हॅलो…कुठे आहात? ऍम्ब्युलन्स मध्ये आहे. सुमीला काय बोलावे तेच कळेना.सुमीने अंतविधी च्या वेळी video call online करायला सांगून फोन ठेवला.
सुमी एकदम खाली बसली.तोपर्यंत शिवाच्या मित्राने तिकीट बुकिंग साठी पासपोर्ट चे फोटो पाठवायला सांगितले. विकीने ते पाठवले. ग्रुपमधील सगळ्यांना त्यांनी फोन करून बाई गेल्याचे सांगितले.
ग्रुप मध्ये एकूण 7 फॅमिली. सगळ्यांची मुले पकडून एकूण 27 जण. सगळे भारतातील एकाच कंपनीत jobla होते. एखाद्या दुसऱ्या वर्षाच्या फरकाने सगळे एका मागोमाग ऑस्ट्रेलिया मध्ये आले होते. जवळजवळ पंधरा वर्ष झाली असतील ग्रुपला.
एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सगळे एकमेकांना साथ देतात. सुमीची ग्रुप मधील मैत्रिणींना कळल्यावर लगेच त्या घरी आल्या.सुमीला खूप मोठा आधार वाटला.तोपर्यंत भारतातून सुमीच्या चुलत दिराने व्हिडीओ call केला. समोरचे दृश्य पाहून काळजात खूप मोठा खड्डा पडला. नवीन कोऱ्या लाल किनारीच्या साडीत बाई एकदम प्रसन्न दिसत होत्या. चेहरा तर एकदम आनंदी आत्ता डोळे उघडतील आणि बोलतील असं वाटत होत. किती समाधानी वाटत होत्या.
सुमी खूप वेळ बाईंच्या चेहऱ्याकडे पाहत होती. शिल्पा ताई म्हणजेच सुमीची नणंद… बाई बाई म्हणून रडत होती. सोनल तर सारखे बाईंच्या गालाचे पापे घेत होती. बाई उठा ना. आत्ता मी सुमिताईना काय सांगू?असे म्हणून बाईंना मिठी मारत होती. तिला खूप मोठा धक्का बसला होता. सुमी ला ते सगळं ऐकून खूप हुंदके येत होते.
सुमिशेजारी तिची मैत्रिण रीना आणि मुले बसली होती. दोनी मुले सुद्धा एकदम घाबरून गेली होती. सोनलच्या रडण्याचा आवाज कानावर पडत होता तसे सुमीच्या काळजाचा ठोका चुकत होता.आत्ता सोनलची खूप काळजी वाटत होती. 2011 ला सुमीच्या दिराचे लग्न झाले त्या दिवसापासून सोनल आणि बाई कधीच एकमेकींना सोडून राहिल्या नाहीत.
सुमीचा दीर तर अगदी लहान मुलासारखा बाईंची काळजी घेत होता. सोनल आणि बाई सासू सुना कमी आणि मैत्रिणी जास्त होत्या. तिची सकाळ बाईंपासून सुरु व्हायची आणि आणि बाईंपाशी संपायची. बाईंना ऐकायला कमी येत असे तर एकदम बाईच्या जवळ बसून हात हातात घेऊन सगळं व्यवस्थित सांगत असे. कधीकधी बाईंची टिंगल करत असे बाईंचा सुद्धा तिच्यावर खूप जीव होता. अंतविधी ची सगळी तयारी झाली. बाईंना उचलण्यात आले आणि सुमीने एकवटलेला सगळा धीर सुटला
आणि तिने…बाई म्हनत हंबरडा फोडला. सोनलची अवस्था तर बघवत नव्हती. बाई उठा ना….. बाई उठा ना असं म्हणून ती बाईचे पापे घेत होती. सुमीला आत्ता सोनालला सावरायला तिथे पाहिजे होत असं खूप वाटत होत. व्हिडीओ call वर सगळं पाहत असताना सुमीला खूप हतबल झाल्यासारखे वाटत होते.
तिकीट book झाले संद्याकाळी पाच चे फ्लाईट होते. डोळ्यासमोर सगळा अंधार दिसत होता. शिवा निघून 2तास झाले होते अजून तीन तासात तो घरी पोहचणार होता. शिवाची खूप काळजी वाटत होती.
व्हिडीओ call चालूच होता. बाईंना वैकुंठ भूमीत आणले गेले.
क्रमश :