चारुशीला 28
“नाही “ गोधू मावशीने उत्तर दिले. चारुशीला (Charushila)एकदम चकित झाली. जानुसुद्धा चारुकडे पाहू लागली. मग कोण असू शकते. “रुख्मिणी? जानू एकदम म्हटली. तेव्हड्यात चारुचा फोन वाजला.पवन सगळं ठीक आहे का विचारत होता. चारूने थोडे बोलून फोन ठेऊन दिला.
“गोधुमावशी तूम्हाला माहित आहे ना त्या दिवशी अवंतिका बरोबर कोण होते ते? रुख्मिणी मावशी होत्या का? चारूने विचारले.”नाही आजिबात नाही. त्या बिचारीला त्यातले काहीच माहित नाही. “अवंतिका ला पवन बरोबर लग्न करायचे होते. तिचे खूप दिवसाचे ते स्वप्न होते. तिचे आणि तिच्या मावशीचे.
”अवंतिका चि मावशी? चारुशीला एकदम आश्चर्यचकित झाली. “हो अवंतिका चि मावशी याच गावात आहे.
अवंतिका चे आई-वडील एक्सीडेंट मध्ये गेल्यानंतर तिच्या मावशी चे लग्न झाले आणि तिला या गावातच दिले. गोधुमावशी म्हणाल्या.“पण ती का मदत करत आहे अवंतिका ला? चारू म्हणाली. “तुला बाजूला करून तिला पवनबरोबर लग्न करायचे आहे. तसे झाले तर सगळे घर अवंतिकाच्या हातात येणार आणि त्याचा फायदा तिच्या मावशीलाही होणार. हे आघोरी कृत्य करण्याचे सगळे तिच्या मावशीने तिच्या डोक्यात बसवले आहे.”मावशी म्हटल्या“
” मग त्यादिवशी आमच्या खोलीच्या खिडकीत दगड मारला ते कोण होते? चारून न राहवून विचारले.“तो दगड मी मारला होता. अवंतिका आणि तिची मावशी त्यांच्या खोलीमध्ये काहीतरी अघोरी कृत्य करत आहे हे माझ्या लक्षात आले होते. तुमच्या खोलीच्या खिडकीत दगड मारल्यामुळे तुम्ही जागे होऊन सगळे बाहेर याल आणि अवंतिकाचीही ते कृत्य थांबेल असे मला वाटले होते. तुझे आणि पवन चे लग्न झाल्यापासून त्यांचे हे सगळे चालले आहे.” गोधुमावशी एका दमात बोलल्या.
आता मात्र चारू खूपच घाबरून गेली. म्हणजे अवंतिका हे सगळं फक्त मला घरातून घालवण्यासाठी करत आहे. “गोधुमावशी अवंतिका चि मावशी याच गावात रहते म्हणजे तुम्हाला माहित असणार तिच्याविषयी.” चारूने गोधुमावशीकडे पाहत विचारले.
अवंतिका चि मावशी पुष्पा तिला कोण नाही ओळखत चारू सगळ्या गावात ती जादूटोणा करण्यासाठी प्रसिद्ध आहे. तिला सगळे घाबरूनच असतात.“सुशीला ताईंच्या व्हेंटिलेटर च्या नळ्या सुद्धा तिनेच काढल्या.” गोधुमावशी म्हणाल्या.आता मात्र चारूला चक्कर येईल कि काय असे वाटू लागले. ती एकदम सुन्न झाली.
“ताई बरी आहेत ना “जानू चारुचा हात हातात घेऊन म्हणाली.गोधुमावशीला संपतरावंशी सूड उगवायचा होता तर अवंतिका ला चारुचा. इतक्या दिवस घरात काय काय चालले होते आणि आपल्याला काडीची ही कल्पना नाही याचेच चारूला आश्चर्य वाटत होते.
“गोधुमावशी बाबांचे आणि तुमचे काय वाद आहेत ते आपण समोरासमोर बसून बोलून घेऊया. आपल्याला पहिल्यांदा अवंतिका चे जे चालले आहे ते सगळे थांबवले पाहिजे.चारू म्हणाली
”भरला संसार उध्वस्त झाला माझा चारू प्रामाणिक असणारा माझा नवरा फक्त आणि फक्त संपत रावांच्या आरोपामुळे गेला. “गोधुमावशी एकदम रागात बोलल्या.
मावशी मी समजू शकते तुमचे दुःख. मी वचन देते मी तुम्हाला मदत करेन. बाबा दोषी असतील तर त्यांना शिक्षा द्यायला मी तुम्हाला मदत करेन. चारू गोधुमावशी जवळ बसत म्हणाली.“ताई काय बोलतेस हे “ जानू एकदम बोलली. जानू गोधुमावशीच्या जाग्यावर आपल्याला ठेऊन बघ म्हणजे कळेल. चारू जाणूकडे पाहत म्हणाली.
“चारू माझी आजिबात इच्छा नाही तुझा संसार मोडून मला न्याय मिळावा “ गोधु मावशी म्हणाल्या.नाही मावशी मी माझा संसार ही मोडणार नाही आणि तुम्हालाही न्याय मिळवून देईन. फक्त मला वेळ द्या.चारू म्हटली.
”चारू मला मुलगी असती तर तुझ्या एव्हडीच असती बघ असं म्हणून गोधुमावशीने चारूला कुरवाळले. “मावशी मला मदत कराल अवंतिका चे जे काही चालले आहे ते थांबवन्यासाठी?चारू विनंतीच्या स्वरात गोधु मावशीला म्हटली.माझ्या मदतीची तुला काहीच गरज नाही फक्त एक कर. असं म्हणून ती चारुशीला च्या कानात काहीतरी कुजबुजली आणि चारुशीला आ वासून गोधू मावशीकडे पाहतच राहिली.
क्रमश….
मस्तच
