गोकुळ | Gokul

हरवत चाललेले गोकुळ (Gokul)आपल्या काळात म्हणजे आत्ताच्या काळात सांगायचे झाले तर Gen-Y चा काळ किंवा त्या अगोदरचा काळ खूपच श्रीमंत होता.

होय बरोबर वाचले तुम्ही 24 तास आपल्या बाजूला घरातील माणसे असायची. त्या माणसांच्या गर्दीत दिवसाची रात्र कधी व्हायची ते कळायचे सुद्धा नाही. नवरा बायको मध्ये मिलनाची एक हुरहुर असायची. कारण माणसांच्या गर्दीत दोघांनाही एकमेकांबरोबर जास्त बोलता यायचे नाही.

मग जन्म झाला Privacy नावाच्या शब्दाचा जन्म आणि सगळं कसं दुरावत गेलं. आपण स्वप्न बघू लागलो खूप मोठ्या घरांचे. बाहेरची बसायची खोली स्वयंपाकाची खोली, दाण्यांची खोली आणि एखादी जास्तीची खोली,वाडा असे स्वरूप असलेल्या घराचे. वन BHK टू BHK मेन्शन, बंगले, हवेली अशा नावात रूपांतर झाले आणि सुरू झाला माणसे हरवण्याचा प्रवास.

नवरा बायकोला एक खोली मुलाला एक खोली मुलीला एक खोली बरं त्याच्यात भर म्हणून अजून आले इन सूट टॉयलेट बाथरूम. प्रत्येकाच्या बेडरूम मध्ये टॉयलेट आणि बाथरूम. निदान टॉयलेटला बाथरूम ला जाताना तरी घरातल्या घरात माणसे दिसायची पण ती सुद्धा दिसेनाशी होऊ लागली.

प्रत्येकाच्या वेळा वेगळ्या काही वेळेस तर आठवडाभर सुद्धा घरातल्या घरात आई-वडिलांची आणि मुलांची गाठ होईनाशी झाली. आणि याला नाव देण्यात आले अत्याधुनिक जीवन पद्धती. घरे खूप मोठे मोठे झाले पण त्यातली माणसे मात्र दुरावत गेली. आता तर एवढी मोठी मोठी घरे झाली आहे की संध्याकाळचा स्वयंपाक झाल्यानंतर मुलांना जेवायला या असा आवाज देण्याची पद्धत जाऊन घरातल्या घरात त्याला फोन करून जेवायला ये अशी सांगायची वेळ आली.

हो कारण घरेच इतकी मोठी आहे की आईला मुलांच्या खोलीपर्यंत जायचा सुद्धा कंटाळा येऊ लागला. घर छोटे होते तेव्हा अगदी डोळ्यासमोर दिसणारी मुले त्यांच्या खोलीत बंदिस्त होऊ लागली So cold privacy च्या नावाखाली. मग पद्धत आली आपल्याच मुलांच्या खोलीत जायची वेळ आली तर दरवाजा वाजवून जायची. आणि त्याला नाव देण्यात आले Manners.

आता ते घर कमी आणि ऑफिस जास्त वाटू लागले आहे. दिवस दिवसभर नवरा बायको वर्क फ्रॉम होम च्या नावाखाली एकाच खोलीत बंदिस्त झाली. 24 तास एकमेकांची तोंड पाहून त्यांना इतका कंटाळा येऊ लागला की एकमेकांबद्दलचे आकर्षणच कमी झाले. नवरा बायको मधील मिलनाची आतुरता कमी झाली.

मग जन्म झाला नवरा बायको मध्ये कृत्रिम रित्या आतुरता वाढण्याची साधने. जिथे मूल होऊ नये म्हणून कुटुंब नियोजन ऑपरेशन केले जायचे तिथे आता मुलं व्हावी म्हणून नवनवीन तंत्रज्ञान येऊ लागले. माझ्या मुलाला किंवा माझ्या मुलीला मी किती मोकळीक देते. किती प्रायव्हसी देते किती वेळ बाहेर जाण्यास परवानगी देते. यावरून आईची कॅटेगरी ठरवण्यात आली. मॉडर्न Mom आणि साधी आई.

वर्षाला निघणाऱ्या मुलांच्या ट्रीप आता देश पर्यटनाच्या नावाखाली वाढत चाललेले आहेत. माझा मुलगा किंवा माझी मुलगी महिन्यातून किती वेळा परदेशात जाऊन परत येते. हे अगदी कौतुकाने आपण सांगतो. जोपर्यंत मुलांची लग्न होत नाही तोपर्यंत त्यांच्याबरोबर आनंदाने जगून घ्या. त्यांच्या सहवासात जितके राहता येईल तितके राहण्याचा प्रयत्न करा. मोठे झाल्यानंतर तर ते बाहेर जाणारच आहेत. तेव्हा मात्र आपण त्यांचे तोंड बघण्यासाठी आसुसलेले असू. आत्ताच त्यांना गोंजारून घ्या.

आता लग्न होऊन चाललेल्या मुलीला रडायला सुद्धा येत नाही. ती तिची चूक अजिबातच नाही कारण लग्नाच्या अगोदरच ती खूप वेळा बाहेर राहायला शिकलेली असते. त्यामुळे आई-वडिलांची गोकुळ सोडून जाताना तिला अजिबात ही वाईट वाटत नाही.

Red flag, Green flag च्या जमान्यात आपण पूर्णपणे अडकलो आहोत. आणि अतिशय अभिमानाने आपण हे शब्द उच्चारून आम्ही किती आधुनिक आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत.

कुठे गेले ते गोकुळ?गोकुळ तर फार पूर्वीच हरवले पण आता चार माणसांचे असलेले गोकुळ सुद्धा नष्ट होत चालले आहे. आता खरंच आपल्याला विचार करण्याची गरज आहे. आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपल्या गोकुळाला दुरावत तर नाही चाललो ना?

1 thought on “गोकुळ | Gokul”

Leave a Comment