History of Australian animals and birds| ऑस्ट्रेलियातील प्राण्यांचा आणि पक्षांचा इतिहास

सन 1788 मध्ये पहिल्यांदा ब्रिटिश जहाज ऑस्ट्रेलियात (Australia)आले. तेव्हा ऑस्ट्रेलिया अतिशय मागास आणि आदिवासी लोकांचा देश होता.

ऑस्ट्रेलियाच्या चोहोबाजूने समुद्र असल्यामुळे जगाशी त्यांचा संपर्क नव्हता त्यामुळे त्यांची प्रगती आजिबात झालेली नव्हती. हळू हळू ब्रिटिशांनी बंदुकीच्या धाकाने आपले साम्राज्य वाढवायला सुरवात केली. काम करण्यासाठी लोकं कमी पडू लागली म्हणून सुरवातीला इंग्लंड मधील तुरुंगातील कैदी ऑस्ट्रेलीयात आणले गेले. त्यांच्याकडून शेतीची कामे व खाण काम करून घेत असत. चोहोबाजूने पाणी असल्यामुळे पळून जायला काही मार्ग नव्हता.

शिक्षा संपल्यावर त्यांना इंग्लंडवरून कुटुंब आणून ऑस्ट्रेलियात राहण्यास परवानगी दिली गेली. जशी जशी प्रगती होत गेली तसें यूरोप आणि इंग्लंड मधून लोकं इकडे येऊ लागले. इंग्रजांच्या आधी ऑस्ट्रेलियात खूप कमी प्राणी होते त्यात मुख्यता कांगारू आणि शहामृग, हेच होते. इंग्रजांनी मेंढया, गाई, घोडे, कोंबड्या, बदक हे यूरोप मधून ऑस्ट्रेलियात आणले. त्याचे कारण दूध आणि अन्न हेच होते. त्यानंतर इंग्रजांनी भारत आणि अफगाणिस्तान मधून उंट ऑस्ट्रेलियात आणले.

सामान वाहतूक आणि प्रवासात उपयोगी पडावे हा त्यामगील उद्देश होता. त्यानंतर उंटाची संख्या वाढतच गेली. या उंटांची संख्या दर 9 वर्षांनी डबल होत आहे.आज घडीला उंटाचा काही उपयोग राहिलेला नाही त्यामुळे सगळे उंट हे जंगली झाले आहेत त्यांना कोणी मालक नाही. जगात सगळ्यात जास्त उंट असलेला देश म्हणून ऑस्ट्रेलिया ओळखला जातो. सध्याच्या घडीला सर्वसाधारन 10 लाख जंगली उंट ऑस्ट्रेलियामध्ये आहेत आणि ते सरकारची एक मोठी डोकेदुखी बनली आहे. अन्न आणि पाण्याच्या शोधात ते मानवी वस्तीत येऊन त्रास देतात. वर्षानुवर्षे उंटाची संख्या वाढतच आहे.

सुरवातीला इंग्रजांनी यूरोप मधून ससे ऑस्ट्रेलीयात आणले होते. मांसाहार आणि शिकारीचा छंद जोपसण्यासाठी ते आणले गेले परंतु त्यांची संख्या इतकी वाढली की ते शेताची नासधूस करू लागले मग सश्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी इंग्लंडमधून कोल्हे आणले गेले. आता कोल्हे ही भरपूर झाले आहेत. शेतात पिकांवरील किटकांवर नियंत्रण करण्यासाठी भारतातून चिमण्या, साळुंकी, आणि मोर हे पक्षी आणले गेले. आज ते ऑस्ट्रेलियात कायमचे रहिवाशी झाले आहेत आणि त्यांची संख्या वाढत आहे परंतु चिमण्यांची संख्या घटत आहे. चिमणी हा पक्षी जगात दुर्मिळ होत चालला आहे.

कुकूबारा हा पक्षी ऑस्ट्रेलिया च्या पुर्वेकडील भागात जास्त पाहायला मिळतो. ऑस्ट्रेलियातील नैऋत्येला आणि ऑस्ट्रेलियातील पश्चिम भागातही हे पक्षी जास्त पाहायला मिळतात. हे पक्षी “laughing call” म्हणजे जेव्हा हे पक्षी मोठ्याने ओरडतात तेव्हा त्यांचा आवाज हसणाऱ्या माणसांसारखा येतो. 1906 साली हे पक्षी पश्चिम ऑस्ट्रेलियात सापांना कंट्रोल करण्यासाठी आणण्यात आले. हे पक्षी क्वीनसलँड, न्यू साउथ वेल्स, व्हिक्टोरिया साउथ ऑस्ट्रेलिया या ठिकाणी पाहायला मिळतात.

Leave a Comment