चारुशीला 24
“ताई रुक्मिणी मावशी बद्दल तुझे काय मत आहे. जानू ने चारुशीला (Charushila)ला प्रश्न विचारला.
म्हणजे? चारुशीला ने जानूला विचारले. अगं म्हणजे त्या इतक्या वर्ष इथे काम करतात. त्यामुळे अवंतिकाची आणि रुक्मिणी मावशींची चांगलीच गट्टी जमलेली आहे. तर अवंतिका जे करते त्यामध्ये रुक्मिणी मावशींची साथ असेल का तिला?आता मात्र चारू जानू कडे पाहू लागली.
नाही ग मला नाही वाटत. तशा त्या खूप गरीब आहेत सकाळी सात वाजता येतात. त्यानंतर दुपारचा स्वयंपाक करून त्या दुपारी बारा वाजता घरी जातात आणि परत संध्याकाळी चार वाजता येतात. मला नाही वाटत या सगळ्यात अवंतिका बरोबर रुक्मिणी मावशीचा हात असेल. त्या दोघी बोलत असताना घरातला फोन वाजला. चारुशीला ने जाऊन तो फोन उचलला.
पवन ने फोन केला होता. “हॅलो चारू सॉरी मी तुला सकाळी सांगायला विसरलो आज माझ्या मित्राच्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे आपल्याला तिथे जायचे आहे संध्याकाळी तू आवरून ठेव मी आल्यानंतर आपण दोघे जाऊ. बाबांचे आणि माझे बोलणे झाले आहे.” हो चालेल. मी ठेवते आवरून असं म्हणून अवंतिकांनी फोन ठेवून दिला.
“जानू मी आणि पवन संध्याकाळी त्याच्या एका मित्राच्या घरी पूजेला चाललेलो आहोत. तू तुला घरी अवंतिका बरोबर राहावं लागेल. नाहीतर एक काम कर तू चल आमच्याबरोबर.” चारुशीला(Charushila)ने जानूला असे म्हणताच. ताई मी राहीन अवंतीका ताई बरोबर घरी त्या निमित्ताने मला तिच्याबरोबर जास्त वेळ घालवता येईल. तू आणि दाजी निश्चितपणे जा.” जानू चारुशीला ला म्हटली.
“थांब मी रुक्मिणी मावशींना सांगून येते. आज त्या संध्याकाळच्या स्वयंपाक लवकर करणार आहेत.” असं म्हणून चारुशीला किचनमध्ये रुक्मिणी मावशींना सांगण्यासाठी गेली. तिथे अवंतिका आणि रुक्मिणी मावशी यांची काहीतरी कुजबूज चालू होती. चारुशीला ला पाहून त्या दोघी एकदम गप्प झाल्या. “काही पाहिजे होते का तुला चारू “अवंतिका ने असे विचारतात चारुशीला काही नाही पाणी प्यायला आले होत. असं म्हणून तीने ग्लास भरून घेतला आणि रुख्मिणी मावशीकडे पाहत म्हणाली मावशी मी आणि पवन संध्याकाळी जेवायला नाही घरी. त्याच्या मित्राची पूजा आहे तिकडे चालोय आम्ही.”
“बरं “रुख्मिणी मावशी म्हणाल्या.”कोणात्या मित्राची ग पूजा?” अवंतिका ने विचारले. “माहित नाही आत्ता फोन आला होता. “असं म्हणून तिने पानी प्यायली आणि परत जानूच्या खोलीत आली. “ताई कोणती साडी घालणार आहेस? जानूने विचारले.खरं तर लग्न झाल्यापासून चारुशीलाचे नटून थटून आवरून असे बाहेर जाने झालेच नव्हते.चल जानू आपण साड्या बघूया.दोघी चारूच्या खोलीत आल्या.
खोलीचा दरवाजा उघडा होता. आतमध्ये ड्रेसिंग टेबलचे दरवाजे उघडेच होते. ड्रेसिंग टेबल मधले सगळे सामान उलटे पालटे झालेले दिसत होते. चारू एकदम आश्चर्यचकित होऊन पाहत होती. “ताई कोणी केल ग? “जानू हे नेहमी असच होत रहते नेहमी. असं म्हणून ती किचन मध्ये अवंतिका आणि रुक्मिणी मावशीला विचारायला आली. तर दोघीही तिथे नव्हत्या. जानू ही चारूच्या मागोमाग आली.
“ताई जाऊदे तू आवरून घे. तिकडून आल्यावर विचार तू त्यांना? चारू आवरण्यासाठी साडी शोधू लागली. तिने मस्त मरून कलर असलेली काठाची साडी बाहेर काढली. त्यावर लग्नातले मोजकेच दागिने बाहेर काढले. जानूने मस्त केस करून दिले. साडी पिन करून दिली.थोडासा मेकअप करून चारू तयार झाली.एकदम लक्ष्मी चे रूप दिसत होती चारू त्या साडीत.
