दडपण | Pressure

सुमी आणि शिवा मुंबई एअरपोर्ट वरून गावाला यायला निघाले.आणि एकदम सुमीला सोनलला सामोरे जायचे दडपण आले. (Pressure) तिला कसे समजाऊ आणि काय सांगू असे तिला वाटू लागले. आता सुमिला खूपच खंबीर व्हायची गरज होती.

गाडीमध्ये ड्रायव्हर म्हणाला साहेब मी गावापर्यंत येऊ शकत नाही मी तुम्हाला चाकणला ड्रॉप करतो.

त्याच्याशी वाद घालण्याच्या मनस्थितीत दोघेही नव्हते . शिवा ने त्याच्या मोबाईलवर रोमिंग चालू करून घेतल्यामुळे फोन करता येत होता. सुमी ची बहिण मिनी चाकणलाच राहत होती त्यामुळे तिने शिवाच्या मोबाईल वरून तिला मेसेज पाठवला की आम्ही सकाळी सात वाजेपर्यंत घरी येतो मग तुम्हाला आम्हाला गावाला सोडायला लागेल. ती सुद्धा जागीच होती तिने लगेच चालेल असे म्हणून मेसेज टाकला.

सुमी जेव्हा ऑस्ट्रेलियातून निघाली तेव्हापासून मुंबई एअरपोर्ट पर्यंत पोहोचेपर्यंत तिच्या आईला भावांना आणि बहिणींना खूप काळजी वाटत होती. मुंबई एअरपोर्टवर पोहोचलेला मेसेज तिने फॅमिली ग्रुप वर टाकला आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.

पहाटेची साडेचार वाजल्यामुळे रस्त्यामध्ये ट्राफिक अजिबात नव्हती. बरोबर साडेसात वाजता त्यांची गाडी चाकणला येऊन पोहोचली. घरापुढे गाडी येताच मिनी दरवाजा उघडून बाहेर आली. आणि सुनेने तिला घट्ट मिठी मारून रडू लागली. मीने आमच्या बाई गेल्या ग… असं म्हणत रडू लागली. मिनिने तिला आत घेत शांत केले आणि लगेच दाजींनी काढली चौघेजण गावाला जायला निघाले अगदी अर्धा पाऊण तासाच्या अंतरावर गाव होते. सुमी दरवेळी जेव्हा गावाला यायला निघायचे तेव्हा बाईंची सोनल भोवती घाई गडबड चालू व्हायची. अगं आता येतील ते सगळे उरक पटकन काहीतरी नाश्त्याला बनव. जास्तीचं दूध आणून ठेव. सुमिला काळ्या वालाच्या घुगऱ्या आवडतात त्या करून ठेव. सोनलला काही त्या शांत बसून देत नव्हत्या.

आणि सोनलला सुद्धा आम्ही यायचं म्हटलं की खूप उत्साह असायचा. महिनाभर अगोदरच तिची तयारी चालू व्हायची. दोघी सासूं सुनेची जणू काही मोठा सणच येणार आहे इतकी तयारी चालू व्हायची. गाडीचा आवाज आल्या की सगळ्यात पहिल्यांदा बाई दरवाजा उघडायच्या आल्या आल्या पहिल्यांदा सुमीच्या पाप्या घेणार आणि दोन्ही हाताची बोटे सुमेवरून ओवाळून कडकडून मोडायच्या आणि मग नंतर शिवाला आणि मुलांना जवळ घ्यायच्या.

त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा असायचा. जसजशी गाडी गावाच्या जवळ येऊ लागली तसतसे छातीवर कुणीतरी मोठा दगड ठेवलाय असे सुमिला भासू लागलं. गाडी घराच्या शेजारी घेऊन थांबली. आणि पाऊल पुढे टाकणं सुमीला अशक्य झालं. छातीवर दोन्ही हाताने दाबून धरत तिने घराच्या पायऱ्या चढल्या.

आता दरवाजा उघडून बाई बाहेर येतील आणि सुमी ला गच्च मिठी मारतील असं वाटून गेलं. घर माणसांनी गच्च भरलेला असून सुद्धा एकदम रिकामं रिकामं वाटत होतं. शिवा मिनी आणि दाजी मागून येतच होते. घरात पाऊल ठेवताच सोनलने मोठ्याने हंबरडा फोडला आणि एकदम सुमीच्या गळ्यात येऊन पडली. तिच्या तोंडाकडे बघवत नव्हते असं तिचा अवतार झाला होता.

ताई आपल्या बाई गेल्या…. असं म्हणत तिने मोठ्याने हंबरडा फोडला. सोनल एवढी सुमीची वाट आज कोणीच पाहिली नसेल कधी एकदा सुमी येते आणि त्यांच्यापुढे मन मोकळे करते असे सोनलला झाले होते. खूप अशक्त झाली होती. डोळे रडून रडून एकदम खोल गेले होते. चेहरा एकदम काळवंडला होता. तिला तसे पाहून सुमीच्या काळजात एकदम धस्स झाले.

शिल्पा म्हणजेच सुमी ची ननंद सुद्धा गळ्यात येऊन पडली.वहिनी बाईला भेटायला आली का असं म्हणत तिने सुमिला गच्च मिठी मारली. आणि शिवाच्या गळ्यात पडली. ” दादा आपली बाई गेली आपण आनाथ झालो “

आत्तापर्यंत शांत असलेल्या शिवा असं म्हटल्यावर मात्र कोसळून गेला. आणि रडू लागला. सुमीने दोघांना सावरत ताई असं म्हणू नका मी आहे असं म्हणत शिल्पाचे डोळे पुसू लागली.

सुमी ची अवस्था खूपच बिकट होती तिने सचिन भाऊंच्या खांद्यावर हात ठेवत बरे आहात का असे विचारले? तो सुद्धा आतून खूपच कोलमडला होता. चुलत सासवा तिथेच बसलेल्या होत्या. त्यांनी सगळ्यांना धीर देत शांत बसा असे सांगितले. सुमी ला आणि शिवाला अजूनही विश्वास बसत नव्हता की बाई आपल्यामध्ये नाही. आता बाई बाहेरून येतील आणि जवळ घेतील असे सारखे वाटत होते.

क्रमश:

1 thought on “दडपण | Pressure”

  1. खूप हेलावून टाकणारा क्षण असेल ग सुमे…वाचता वाचताच डोळे भरून आले 🥲🥲

    Reply

Leave a Comment