बदल |Change

खरं तर बदल (change)हा थोड्या थोड्या काळाने सगळ्याच बाबतीत होणे अतिशय आवश्यक आहे. मग ते कुठलेही असो. त्यातल्या त्यात मी एका बदलाबद्दल प्रकर्षाने लिहू इच्छिते तो बदल म्हणजे आपल्या मधील बदल.

पंधरा-वीस वर्षांपूर्वीच्या आपण आणि आत्ताच्या आपण किती बदल झाला आहे आपल्या मध्ये आणि तो बदल होणे आवश्यकही होते. खरंतर आपल्यातील होणारा बदल बऱ्याच जणांच्या डोळ्यातही खुपसत होता हो कि नाही खरं तर आपण आपल्यात बदल करून घेतले ते खूप हळूहळू म्हणजे साड्यांमधून आपण आलो गाऊन वर गाउनवरून आपण आलो ड्रेसवर ड्रेस वरून आपण आलो जीन्स वर जीन्स वरून आपण आलो शॉर्टवर शॉर्ट वरून आपण आलो फ्रॉक वर हो कि नाही.

आपण साडी वरून डायरेक्ट शॉर्ट वर आलो नाही. आपण आधी आजूबाजूच्या वातावरणाला हळूहळू आपण बदलतोय याची सवय करून दिली आणि मग बदललो. आणि ते योग्य सुद्धा होते. जर आपल्याला बदलायचे आहे तर हळूहळू स्टेप बाय स्टेप बदलले तर ते आपल्यालाही कॅरी करायला सोपे जाते आणि घरातल्यांना किंवा आजूबाजूंच्या लोकांनाही त्याची काही वाटत नाही. खरंतर आपण म्हणतो आपल्याला जे पटते ते आपण करतो बाकीचे लोक काय म्हणतील त्याकडे आपण दुर्लक्ष करायचं पण खरं सांगा असे होते का?

कितीही दुर्लक्ष करायचे म्हटले तरी आपल्याला थोडा का होईना फरक पडतोच. मला चांगले आठवते साडी नंतर जेव्हा मी पहिल्यांदा dress घातला आमच्या तो अख्खा दिवस सासूबाई माझ्याकडे नेहाळुन पाहत होत्या आणि गालातल्या गालात हसत होत्या. जीन्स मात्र मी डायरेक्ट इकडे आल्यावरच घातली. काही मुली खूप पटापट स्वतःमध्ये बदल करून घेतात. आणि ते त्यांना छानही दिसते. परंतु घरातल्या लोकांना ते पटापट झालेले बदल डोळ्यासमोर येतात.. म्हणून बदल करताना नेहमी हळूहळू करावेत.

ही आयडिया मी माझ्या बऱ्याच मैत्रिणींना सांगितली आहे खरंतर आपल्या घरातले आपल्याला हे घालू नको साडी घाल. असे सांगतात आणि आपल्याला त्याचा खूप राग येतो खरंतर ते सगळं आपल्याला चांगलं दाखवण्यासाठीच करत असतात पण आपल्याला त्याचे वाईट वाटते. आपल्या सुनेला मुलीला कोणीही नाव ठेवू नये असेच त्यांना वाटत असते. पण आपल्याला मात्र त्याचा भयंकर राग येतो त्यामुळे कोणतेही बदल करताना ते बदल हळूहळू केले तर ते कुणाच्या डोळ्यातही खूपच नाही आणि आपल्यालाही ते कॅरी करणे खूप इझी होऊन जाते. मैत्रिणींनो कोणतेही ड्रेस घाला काहीही घाला फक्त तुम्हाला त्यात कम्फर्टेबल वाटते का एवढेच फक्त बघा. बाकीच्या मुली किंवा बायका घालतात म्हणून आपण घातलेच पाहिजे असा नियम नाही आणि तुम्हाला ते छान वाटत असेल कॅरी करता येत असेल तर मी सांगितल्याप्रमाणे हळूहळू बदल करत घाला हो कि नाही. मी पण ही आयडिया वापरलेली आहे. आणि आयडिया वापरणे अजून चालूच आहे .

आपण लुकडे आहोत की जाड आहोत, काळे आहोत की गोरे आहोत असा अजिबात विचार न करता मनात एखादा ड्रेस, साडी, जीन्स घालायचा विचार आला की घालून टाकायच.

दुर्लक्षाय नमः हा मंत्र शक्यतो नेहमी म्हणत राहायचा आणि आपल्या मस्तीत जगायचं. हो की नाही?

7 thoughts on “बदल |Change”

  1. किती छान ग सिमुडे… इतकं ज्ञान घेऊन जन्माला आली आहेस ना तू.. अगदी कुणाला कोणत्या भाषेत समजवावं हे तुझ्या कडूनच शिकायला हवं..लव यू डियर सिमुडे😘😘😘

    Reply

Leave a Comment