“हौसा तुझ्या मुर्त्या लई आखीव रेखीव असत्यात बघ लई…. एका आपल्या नेहमीच्या गिर्हाईकाला तुला भेटायचं हाय. (Dream)म्हणून तुला बोलून घेतलं.
“ आता तुपली स्वतःची एक छोटी कंपनी उभी राणार हौसा “कदम बाई हौसाला म्हणाल्या. आणि हौसाच्या पायाखालची जमीनच सरकली. कंपनी असणे म्हणजे लई मोठ्ठ आस कायतरी असतंय आस तिला वाटायचं.
बाईनी तिला सगळं व्यवस्थित समजून सांगितलं.दोघी बोलतच होत्या तेव्हड्यात एक मोट्ठी पॉश गाडी बाईंच्या घरासमोर येऊन उभी राहिली. त्यातून दोन मानस उतरली. बाईंनी पुढं जाऊन नमस्कार केला. हौसानी डोक्यावरला पदर सावरून नमस्कार केला.
“वसंत ही हौसा तुपल्या दुकानांना हिच्याच मुर्त्या असत्यात” बाईंनी हौसाची ओळख करून दिली.“नमस्कार हौसा मी वसंत…..बाइं चा लांबचा नातेवाईक आहे. तुझ्या मुर्त्या खरोखरच खूप सुंदर आणि रेखीव असतात. जेव्हापासून तुझ्या मूर्ति यायला लागल्या आमचा बिझनेस जास्त चांगला चालायला लागला आहे. खूप खूप आभारी आहे मी तुमचा “ वसंत ने हात जोडून म्हटले.
“मपल काय नाय जी सगळं बाईंनी शिकवलं तसंच मी करती सगळी बाईंचे किरीपा.”हौसा खाली पाहून बोलू लागली.“खूप जिद्दी बाई आहे बर कां वसंत….हौसा खूप जीव लावून कामं करती.” बाई हौसा च कौतुक करत होत्या.“बाई आपण जरा बसून कामाचं बोलूया.” वसंत म्हणाला.
वसंत बरोबर अजून एक माणूस होता त्याने गाडीत जाऊन काही फाईल घेऊन आला.“हौसा.. वसंत च आस म्हणणं हाय इथून पुढं तू डायरेक्ट त्याच्याच दुकानांसाठी मुर्त्या बनवायच्या. तो सगळं सामान घरपोच करीन. आणि तो मुर्त्यांचे पैसे सुद्धा जास्त देणार आहे.
तुला पटलं तरच हा म्हण. तुझा नफा पण वाढणं आणि तुझ्या बनवलेल्या मुर्त्या घरात पडून राहणार नाहीत त्यांना जितक्या मुर्त्या पाहिजे तेवढ्याच तू बनवायच्या त्याबद्दल्यात ते प्रत्येक मूर्ति माग तुला मी देते त्यापेक्षा दुप्पट किंमत द्यायला तयार आहे.
“ बाई बोलत होत्या. हौसाला काय बोलावं ते कळेना. “बाई म्पल्याला तुमच्यसंग थोडं बोलायचं हाय.”“हा बोलू ना चल” बाई आणि हौसा घराच्या मागच्या बाजूला गेल्या.“बाई म्पल्याला फकस्त तुमच्याबरोबर काम करायचं हाय दुसऱ्या परक्या माणसांबरोबर आपलं नाय जमायचं मला अजून यातलं नीट कळत नाय तुम्ही हाय म्हणून मला काहीच वाटत नाय.”
हौसा एकदम डोळ्यात पाणी आणून म्हटली. “आन मला अजुन हिशोबातलं जास कळतं बी नाय.”हौसा म्हणाली.
