Comparison खरंतर हा विषय सगळीकडे खूपच कॉमन आहे. पण त्याचे गांभीर्य फारसे घेतलेले दिसत नाही. आपण आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करत असतो. शेजारणीची मुलं नातेवाईकांचे मुलं, मैत्रिणीची मुलं. त्या माझ्या मैत्रिणीच्या मुलांना पहा किती छान मार्क्स पडतात कायम 90% च्या पुढेच असतात. आणि तुम्हाला सगळं आईत.. देऊनही तुम्हाला इतके मार्क पडत नाही.
हे डायलॉग तर सर्रास ऐकायला येतात.
मैत्रिणींनो प्रत्येक मूल हे वेगळे असते. प्रत्येक मुलं कशामध्ये का होईना हुशार असतेच. तुमच्या मैत्रिणीचा मुलगा शाळेत चांगली टक्केवारी पाडत असेल पण बाहेरचे व्यवहारिक ज्ञान त्याला अजिबात नसेल तर काय त्याचा फायदा पण तुमच्या मुलाला मात्र बाहेरचे व्यवहारिक ज्ञान सर्व कळते पण शाळेत अजिबात हुशार नाही तर मग उपयोग जास्त कशाचा होतो.
आजकाल पुस्तकीं ज्ञान क्लास लावूनहीं मिळवता येते. पण बाहेर जगात वावरताना कसे वावरावे कोणत्या प्रसंगाला कसे सामोरे जावे याचे क्लास घेतले जात नाहीत पण तरीही काही मुले यात खूपच हुशार असतात. तुमच्या मुलीला स्वयंपाक येत नाही पण ती अभ्यासात हुशार आहे. कुणाला स्वयंपाक येतो तर शाळेत डोकं चालत नाही.
देवाने प्रत्येकाला बनवताना काही ना काही स्पेशल देऊनच बनवलेले आहे. त्यामुळे आपल्या मुलांची तुलना दुसऱ्या मुलांशी आजिबात करू नका.
कोणी विणकामात हुशार आहे कोणी रांगोळीत हुशार आहे कोणी मेहंदी छान काढते. कोणाला स्वयंपाक छान येतो. कोणाला घर टापटीत आणि स्वच्छ ठेवायला आवडते. कोणाला क्रिकेट खेळायला आवडते तर कोणाला बॅडमिंटन खेळायला आवडते. प्रत्येकाची आवड वेगळे असते आपापल्या आवडीच्या विषयांमध्ये ही मुले खूप हुशार असतात. पण आपल्याकडे आवडीचे विषय सोडून टक्केवारीच्या विषयांमध्ये जास्त लक्ष दिले जाते.
सध्या सगळीकडे मुलांमध्ये कॉम्पिटिशन आहे अगदी मान्य आहे पण याचा अर्थ असा नाही की आपण मुलांना फोर्स करून त्यांच्या कुवती पेक्षा जास्त मार्क त्यांना पाडायला लावू नका.
एक अनुभव share करते
माझ्या वडिलांचा एक्सीडेंट झाला होता तेव्हा मी पंधरा दिवस माझ्या वडिलांबरोबर ICU च्या बाहेर बसून असायची. तिथेच एका बाईचा मुलगा आहे आयसीयू मध्ये होता. दोन-तीन दिवसानंतर माझी आणि तिची चांगलीच मैत्री झाली. तिचा मुलगा बारावीला होता. सकाळी सहाला तो मुलगा जो बाहेर पडायचा तो रात्री साडेअकराला घरामध्ये यायचा. सकाळचे क्लास त्याच्यानंतर शाळा त्यानंतर दुपारी वेग वेगळ्या विषयांचे क्लास असं सर्व करून तो मुलगा थकून भागून घरी यायचा. कमी मार्क पडले की आई वडील त्याला खूप बोलायचे. अशाच एका सकाळी तो सायकल वर क्लासला जायला निघाला आणि एका गाडीने त्याला उडवले. मुलगा जाग्यावरच कोमात गेला.
त्याची आई मला रडून रडून सांगत होती. बाकीच्या मुलांसारखा 11 ते पाच शाळेत गेला असता. घरी येऊन आमच्याबरोबर गप्पा मारल्या असत्या एकत्र बाहेर गेलो असतो. तर आम्हाला त्याच्याबरोबर जास्त वेळ जगता आले असते. तिचे बोलणे माझ्या मनाला खूपच लागले. खरंच आपण आपल्या मुलांच्या मागे अभ्यासासाठी क्लास साठी हात धुवून मागे लागतो. पण ह्या सर्वांमध्ये तो मुलगाच किंवा मुलगीच धास्ती घेऊन जीवाचं काही बरं वाईट करून बसले तर काय करणार? सगळे जाग्यावरच राहिलं ना. आपली मुलं आहे तशीच आहेत ते आपण स्वीकारायला पाहिजे अर्थात ती वाया जाऊ नये याकडे आपण लक्ष देणारच. पण बाकीची मुल काहीतरी करतायेत म्हणून आपले मुलाने तेच केले पाहिजे अशी आवास्तव मागणी त्यांच्याकडे करू नका.
मुलांना बाहेरचे जास्तीचे क्लास लावण्यापेक्षा घरात एकत्र वेळ घालवणे कधीही चांगलेच.
@सीमाशंकर
Impressive
छान लिहिलंयत सीमाताई…! ⚘️
अप्रतिम सीमा👌🏻
आजची ही काळाची गरज आहे
आई वडिलांनी मुलांची immotional health ची काळजी घ्यायला हवी.
स्पर्धेच्या जगात धावता धावता त्यांचे स्वच्छंदी पणाने जगणेच राहून जाते, जे नंतर पूर्ण आयुष्यात कितीही पैसे कमावले तरी मिळत नाही.
Chan 👌