्रेलियामध्ये येणे? अजिबात नाही. पहिली गोष्ट म्हणजे ओळखीवर ऑस्ट्रेलियामध्ये जॉब मिळतो किंवा ऑस्ट्रेलियामध्ये राहता येते हा लोकांचा खूप मोठा गैरसमज आहे. तुम्हाला काही दिवसांपुरते फिरायला यायचे असेल तर ते सहज शक्य आहे पण त्याच्याही काही अटी आणि नियम आहेत. पण अशक्य अजिबात नाही.

तुम्ही फिरायला कधीही येऊ शकता. त्यासाठी आपल्याला एक स्पेशल व्हिजा दिला जातो त्याला visitor visa असे म्हणतात. जर तुमचा मुलगा किंवा मुलगी परदेशात असेल तर त्यांना स्पेशल व्हिजा दिला जातो त्या visa चा कालावधी एक वर्षापासून ते तीन वर्षापर्यंत असतो. हे नियम थोड्या थोड्या कालावधीनंतर थोडेसे बदलले जातात. तर आता मूळ मुद्दा असा आहे की ऑस्ट्रेलियामध्ये येण्याची योग्य पद्धत कोणती?

तुम्ही भारतात जर डॉक्टर, रजिस्टर्ड नर्स, वेल्डर, मशिनिस्ट, इलेक्ट्रिशियन, मोटर मेकॅनिक, एअर कंडिशन मेकॅनिक, हॉटेल मॅनेजमेंट किंवा वेगवेगळे ट्रेड पर्सन असाल आणि तुम्हाला ऑस्ट्रेलियामध्ये येण्याची इच्छा असेल तर ऑस्ट्रेलियन एक वेबसाईट असते त्याच्यावर तुम्ही तुमचं स्किल( शिक्षण आणि अनुभव )ऑस्ट्रेलियामध्ये पाठवायचे. ते स्किल जर यांना हवे असेल किंवा त्या स्किलच्या लोकांची जर ऑस्ट्रेलियामध्ये गरज असेल तर ते तुम्हाला TRA ( Tread recognition Australia ) पाठवतात.. आणि हे लेटर ऑस्ट्रेलिया गव्हर्मेंट च्या इमिग्रेशन ऑफिस मधूनच येते. सर्वसाधारण वयाच्या 42 ते 44 च्या आतच visa मिळू शकतो.

स्वतः अँप्लिकेशन केल्यावर पैसे वाचतात पण तुम्हाला त्याची बरीच माहिती काढावी लागते आणि योग्य पद्धतीने काम करावे लागते नाहीतर visa रिजेक्ट किंवा उशिरा येऊ शकतो.दुसरी पद्धत म्हणजे आपल्याकडे ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड ची visa प्रोसेस करून देणारे एजेंट असतात. त्यांना सगळे नियम, कागदपत्रे यांची माहिती असतें ते आपल्यासाठी visa appliction चे काम करतात आणि योग्य मार्गदर्शनही करतात पण त्यांची फी तुम्हाला द्यावी लागते. एजेंट निवडताना कमीतकमी 10-12 वर्ष त्या क्षेत्रात काम करणारा असावा आणि आधी कोणाची कामे केली आहेत हे माहिती करून घेणे गरजेचे आहे.

हे एजेंट सुद्धा ऑस्ट्रेलियन गव्हर्मेंट च्या ऑफिसशी पत्रव्यहार करत असतात. येथे ओळख किंवा वशिला चालत नाही आणि एजेंट काम लावून देत नाही. त्याचे काम फक्त visa मिळवून देने आहे. त्यानंतर तुम्ही तयारी करायचे आहे ते एका इंग्लिश परीक्षेची ज्याचे नाव आहे IELTS (International English Language Testing System) ज्यामध्ये Reading, writing आणि listening अशा तीन subject’s च्या टेस्ट असतात. त्यानंतर समोरासमोर speaking टेस्ट असतें. आजकाल त्यांनी प्रॅक्टिकल टेस्ट सुद्धा सुरु केली आहे. ती भारतामध्येच होते पण ऑस्ट्रेलियन ऑफिसर कडून घेतली जाते त्यामुळे तुम्हाला कामाचे कौशल्य असणे गरजेचे आहे.

IELTS ची फी सध्या 17000 रुपये आहे . ही परीक्षा जोपर्यंत तुम्ही पास होत नाही तोपर्यंत देऊ शकता पण प्रत्येक वेळेस फी भरावी लागते. आता या परीक्षेची तयारी कशी करायची. यावर एक स्वतंत्र लेख तयार होईल. तर ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही ऑस्ट्रेलियाला Visa apply करायचा आणि मधल्या काळात मेडिकल टेस्ट साठी विचारणा केली जाते ती करून तो रिपोर्ट तिकडे पाठवावा लागतो.

लग्न झालेले असेल तर पती, पत्नी आणि मुलांनाही मेडिकल द्यावी लागते. ऑस्ट्रेलिया गव्हर्मेंट ने व्हीजा ग्रँड केल्यानंतर तुमची ऑस्ट्रेलियाला येण्याची प्रोसेस चालू होते. एक प्रकारे ऑस्ट्रेलियासाठी तुम्हाला दरवाजे खुले होतात. या सगळ्या प्रोसेस ला 1 ते 2 वर्ष सहज जातात यात काहीही शॉर्टकट नाही आणी सगळा पत्रव्यवहार ऑस्ट्रेलिया गव्हर्मेंट च्या इमिग्रेशन डिपार्टमेंट तर्फे होतो त्यामुळे दुसरं कोणी visa देत असेल तर तो फ्रॉड आहे असे समजावे. ऑस्ट्रेलिया सरकार किंवा भारतातील इमिग्रेशन एजंट जॉब लावून देत नाही. ऑस्ट्रेलियामध्ये आल्यानंतर जॉब तुम्हाला स्वतःला शोधावा लागतो आणि तो मिळतो.

पुण्यामध्ये अनेक नामांकित ऑस्ट्रेलियन व्हिजा मिळवून देणारे इमिग्रेशन एजंट आहेत. गुगलवर तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला अनेक एजंट दाखवले जातील त्यापैकी कोणत्याही एका एजंट कडे तुम्ही माहिती मिळवण्यासाठी गेलात तरी चालेल.

आता विद्यार्थ्यांसाठी Visa ची प्रोसेस कशी असते यावर लिहिण्याचा मी नक्की प्रयत्न करेन.

4 thoughts on “ऑस्ट्रेलियामध्ये येण्याची योग्य पद्धत |How to get Australian visa?”

  1. Khup chan माहिती देता..आमचेही नातेवाईक तिथे आहेत पण एवढी detail माहिती नव्हती…खूप छान आणि धन्यवाद

    Reply
  2. खुप छान सागितले तिकडे येंरंसाठी अगदी उपयुक्त माहिती

    Reply

Leave a Comment