एक छोटसं कापडाच बोचकं हौसाला सापडलं. तीन-चार गाठनी मारल्या होत्या. (Dream)आत उघडून पाहते तर काय. तिच्या डोळ्यात एकदम पाणी आलं. त्या बोचक्यात 50 50 रुपयाच्या दहा नोटा होत्या.
हौसाच्या आईला चांगलं ठाऊक होतं हाऊस आता कोणत्या परिस्थितीतून जात आहे. शेवटी आईच ती. हौसाच्या आईला तिने खूप शिकावे असे वाटत होते. पण चांगलं मागणं आलं आणि हौसाचं लग्न उरकून टाकलं हौसाने ते पैसे एका पितळेच्या डब्यात ठेवले.
“मामा……म्हणत सपनी मामाकडे पळतच आली. सतीशने शाळेत जाऊन गुरुजींना माझ्या भाचीला भेटायचे आहे असे सांगितले होते. गुरुजी सुद्धा सतीश ला चांगले ओळखत होते. कारण गुरुजी त्यांच्याच गावचे होते.
“सपने लई उन्हात हिंडती कां काय तू पार काळी पडली” सतीश सपनी ला उचलतच म्हणाला.
“ “मामा मला यायचं तुपल्या संग “ सपने अगदी लाडात येऊन सतीश ला म्हणाली. सपने मोरल्या महिन्यात येणारच आहे तुला आणि ताईला घ्यायला. जत्रा हाय नव्ह “ सपनी चे तोंड आनंदाने उजळले. खूपच खुश झाली ती.
सतीश ने सपनी च्या हातात शंभर रुपये दिले आणि जपून ठेवायला सांगितले. थोडा वेळ सपनेच्या गुरुजींसोबत बोलला आणि सतीश निघून गेला. हौसाला आज खुरपायला जायला खूपच उशीर झाला होता. झोपडीच्या दरवाजाची कडी लावून. शेर्डीला सोडत हौसा लगबगीनी वावरात जायला निघाली.
“बया हौसा काय ग माय इतका उशीर केला सगळं बर हाय नाय व……“व्हय शारदाक्का सतीश आला व्हता ना बसली वाडुळ त्याच्यासंग “ व्हय का बर हाय ना माहेरी समद “ शारदा अक्का ने हौसा ला विचारले.“व्हय व्हय समदं बर हाय आपला असाच आला होता फिरत फिरत “ शेळी बांधता बांधता हौसाने उत्तर दिले.
दिवसभर हसत खेळत हौसा बायांबरोबर पातीला पात देत व्हती. आज ती खूपच खुश होती भावाला भेटून. दिवस मावळला आणि सगळ्या घरी जायची तयारी करू लागल्या.“हौसा जा कि ग घरी…. नाय शारदा अक्का सकाळी उशीर झाला थोड्या उशिराने जाईन घरी. खुरपतच हौसाने शारदा अक्काला उत्तर दिले. “जा बाई हौसा ती पोर तुझी वाट बघत आसन. वाटलं तर उद्या सकाळी लवकर ये.
हौसाने थोडेसे गवत बोचक्यात बांधले आणि शेर्डीला घेऊन घरी निघाली. आयवं…. सपनी पळतच हौसाच्या समोरून आली. “हे पाय मामानी मला पैस दिल. आणि मोरल्या महिन्यात जत्रेला न्यायला येणार हाय मला मामा.” सपनी खूपच आनंदात व्हती.
“व्हय काय मज्जा हाय मग एका पोरीची “ हौसा सपनीचे गालगुचे घेत म्हणाली.
काकू…. हौसाने एकदम वळून पाहिले. समोरून तिला समीर येताना दिसला. डोक्यावर गवताचं बाजक लगबगीने खाली टाकून ती समीर कडे जवळजवळ पळतच निघाली. समीर मुंबईला शिकायला होता.
मुंबईवरून तो परत आला की रंग्याची खबरबात घेऊनच येत असे. “काकू रंगा काका येणार हाय पुढच्या शनिवारी” समोरून येता येता समीर हौसाला आला म्हटला.” “समीर बर हायित ना… र हे. हौसा काळजीच्या स्वरात समीरला म्हणाली. हौसाचे डोळे एकदम भरून आले.व्हय काकू बरा हाय काका. असं म्हणत त्यानें एक छोटीशी पिशवी हौसाच्या हातात दिली. पुढच्या आठवड्यात रंग्या येणार आहे हे कळल्यावर हौसाला खूप आनंद झाला. तिने समीरला घरी येण्याचा आग्रह केला पण तो सुद्धा घाईत असल्यामुळे नंतर येतो असं म्हणून निघून गेला.
आयवं काय दिलंय पिशीत…. आबांन हौशीच्या हातातली पिशवीकडे पाहत सपनीने विचारलं. सपने चल घरात बर आधी मग बघू……. हौसान आणि झोपडीचा दरवाजा उघडला. अंधार पडायला लागला होता. तेवढ्यात वाड्यातला एक गडी पळतच हौसाकडे आला. “हौसा तुला मालकिन बाईने ताबडतोब वाड्यात बोलवल हाय. लवकर चल लई अर्जंट हाय “ हौसाच्या काळजात एकदम धस्स झालं.
क्रमश…….
उत्कंठा वाढली आहे….
🥰🥰🥰