कस असत ना आपल्या जीवा भावाचं माणूस आपल्यातून अचानक नाहीस होत म्हणजेच त्यांचे घरातून अस्तित्व (Existence)अचानक नाहीसे होते आणि परत कधीच येत नाही. कितीही पहावेसे वाटले तरी तो चेहरा परत दिसत नाही. का बर असं? काही वेळासाठी का होईना पण परत त्यांना पाठवले पाहिजे होते ना….
एकदा माणूस गेलं की गेलं पुन्हा मागे येणे नाही.
बसायला आलेल्या चुलत सासवा आणि आजूबाजूची मंडळी गेल्यानंतर थोडंसं झोपावं म्हणून वरती बेडरूम मध्ये सुमी गेली. वरती गेल्यानंतर वरच्या हॉलमध्ये बसून मैत्रिणींनी दिलेल्या भेटवस्तू बाई खूप आपुलकीने बघत होत्या हे तिला लगेच आठवलं. अजूनही बाई प्रत्येक वस्तूला हात लावून बघत आहे असा भास तिला झाला. सुमीच्या प्रत्येक गोष्टीचा त्यांना कौतुक असायचं. गेल्यावर्षी जेव्हा सुमी भारतात आले होती तेव्हा बिनधास्त ग्रुपच्या मैत्रिणींनी खूप मोठे गेट-टुगेदर केले होते. तुम्ही बरोबर सोनल आणि मिनी सुद्धा आल्या होत्या. मैत्रिणींनी सुमिला खूप भेटवस्तू दिल्या होत्या.
बाईंना त्या इतक्या आवडल्या होत्या की सारख्या हात लावून त्या पाहत होत्या. “बया तुझ्या मैत्रिणी लय भारी आहे ग “असं म्हणून भेटवस्तूत आलेला गजरा डोक्यात माळून पाहत होत्या. इतक्या प्रसन्न आणि आनंदी असायच्या की त्यांच्याकडे पाहूनच खूप छान वाटायचे. बेडमध्ये जाऊन सुमीने डोळे झाकले.
डोळ्यासमोर इतक्या आठवणी आल्या कि तीला झोपच येईना. सोनल लगेच मागोमाग आली. ते जणू सुमी ला एकटीला भेटण्याची वाटच पाहत होती. वर आल्या आल्या तिने पुन्हा एकदा खूप कडकडून मिठी मारली. आता मात्र सुमीला राहावेना.” सोनल त्या दिवशी नेमके नक्की काय काय झाले मला सगळे सांग असे म्हणताच ती सांगू लागली.
त्यादिवशी नाही का मी तुम्हाला फोन केला होता. की बाईंना त्यांच्या भावाला भेटायला जायचे आहे. बाईंच्या भावाची बायपास सर्जरी झाली होती. त्यामुळे त्यांना सारखे वाटत होते की जाऊन भेटूया. सुमीने बाईंना लगेच भेटून या असे सांगितले होते. व्हिडिओ कॉल वर तसे सविस्तर बोलणेही झाले होते. पण मी फक्त दोन दिवस मी राहते असे बाई म्हटल्यावर सोनल आणि सुमी दोघी ही तयार झाल्या.
बाई फक्त दोनच दिवस राहायचं ह्या बोलीवर सोनल आणि सचिन दोघेही बाईंना सोडून आले.
बाईंचे भाऊ म्हणजेच मामा जवळच राहत होते अगदी पंधरा किलोमीटरवर. भावाला भेटल्या त्यांच्याबरोबर बोलल्या मामींनी खूपच आग्रह केल्यावर मनसोक्तपणे तीन चार दिवस राहिल्या. मामी बाईंना हवं नको ते पाहत होत्या. दररोज त्या व्हिडिओ कॉल वर बोलत होत्या. उद्या मी तुम्हाला घ्यायला येतो असे सचिन म्हणताच त्या हो म्हटल्या.
दुसऱ्या दिवशी म्हणजे बाईंना चाकणला परत यायचे होते त्या दिवशी मामींनी कुरडया करायचा घाट घातला होता. बाईंना असे पदार्थ करायचे म्हटले की खूप उत्साह असायचा. बाई राहा आजच्या दिवस उद्या जा असा मामींनी खूप आग्रह केला. बर तसे सचिनला फोनवर सांगितले की मी आजच्या दिवस राहते उद्या या तुम्ही मला घ्यायला.
उठल्यावर बाई पोहे करू का असे मामींनी विचारतात बाई हो म्हटल्या. बाईंना गोळ्या चालू असल्यामुळे सकाळी लवकर खायला लागायचे. हे मामींना माहित होते.
