“वहिनी हे रंगादादाच सामान ठेवलय बाहेर सपरात एक पेटी आणि दोन पिशव्या आहेत. “ ॲम्बुलन्स बरोबर रंगाचे जे दोन मित्र आले होते. ते सुद्धा आता जायला निघाले होते.(Dream)
येताना ते रंगाच्या खोलीतले सामान घेऊन आले होते. हौसा उठून उभी राहिली आणि हात जोडून उभी राहिली.तुमच लई लई उपकार झालं भाऊ इथपर्यंत घेऊन आल त्यास्नी तुमी
““वहिनी आस नका म्हणू लई सच्चा माणूस व्हता रंगादादा सारखं सपनी च नाव तोंडात असायच आणि वहिनी तुमची लई काळजी वाटायची त्याला “हौसाला खूप रडायला येत व्हत “भाऊ त्या दिवशी आक्सीडंट झाला त्यादिवशी दवाखान्यात हे तुम्हास्नी काय बोललं काय जीव सोडतानी? हौसा ने रडतच विचारलं.
“वहिनी….दादा फक्त सपनी सपनी म्हणत व्हता सारखं तुमास्नी कायतरी सांग म्हणत होता पण कळल नाय. “हे ऐकल्यावर हौसाला कुणीतरी काळजात वार करतंय कां काय आस वाटत होत. त्यांना सपनी ला भेटायचं होतं पण सपनी रमाकडे होती.
हौसाचा निरोप घेऊन ते दोघेजण निघाले.घरात हौसाचे आई वडील आणि भाऊ बसले होते. हौसाने बाहेरचे सामान आत आणले आणि उघडून पाहू लागली.पिशवीत रंगाचे थोडे कपडे होते. पांघरून होते. ती हळुवार कपड्यांवरून हात फिरवू लागली.
हौसाच वडील आणि भाऊ यांना ते बघवेना ते बाहेर निघून गेले. हौसाची आई तिच्या शेजारी येऊन बसली. तिने हळुवार पेटी उघडली. आत एक सुंदर बाहुली होती प्लास्टिक च्या पिशवीत. बहुतेक इकडे यायचं म्हणून सपणीसाठी घेऊन ठेवली आसल.
“बया पोरीसाठी लई जीव तुटत होता त्यांचा” हौसा आईच्या गळ्यात पडत बोलत होती.पेटीत खाली एक नारंगी रंगाचं नवीन कोर लुगडं, बांगड्या, हौसाला फराक, केसाला लावायचं रबर, चाप, असलं बरंच सामान होत. हौसा बघतच रायली.
“काय करू मी या लुगड्याच आई….लई खासत्या खाल्या सपनीच्या बापानं आमच्यासाठी….पै पै गोळा करून हिकडं आणून दित व्हतं सवतासाठी कवा नवीन कापड नाय घेतलं आन मला साडी घेऊन ठीवली…. शेवटाची
“ हौसाची आई च सुद्धा काळीज तुटत होत. पोरीचं दुःख तिला बघवत नव्हतं.बघता बघता दहा दिस झालं दहावा झाला.तेरावा झाला हौसाच्या बापानं आणि भावान कायबी कमी पडू दिल नाय. सपनीला पण आता कळायला लागल नक्की काय झालंय ते.
रमा दरोरोज भाकरी कालवान घेऊन येत व्हती. रमाचेही आईवडील आले होते. “हौसा भर बाळा सामान तुपल मी गाडी बोलावली हाय. “हौसाचे वडील म्हणाले.
अण्णा मी राहीन इथं आता हेच मपल घर हाय. खम्बिर हाय पोर तुमची “ तिच्याकडे एक नवीनच आत्मविश्वास आला होता.“काय येडीबिडी झाली कां काय पोरीला घेऊन एकली कशी राशीन ताई तू ते कायबी नाय आवर लवकर “सुधीर रागवतच हौसाला म्हणाला.
“ म्पल्यावर तुमचा भरवसा नाय कां आई? आईकडे पाहतच हौसा म्हणाली.
“भरवसा हाय ना माय म्हणूनच ठीवलं हुत ना तुला पाहुण्याच्या भरवाशावर पण आता पाहूनच नाय रायल तर तू काय करशीन माय एकली या लेकराला घेऊन.” आई समजुतीच्या स्वरात म्हणाली.”
आई अण्णा सुधीर म्पल्याला सवताच्या पायावर उभ रायचं हाय मला जवा बी गरज पडल…. मी तुमच्याकडचं येइन दुसरं कोण हाय मला. हौसा बोलत होती आणि आईवडिलांना ते आजिबात पटत नव्हते.पण हौसा काही ऐकायला तयार नव्हती.
सगळ्याचा नाईलाज झाला. पंधरा दिसान तुला न्यायला सुधीरला पाठवती दुखवटा काढायला येशीन ना? आईने विचारच हौसाने मान हलवली.गाडी आली आणि जड अंतकरणाने सगळे निघून गेले.हौसा आणि सपनी आतं आल्या. सपणीन बाहुली हातातं घेतली आणि हौसा नारंगी लुगडं कवटाळून रडू लागली समोर होता अंधार आणि अंधारात चमकत होत लुगड्याच हिरवगार….. काठ…
क्रमश….