बाई गेल्या | Rest in peace

आज जुईच्या शाळेत मल्टीकल्चर डे होता. सुमी जॉबवरून लवकरच आली होती. जुईचा मराठी लावणीवर डान्स होता तोही ऑस्ट्रेलियन शाळेत आणि विशेष म्हणजे तो डान्स जुईने आणि तिच्या एका मैत्रिणीने कोरिओग्राफ केलेला होता. त्यामुळे खूप उत्सुकता लागली होती तो डान्स पाहण्यासाठी. शाळेत पोहोचल्यानंतर जुईचे ते नऊवारीतले रूप पाहून सुमी अगदी सुखावून गेली होती.सुरवातीला अनेक वेगवेगळ्या देशातील डान्स परफॉर्मन्स झाले आणि सगळ्यात शेवटी बॉलिवूड Non stop 10 मिनीटांचा नॉनस्टॉप डान्स होता सुरवात झाली जोगवा गाण्याने नंतर चंद्रा वरील लावणी.

लावणी एकदम अफलातून झाली. पंजाबी, south indian, डान्स सुद्धा सुंदर झाले. सुमीने खूप सारे व्हिडीओ काढले. घरी आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तिने दिराला आणि जावेला ते व्हिडिओ पाठवले. मग बहिणींना मैत्रिणींना पाठवले.सुमीच्या दिराने व जावेने ते व्हिडिओ पाहून व्हाट्सअप ला स्टेटस वर ठेवले. सुमिला सुद्धा कधी एकदा स्टेटसला व्हिडिओ टाकेन असं झालं होतं. शिवाला सुद्धा व्हिडीओ पाठवले.

बराच वेळ बॅक यार्ड मध्ये बसून सुमी वारंवार ते व्हिडिओ पाहत होती. बाईंना खूप आवडतील.

“सोनल बाईला दाखव व्हिडीओ.” सुमी ने whats app वर मेसेज टाकला.

बाई अजून आल्या नाहीत मामाच्या घरून. सोनलचे उत्तर.

ok. असं म्हणून सुमीने स्वयंपाक केला.मुले आणि सुमीने जेऊन घेतले. नेहमीप्रमाणे व्हिडिओचे कौतुक करणाऱ्यांना सुमीने थँक्यू म्हणून रिप्लाय केला. मोबाईलचे इंटरनेट बंद केले आणि झोपून गेली.

ट…….र्रर्रर्रर्रर्रर्रर्र सकाळी पाच पन्नास चा गजर झाला.

डोळे चोळत नेहमीप्रमाणे सुमीने तो गजर बंद केला. परत सहा वाजता गजर झाला. गजर बंद करण्यासाठी मोबाईल हातात घेतला तसा शिवाचा फोन आला. “अरे आज इतक्या सकाळी call? सुमीला प्रश्न पडला.
शिवा कामानिम्मित काही दिवस घरापासून 500 km अंतर असलेल्या एका शहरात गेलेला होता.


“हॅलो ” सुमीने call उचलला.
काय करताय उठलात का?
“हो उठले आत्ताच उरकते आत्ता ” आज इतक्या सकाळी call केला. सुमीने शेवटी विचारलेच.
” आपल्याला इंडियाला निघावे लागेल ” शिवा ने उत्तर दिले.
का? मनात काहीच नव्हते त्यामुळे अगदी सहज सुमी ने विचारले आणि विचारल्यानंतर तिच्या पोटात एक मोठा गोळा आला.
“बाई गेली ” शिवाच्या उत्तराने सुमी एकदम गोंधळली.
काय?
हो बाई रात्रीच गेली आणि काळजात एकदम कोणीतरी सुरीने खुपसतंय असं झालं. आणि सुमीने मोठ्याने टाहो फोडला.
बाई म्हणजेच सुमीची सासू. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता म्हणजे ऑस्ट्रेलियन वेळेनुसार रात्री साडेअकरा वाजले होते तेव्हा हृदयविकाराच्या झटक्याने गेल्या होत्या.
रात्री झोपताना सुमी इंटरनेट नेहमी बंद करून ठेवत असे. त्यामुळे भारतातून दिराचे जावेचे व्हाट्सअप वरून आलेले कॉल तिला कळालेच नाही.
आणि शिवाने सुमी रात्रभर झोपणार नाही म्हणून रात्रीचे त्याला कळालेले असून सुद्धा त्यानी सुमीला सांगितले नाही.
बाई…… सुमीने टाहो फोडला तसे दोनी मुले पळत सुमीच्या बेडमध्ये आली.
शिवाचा फोन चालूच होता. मी निघतोय.11 वाजेपर्यंत येईल घरी. असं म्हणत त्याने फोन ठेऊन दिला. असं अचानक होईल असं सुमीच्या ध्यानीमनीही नव्हते. आत्ता जाऊन बाईंना मिठी मारावी. बाई असं न सांगता अचानक कश्या निघून गेल्या असं विचारावं. पन….पन….सुमी इतक्या लांबून अगदी हतबल झाली.
“हॅलो पवार भाऊजी ” सुमीने शिवाच्या मित्राला फोन केला. इतक्या सकाळी सुमीचा फोन आलेला पाहून… हॅलो वहिनी “
“भाऊजी आमचे इंडिया चे तिकीट book करा”
का? काय झाले?
“बाई गेल्या…. हुंदका देत सुमी म्हणाली.
Oh… वाईट झालं. तुम्ही शांत व्हा वहिनी. शिवा निघाला का तिकडून?
“हो ” सुमी…
करतो वहिनी मी book तिकीट. सुमीने फोन ठेवला.
भारतात तेव्हा रात्रीचे एक वाजले होते. सुमीने स्वतःला सावरून दिराला फोन लावला.
दीर बाईंना हास्पिटल च्या ॲम्बुलन्स मध्ये घेऊन गावाकडे चाललेले होते….
सुमीचा call आलेला पाहून आता वहिनीला काय सांगायचे ह्या विचाराने एकदम घाबरून गेले.
तरीही फोन उचलला.
हॅलो…….
क्रमश:

1 thought on “बाई गेल्या | Rest in peace”

Leave a Comment