*कुत्र्यांचे पार्क* – Dog park आपण माणसांचे, लहान मुलांचे पार्क ऐकले असेल पण अनेक प्रगत देशात कुत्र्यांना खेळायला पण पार्क असते.
ऑस्ट्रेलियन लोकांना पाळीव प्राण्याची खूपच आवड आहे, त्यातलीत्यात कुत्रा हा पाळीव प्राणी त्यांची पहिली पसंती असतें. कुत्र्यांसाठी सरकारनेठिकठिकाणी Dog park तयार केले आहेत. सकाळ संध्याकाळ लोकं आपल्या कुत्र्यांना घेवून अशा पार्कला येतात. तिथे लोकांना बसायची सोय असते, कुत्र्यांना पाणी पिण्याची सोय असते. त्यांना अनेक गोष्टी खेळायला असतात.
कुत्र्यांनी जर शी केली तर तिथे प्लास्टिक पिशव्या ठेवलेल्या असतात त्या पिशव्या टाकायला बिन ( कचऱ्याचे डबे ) ठेवलेले असतात. जशी कारची अनेक मॉडेल असतात तशी अनेक प्रकारची कुत्री येथे पाहायला मिळतात. विशेष म्हणजे dog park ला येणारी कुत्री कोणाला चावत नाही तशी ती शिकवलेली असतात.
Dog park ला येऊन कुत्र्यांची जशी मैत्री होते तशी त्यांच्या पालकांची पण ओळख होते. Dog lover, cat lover असे लोकांचे व्हाट्सअप ग्रुप पण आहेत. ऑस्ट्रेलियात पांळीव प्राण्यांवर आधारित बरेच व्यवसाय चालतात. प्राण्यांचे खाद्य, औषधे बनवणाऱ्या कंपन्या, डॉक्टर आणि दवाखाने, त्यांची खेळणी, कपडे, बेल्ट, खाण्याची भांडी, झोपायचे बेड, कुत्र्यांची घर, अशा वस्तू विकणारी दुकानें. कुत्र्यांचे केस कर्तनालय ( सलून), Dog training, Dog बोर्डिंग, Dog वॉशिंग सेंटर आहेत. तसेच काही लोकं dog breading करून कुत्र्यांची पिल्लं विकायचा पण व्यवसाय करतात.
कुत्र्यांची स्पर्धा आणि dog show पण आयोजित केले जातात. जश्या बैलगाड्यांच्या, घोड्यांच्या शर्यती असतात तश्या कुत्र्यांच्या पण शर्यती असतात आणि मोठमोठी बक्षिसे ठेवलेली असतात. शर्यतीसाठी विशेष जातीची कुत्री वापरली जातात. आपल्याला जर एखादया जातींचे कुत्र्याचे पिल्लू आवडले असेल आणि ते दुसऱ्या राज्यात किंवा दूरच्या शहरात असेल तर पैसे पाठवल्यावर तो मालक ते पिल्लू आपल्याला विमानाने कुरियर करतात. पाठवताना त्याच्या सगळ्या लसी टोचून झालेल्याचे सर्टिफिकेट, bairth सर्टिफिकेट याची फाईल पण त्यासोबत असते. विमानात पाळीव प्राण्यासाठी तशी सोय असते. तसेच मांजर, पक्षी, मासे या पाळीव प्राण्यांच्या बाबतीतही अनेक व्यवसाय आहेत.
एकंदर बरेच मोठे अर्थकारण या पाळीव प्राण्यांवर चालते. खालीव्हिडीओ मध्ये असलेले dog park ची जमीन एका माणसाने खास कुत्र्यांसाठी दान केलेली आहे. अर्थात तो नक्कीच श्वान प्रेमी असला पाहिजे. त्याने आधीच मृत्यूपत्र तयार करून ठेवले होते. मृत्यूपत्रात त्याने आपल्या पश्चात या जागेवर dog park व्हावे अशी इच्छा लिहिली होती. त्याच्या मृत्यूनंतर सरकारने तेथे Dog park तयार केले आहे.