चारुशीला 2 | Charushila

चारुशीला -2

पवन च्या घरामध्ये चारुशीलाला (Charushila)बघायला जाण्यासाठी गडबड चालू झाली. सुशीला ताईंनी अवंतिकालाही येण्यासाठी आग्रह केला.

अवंतिका चे आई-वडील म्हणजेच संपत रावांचे मित्र. दोघांची खूपच घट्ट मैत्री होते. एक्सीडेंट मध्ये संपत रावाचे मित्र आणि त्यांची पत्नी दोघेही देवा घरी गेल्यामुळे अवंतिका ची जबाबदारी संपूर्णपणे संपत रावांनी उचलली होती. लहानपणापासून अवंतिका आणि पवन यांना समान वागणूक देत दोघांचेही संगोपन केले होते. ते दोघेही जवळजवळ एकाच वयाचे होते.

लहानपणापासून पवन आणि अवंतिका एकत्र वाढल्यामुळे दोघांनाही एकमेकांची खूप सवय झाली होती. पवनच्या प्रत्येक कामामध्ये अवंतीकाची मदत असायची. त्यामुळे अवंतिकाला पवनची खूपच सवय झाली होती आणि नकळतपणे ती पवन वर प्रेम करायला लागली होती. परंतु पवन च्या मनात मात्र तिच्याविषयी एका बहिणीच्या नात्या पलिकडे दुसरे कोणतेही विचार नव्हते.

पवनला जेव्हा रिकामा वेळ असेल तेव्हा तो अवंतिका बरोबर बागेतली फुलझाडे, खत आणण्यासाठी जातं असे. इतर घरी 2 गाड्या असल्यामुळे विशेष काही खरेदी असेल तेव्हा अवंतिका ड्रायव्हर बरोबर जातं असे.स्वयंपाकासाठी घरात मावशी होत्या पण पवनच्या आवडीचे खाद्यपदार्थ मात्र ती स्वतः बनवत असे.

संपतराव आणि सुशीला यांनीही अवंतिकाला मुलीसारखे वाढवल्यामुळे मोठी झाल्यानंतर तिचे एका छान कुटुंबात लग्न करून द्यायचे विचार होते. परंतु अवंतिकाला वाटत होते की त्यांनी आपली सून म्हणूनच मला ह्या घरात ठेवावी. बारावीनंतर शिक्षणात इतकी हुशार नसल्यामुळे किंवा शिक्षणाची आवड नसल्यामुळे ती पुढे शिकले नाही. त्यामुळे ती दिवसभर घरातच असायची.

तिला बाग काम करायची खूप हाऊस होती त्यामुळे तिने घराच्या मागे पुढे छान बाग फुलवली होती. दररोज घरातील कुंड्यांमध्ये ताजी फुले दिसायची. घरातील नोकराचा आकरांकडे लक्ष देणे किचनमध्ये स्वयंपाक की मावशी बरोबर स्वयंपाक शिकणे यातच तिचे दिवस जायचे.

पवनला मुलगी बघायला जाण्यासाठी अवंतिकाला आग्रह केल्यानंतर तो तिला आग्रह मोडता आला नाही. आणि ती पवन बरोबर चारुशीला बघण्यासाठी तयार झाली. मनातून मात्र ती खूप कोलमडली होती.

“अवंतिका सांग ना आज मी कोणती कपडे घालू ” पवन च्या आवाजाने अवंतिका भानावर आली. “पवन तुझी कपडे मी मगाशीच काढून ठेवली आहेत तुझ्या बेडरूम मध्ये ” असं म्हणत अवंतिका तिच्या खोलीत निघून गेली. आतल्या तिला खूप रडू येत होते. आपण आधीच सांगायला पाहिजे होते का पवनला की माझे तुझ्यावर प्रेम आहे म्हणून? असा प्रश्न तिच्या मनात येऊन गेला. तिला तिचे सर्व विश्वास कोसळल्यासारखे वाटू लागले. कशीबशी सावरत ती पवन बरोबर चारुशीला बघायला जाण्यासाठी तयार झाली.

सडपातळ बांधा,गोरा वर्ण, लांब सडक केस, चाफेकळी सारखे नाक दिसायला खूप सुंदर असलेली अवंतिका कुणाच्याही नजरेत भरेल इतकी सुंदर होती. तिने घातलेला लाल कलरचा ड्रेस तिला खूपच खुलून दिसत होता. अवंतिका तुला बरे वाटत नाही का? चेहरा खूप थकलेला दिसतोय सुशीला ताईंनी अवंतिका ला विचारले? नाही आई मी बरी आहे असं म्हणत अवंतिका ने सुशीला ताईंच्या नजरेला नजर देणे टाळले.

सुशीला ताई संपतराव पवन आणि अवंतिका ड्रायव्हरला घेऊन चार चाकी मध्ये चारुशीला च्या घरी पोहोचले. अगदी साधे असे कौलारू घर घराच्या पुढे तुळशी वृंदावन आणि खूपच प्रसन्न असे वातावरण. चारुशीला चे वडील पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी समोर आले आणि राम राम म्हणत पाहुण्यांना घरात आणले.

घरात एक छोटा लाकडी सोफा आणि दोन प्लास्टिकच्या खुर्च्या ठेवलेल्या होत्या. घर बारीक होते. पण सर्व वस्तू जागच्या जागी आणि घर एकदम टापटीप ठेवलेले होते. हॉलमध्येच देवाचा देव्हारा होतं. संपूर्ण देवघर फुलांनी अगदी सजवलेले होते. त्यामुळे वातावरण खूपच प्रसन्न वाटत होते. सुशीला ताईंनी पाहिल्या क्षणी घर खूपच आवडले.सगळे बसल्यानंतर निवृत्ती रावांनी सुमनला आवाज दिला. तशा डोक्यावरचा पदर सावरत सुमन ताई हसतमुखाने बाहेर आल्या. आणि सगळ्यांना नमस्कार केला.

निवृत्ती रावांनी सर्वांबरोबर सुमन ची ओळख करून दिली. आणि सर्वजण गप्पा मारायला लागले. अवंतिका मात्र सुशीला ताईंच्या शेजारी खूपच अवघडून बसली होती. तिचे डोळे चारुशीलाला शोधत होते. चारुशीला च्या दोघी बहिणीआणि भाऊ आतल्या दरवाज्यातून डोकावून बाहेर पाहत होत्या. निवृत्ती रावांनी त्याना बाहेर बोलावून त्यांची ही ओळख करून दिली. थोड्यावेळाने सुशीला ताईंनी चारुशीला ला बाहेर आणण्यासाठी सांगितले.

साडीच्या निऱ्या सांभाळत चहाचा ट्रे घेऊन चारुशीला आतल्या खोलीतून खाली पाहत पदर सावरत बाहेर आली. अवंतिका ने तिच्याकडे पाहिले आणि तिला एकदम धक्का बसला.चारू…… असं म्हणत ति सोफ्यावरून एकदम उठून उभी राहिली.

क्रमश….

1 thought on “चारुशीला 2 | Charushila”

Leave a Comment