चारुशीला 5 | Charushila

चारुशीला -5

चारुशीला आणि अवंतिका दोघींनी घरी खरेदीची कारण सांगून बाहेर पडल्या. आणि ठरलेल्या जागेवर भेटल्या. अवंतिकांने चारुशीला(Charushila) लांबून येतानाच पाहिले.. पळत जाऊन तिने तिला मिठी मारली.

चारू कशी आहेस. आजिबात बरी नाही? का ग अवंतिका ने चेहऱ्यावर खोटे हसण्याचे अवसान आणत विचारले. मी त्या दिवशी तुझी केलेली गंमत तू फारच मनावर घेतलीस असं दिसतय ” कोणती गंमत चारुशीलाने अवंतिकाकडे आश्चर्यचकेत होऊन पाहिले.

अगं मी तुला त्यादिवशी म्हटले ना माझे पवन वर प्रेम आहे ते, काय तू ती गंमत केली होती? चारुशीला एकदम उदगारली. हो मी गम्मतच केली होती. तुला खरे वाटले कि काय? आता मात्र चारुशीला ला काय बोलावे तेच सुचेना. ते तर अवंतिकाला मला पवन आवडला नाही असं सांगणार होती. आणि पवन पासून दूर राहणार होती.

तू खरं सांगतीयेस ना? चारुशीलाने अवंतिकाला विचारले. हो ग खोटं कशाला बोलू. पवन च्या आई-वडिलांनी मला मुली प्रमाणे वाढवले आहे. तू मला त्यादिवशी अचानक दिसलीस आणि म्हटलं गंमत करावी तूझी थोडी. पण sorry तु खूपच विचार केलेला दिसतोय यावर.

अवंतिका काळजावर खूप मोठा दगड ठेवून म्हणाली. अग हो मला खूप टेन्शन आलं होतं. पवन आणि मी आम्ही एकमेकांना जवळजवळ चार-पाच वर्षे झाली ओळखतो. आणि एकमेकांवर प्रेम सुद्धा करतो. आता आश्चर्यचकित होण्याची पाळी अवंतिका वर होती. म्हणजे बघण्याचा कार्यक्रम तुम्ही दोघांनी प्लॅनिंग करून केला तर… शरद रावांना मध्ये घालून.

हो असंच काहीसं असं म्हणून चारुशीला लाजली. अवंतिकाला मात्र तिच्या हृदयावर कोणीतरी कुऱ्हाडीने वार करत आहे असे वाटू लागले. पण मी खूप आनंदी आहे तुझ्यासारखी बायको पवनला मिळाली. असं म्हणत तिने डोळ्यातील पाणी लपवले.

अवंतिका चारू ला म्हटली मी तुझी ही गंमत केलेली पवनला सांगू नकोस. वचन दे असं म्हणत अवंतिकांनी चारुशीलाच हातात हात घेतला. आणि चारुशीला ने सुद्धा ते मान्य केले.

दोघीही मंदिरात गेल्या आणि पाया पडून घरी जायला निघाल्या. चारुशीला ला एकदम हायसे वाटत होते. तरी तिला मनात कुठेतरी शंका वाटत होती. अवंतिका खरंच सांगत होती का? चारुशीला घरी पोहोचते न पोहचते तेवढ्यात शरद राव गाडीवरून येताना दिसले. तुझे वडील घरी आहेत का? हो आहेत काका यां ना असं म्हणत चारुशीला नाही शरदरावांच्या हातात पाण्याचा तांब्या दिला.

नमस्कार करत निवृत्ती राव बाहेर आले. निवृत्ती राव आता लग्नाची तयारी करायला लागा मुलाकडून होकार आलेला आहे. असं म्हणतात निवृत्तीरावांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.

चारुशीला लाजतच आतल्या घरात पळाली.येत्या रविवारी संपत रावांनी घर बघायला बोलवले आहे. चारुशीला दोघांसाठी चहा घेऊन बाहेर आली. नशीब काढलं हो पोरीने… इतक्या मोठ्या आणि चांगल्या घरात जाणार आहे. शरदराव म्हणाले हो हो आमची चारुशीला आहेच नशीबवान आणि गुणी. निवृत्ती राव असं म्हणताच. चारुशीला पुन्हा घरात पळाली.

इकडे अवंतिका घरी आली. आणि तिच्या खोलीत जाऊन खूप रडली. पवन आणि चारुशीलांचे एकमेकांवर तीन-चार वर्षांपासून प्रेम आहे हे आपल्याला माहीतच नव्हते. बरे झाले आपण वेळीच विषय सावरून नेला. नाहीतर पवनला आपण बोललो असतो तर घरात खूप मोठे रामायण झाले असते.

रविवारी निवृत्ती राव आणि त्यांच्या भावकीतले दोघेजण जाऊन पवन चे घर पाहून आले. इतके श्रीमंत लोक असतानाही किती विनम्रपणे आपल्या घरात बोलत होते. निवृत्ती रावांच्या मनात संपत रावांविषयी खूप आदर निर्माण झाला.

पवन चे घर पाहून सगळे आश्चर्यचकित झाले होते. भला मोठा बंगला. बंगल्याच्या आजूबाजूला खूप शेती. घरात नौकर चाकर आणि खूपच आधुनिक राहणीमान होते. निवृत्ती राव मात्र मनातल्या मनात खूप खूप झाले होते. आपली मुलगी एका सधन घरात पडत आहे याच्या त्यांना आनंद होत होता.

दोन्ही घरात लग्नाची तयारी चालू झाली. हो म्हणता दिवस पटपट निघून गेले आणि चारुशीलाने संपत रावांच्या आणि सुशीला ताईंच्या च्या घरी एकुलती एक सून म्हणून लक्ष्मीच्या पावलाने प्रवेश केला. पवनचा आणि चारुशीला चा राजा राणीचा सुखाचा संसार सुरू झाला. आता सगळे छान छान चालले म्हटल्यावर गालबोट तर कुठेतरी लागायलाच हवे…. आणि तसेच झाले.

क्रमश…..

2 thoughts on “चारुशीला 5 | Charushila”

Leave a Comment