मैत्री मधील गैरसमज | Misunderstanding Between Friends

आपण सगळीकडे पाहतो खूप आपल्या मित्र मैत्रिणी असतात. काही मैत्रिणींमध्ये misunderstanding झालेले असतात.काही खूप जीवाभावाच्या असतात काही कॉलेजच्या असतात काही ग्रुपच्या असतात काही जॉब वर वरले असतात किंवा काहीजण नवीन झालेल्या असतात.
कितीतरी वेळेस आपल्याला काही मैत्रिणींचे किंवा मित्राच्या काही गोष्टी अजिबातच पटत नाहीत. मग आपण दोन-तीन मैत्रिणीकडे तिच्याविषयी किंवा त्याच्याविषयी बोलतो. बघ ना ती किती मोठ्याने हसते….ती किती मोठ्याने बोलते… वगैरे वगैरे.
मला काय वाटतं ह्या गोष्टी आपण दुसऱ्या चार चौघींकडे बोलण्यापेक्षा डायरेक्ट जिच्याविषयी आहे तिच्यापाशी जाऊन बोललो तर… कदाचित तिला तेव्हा त्याला त्याविषयी माहिती नसेल… की खरंच आपण खूप मोठ्याने बोलतो किंवा आपण एखादा ड्रेस घालतो तर तो आपल्याला चांगला नाही दिसत… आपण जर डायरेक्ट तिला जाऊन सांगितले तर तिची चूक तिच्या लक्षात येईल. कदाचित ते तिला चुकीचे वाटणारही नाही तो तिचा प्रश्न. पण जिची चूक आहे तिला डायरेक्ट जाऊन सांगणे सर्वोत्तम. कारण चार चौघींना त्या चुका सुधारायच्या नाही तर जिच्या विषयी आपण बोलतो तिला ती सुधारायची आहे हो कि नाही.
एखाद्या एखादा आपला मित्र किंवा मैत्रीण आपल्या वरती रुसलेले आहेत. तर सारखे सारखे फोन करून किंवा मेसेज करून त्याला किंवा तिला आणखी इरिटेट करू नका. त्यांना स्वतःचा वेळ द्या तुम्हीही थोडासा वेळ घ्या. कदाचित त्यामुळे दोघांच्याही मनात एकमेकांविषयी पुन्हा मैत्री तयार होईल. आणि समजा नाहीच तयार झाली मैत्री पुन्हा तर असे समजा की आपली मैत्री इथपर्यंतचीच होती. स्वतःलाही त्रास करून घेऊ नका आणि त्यांनाही त्रास देऊ नका. खूप छोट्या छोट्या आणि साध्या गोष्टी आहेत मैत्री टिकवण्यासाठी.
मैत्रिणी किंवा मित्रांनी दिलेली शंभर सुख आपण लक्षात ठेवत नाही. पण एखाद्या दिलेले दुःख मात्र आपण कायम लक्षात ठेवतो. असं का? हा प्रश्न जर स्वतःलाच विचारला तर मैत्री असो किंवा कोणतेही नाते असो अजिबात तुटणार नाही.

Leave a Comment