पोहे खाऊन बाई परत भावाबरोबर बाहेर बोलत बसल्या. दुपारी मामींनी कुरडया केल्या. आता जेवणाला काय करू असं विचारतात बाई म्हटल्या. धपाटे कर तू छान करतेस. असं म्हणताच मामींनी मस्त गरम गरम धपाटे केले. बाईंनी अगदी पोटभर धपाटे खाल्ले.
दररोज दुपारची झोपायची सवय असल्यामुळे बाई नेहमीप्रमाणे झोपल्या. साधारणता चार वाजता बाई झोपेतून उठल्या. आणि पुन्हा सगळेजण गप्पा मारत बसले. व्हय ग थोडं छातीत दुखायला लागले… असे बाईंनी म्हणताच मामी म्हंटल्या बाई मग दवाखान्यात जायचं का? नको बाई सचिनला आणि सोनल ला फोन कर माझा डॉक्टर वेगळा आहे आम्ही त्याच्याकडे जातो.
मामींनी लगेच सोनलला आणि सचिनला व्हिडिओ कॉल लावला. बाईंचे असे आधी मधी छातीत नेहमी दुखायचे. दहा वर्षांपूर्वी त्यांचा वॉल खराब झाल्यामुळे आर्टिफिशल वॉल्व replacement surgery झाली होती त्यामुळे प्रत्येक महिन्याला त्यांना डॉक्टरकडे घेऊन जात असत. छातीत दुखायला लागले की थोडा वेळ हवेत बसून छातीत चोळले की त्यांना बरे वाटायचे. असे नेहमी व्हायचे. काय होते बाई छातीत दुखतय का सोनलने असे विचारताच… व्हय ग थोडं दुखतंय डॉक्टर कडे जायचं का? असं विचारताच तुम्ही या मग जाऊ असं बाईं म्हणल्या… त्या डॉक्टरला म्हणावा गोळ्या बदलून दे.. असं बाईंनी म्हणतातच बर बाई आम्ही येतो मग आपण जाऊ. अबोलीला टाटा करत त्यांनी फोन ठेवून दिला.
सचिनने मामीला फोन करून जवळच्या दवाखान्यात घेऊन जा तोपर्यंत मी येतो… मग मी तसंच बाईला घरी घेऊन येतो बाई परत घरी जाणार नाहीत असं म्हटले.
सचिन जायला निघाला तेवढ्यात सोनलला काय वाटले काय माहित.. ती म्हटली थांबा मी पण येते.. शेजारी पोरांवर लक्ष ठेवायला सांगून दोघेही गाडीवर निघाले. मामांची मुलगी नुकतीच जॉब वरून घरी आली होती… आत्या बरं वाटत नाही का चल आपण दवाखान्यात जाऊ.. असं म्हणत तिने लगेच फोर व्हीलर गाडी काढली. दोघीजणी बोलत बोलत दवाखान्यात चालले. अबोलीचे दुखतय आता सचिन आल्यावर मी त्याच्याबरोबर परत घरी जाते असं त्या तिला म्हटल्या.
हासत खेळत नॉर्मल चेकअप साठी जायचे म्हणून दोघीजणी निघाल्या होत्या. बोलता बोलता बाईंनी राणीच्या म्हणजेच मामाच्या मुलीच्या खांद्यावर डोके ठेवले. ठेवले ते ठेवलेच परत उचललेच नाही. राणी सुद्धा एकदम गोंधळून गेली. नर्स असल्यामुळे तिच्याही ते लक्षात आले. सचिनला फोन करून कुठे आहेस असे विचारून लगेच ह्या दवाखान्यात ये असे सांगितले. लगेचच सचिन आणि सोनल दोघेही त्याला दवाखान्यात पोहोचेले आणि त्या दोघांनाही विश्वासच बसेना आता बाई फोनवर बोलल्या आणि लगेच कसे असे होऊ शकते. डॉक्टरांनी हार्ट अटॅकचे निदान केले.
“ताई…. इतक अचानक सगळं झालं. असं सांगून सोनल परत रडायला लागली. सुमी विचारात पडली इतक्या सहजासहजी बाई गेल्या. इतक्या सहजासहजी मृत्यू मिळणे हे फक्त पुण्यवंताच्याच पदरी असते. आणि बाई होत्या तशा…कधी कुणाबरोबर स्पर्धा नाही कुणाबरोबर वाईट बोलणे नाही. नेहमी हसून खेळून आणि एकदम प्रसन्न. घरातही आणि बाहेर सुद्धा.
क्रमश :