“हौसा वसंत काही मला परका नाही बाय लई चांगला माणूस हाय तू दिलेल्या मुर्त्या आपल्याकडे येत्यात आणि माझ्याकडून परत कलर करून त्याच्याकडे जात्यात त्याचं असं म्हणणं आहे कलर पण तू केला तर मुर्त्या डायरेक्ट तुझ्याकडून त्याच्या दुकानात जातीन त्यात तुझा पण फायदा हाय बाळा.”
बाई हौसाला समजून सांगत होत्या.“बाई तुमच्या ओळखीचा आसल तर मला काय भ्यावं नाय तरि पण मला तुमची मदत लागण” हौसा म्हणाली. “अजिबात घाबरू नको हसा मी तुला नेहमीच मदत करीनबाईंना हौसा विषयी खूप सहानभूती वाटायची.
इतक्या लहान वयात नवरा गेला तरी पण न डगमगता तिने कामाला सुरुवात केली याचे बाईंना खूप कौतुक होते. दोघे आत आल्या व संध्याकाळी कागदपत्रे हौसाला सही करायला दिले. हौसाने त्याच्यावर सह्या केल्या. आणि हौसाचा एक स्वतंत्र व्यवसाय उभा राहिला.
वसंत ची महिन्याला गाडी येऊन मटेरियल टाकून जायची आणि मूर्ती घ्यायला परत दुसरी गाडी यायची. हौसाचे काम आता खूपच वाढले होते. गावातल्या जवळपास पंचविस बायका तिच्याकडे कामाला होत्या. तिने घराबाहेर एक मोठे गोडाऊन बांधले आणि मुर्त्या बनवून कलर देण्याचे काम तिथे चालू झाले.
हौसाचे आई-वडील तिला अधून मधून भेटायला यायचे त्यांना त्यांच्या मुलीचा खूपच अभिमान वाटत होता. तिने बाहेरून परीक्षा देऊन तिचे ग्रॅच्युएशन पूर्ण केले. सपना आता सातविला गेली होती. वसंत कधीमधी काम बघण्यासाठी गावाला यायचा. त्याच्याबरोबर त्याची एक छोटी मुलगी सुद्धा यायची. ती सुद्धा सपनी च्या वयाची होती.
त्यामुळे सपनी ची आणि तिची चांगली ओळख झाली. नीता नाव होते तिचे आणि ती इंग्लिश शाळेमध्ये जायची. हौसा कडे पाहून वसंत ला तिचे खूप कौतुक वाटायचे. एक दिवस असच वसंत बरोबर नीता आली. दोघी खेळत असताना हौसाने ने तिला तिच्या आई विषयी विचारले.
“माझी आई मी दुसरीला होते तेव्हा देवाच्या घरी गेली “ निताचे हे बोलणे ऐकून हौसाला एकदम धक्का बसला. “मंग घरी कोण असत माय तुपल्या? हौसाने एकदम काळजीने विचारले.माझी आज्जी आहे. आम्ही तिघेजन असतो घरी. निताने उत्तर दिले. हौसाला निता विषयी खूप माया वाटू लागली बिन आईची पोर कस वाढत असलं आस तिला वाटून गेलं.
दिवस जात होते पावसाच्या कामाला आता चांगला जोर वाढला होता. गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून आता ती ओळखली जात होती.रमा आणि भागीरथी ताई सुद्धा तिच्याकडे कधी मध्ये यायच्या त्यांना सुद्धा तिचा खूप अभिमान वाटत असे.भागीरथी ताई आणि कदम बाईंची सुद्धा ओळख वाढली होती. रमा अधून मधून मूर्ती पाहायला यायची.
हौसा सुरवातीला हिशोब करण्यासाठी बाजीराव ला बोलवायची. परंतु सारखे येणे त्याला शक्य नसायचे. त्यामुळे तिने गावातलाच एक होतकरू कॉलेजमधला मुलगा तिचा हिशोब पाहण्यासाठी ठेवला होता.एक दिवस कदम बाई हौसाकडे आल्या. एक वेगळंच कारण घेऊन.
क्रमश……..
🥰🥰