आवरून ती देवघरात खोलीत आली तिथे असलेल्या सुशीला ताईच्या फोटोला तिने नमस्कार केला. तिला एकदम भरून आले. आज आपली सासू असती तर आपली खूप हौस मौज झाली असती. कोडकौतुक झाले असते. असे तिला वाटून गेले. लग्न झाल्यापासून काही ना काही घडत असल्यामुळे चारू एकदम घाबरून गेली होती.
बंगल्या बाहेर पवन च्या गाडीचा आवाज आला. ती बाहेर आली. पवन ने तिच्याकडे पाहिले आणि तो पाहतच राहिला. खूप दिवसांनी त्याने चारुला असे आवरलेले पाहिले होते. “खूप सुंदर दिसत आहे चारू ‘ पवन ने असे म्हणतात चारू एकदम लाजली. चल मीही पटकन कपडे बदलून येतो मग निघू आपण. चारूने पवन साठी कपडे काढून ठेवलेली होती. पवन ने त्याचे पटकन आवरून घेतले तोपर्यंत चारु पवनला चहा करण्यासाठी किचनमध्ये गेली.
तिथे तिला रुक्मिणी मावशी दिसल्या. “रुक्मिणी मावशी मगाशी कुठे गेला होतात तुम्ही?” कुठे नाही चारू इथेच होते का ग? रुक्मिणी मावशीनि विचारले.मगाशी मी आले होती तेव्हा तुम्ही इथे नव्हता? चारू म्हटली. मगाशी होय अवंतिका च्या खोलीत गेले होते. तिची खोली आवरायची होती म्हणून तिला माझी मदत पाहिजे होती. रुक्मिणी मावशींनी सांगितले.
चारू खूप सुंदर दिसत आहेस दृष्ट काढून टाक बाई… असं म्हणून रुक्मिणी मावशीने मिठाने चारूची दृष्ट काढली. चारुने चहा केला तोपर्यंत पवनही आवरून आला होता. दोघांनी चहा घेतला. जानू चा निरोप घेऊन चारू आणि पवन गेले. जानू अवंतिकाला शोधत तिच्या खोलीत गेली. अवंतिका कसले तरी पुस्तक वाचत बसली होती. ताई कोणते पुस्तक वाचतेस. जानूला खोलीत पाहून तिच्या कपाळावर आठ्या पडल्या.
“मला माझ्या खोलीत अचानक असे कोणी आलेले मला आवडत नाही. अवंतिका उद्धटपणे जानूला म्हटली. सॉरी ताई मी पुन्हा नाही असे करणार. मगाशी ताई चे ड्रेसिंग टेबल कुणीतरी उचकले होते. तिच्या सगळ्या सामानांची उलटा पालट केली. तुझ्याही खोलीत तसे काही झाले आहे का हे पाहण्यासाठी मी आले होते. जानुने प्रसंगअवधान साधून आणि उत्तर दिले.
“काय अवंतिका एकदम धक्का बसल्यासारखी म्हणाली. कुठे आहे चारू? ती आणि दाजी दोघेजण तर पूजेला गेले ना. जानू म्हटली. मला न सांगताच गेली ती?चारुशीला विचारायला सुद्धा आली नाही याचे अवंतिकाला खूप वाईट वाटले आणि रागही आला. जानू कधी तिच्या खोलीतून जाते असे तिला झाले.
“ताई चल ना आपण बाहेरून फिरून येऊ? असं म्हनून तिने अवंतिका चा हात धरला. “जानू मी थोडा वेळ बसणार आहे नंतर येते मग जाऊ आपण. अवंतिका ने असे म्हणताच जानू हॉलमध्ये बसायला गेली.
पवन आणि चारुशीला समीरच्या म्हणजे पवन च्या मित्राच्या घरी पूजेसाठी आले. समीर पवन चा कारखान्यात काम करत होता. खूप सुंदर असे घर त्याने बांधले होते. समीरचे आई-वडील पवन आणि चारुशीला चे स्वागत करण्यासाठी बाहेर आले.” पवन खूप सुंदर आहे रे बायको तुझी चारुशीला कडे पाहत समीरची आई म्हणाल्या. तशी चारुशीला लाजली.
सगळेजण घरात गेले. भरपूर पाहुणे मंडळी आलेली होती. समीर त्याची बहीण आणि आई-वडील. सगळ्या पाहुण्यांचे स्वागत करत होते. घर पाहत पाहत चारुशीला (Charushila)घराच्या मागच्या बाजूस आली. तिचे लक्ष कोपऱ्यात गेले आणि ती एकदम किंचाळलीच.
क्रमश….
🥰🥰
काय बरं दिसलं असेल चारूला 🤔