खर तर मुली (Daughter) घराचा आनंद असतो.
मंगळी माया माया खरं तर नावाप्रमाणेच मायाळू. आई वडिलांवर तिचा अतिशय जीव .पहिलं अपत्य म्हणून तसे लाड कोड झाले पण वय वाढले तशी जबाबदारीही वाढली.केशव आणि निर्मला यांची माया ही कन्या. पहिलीच मुलगी झाली म्हणून सासरची मंडळी निर्मला वर नाराज होती पण केशव ने निर्मलाला धीर देऊन साथ दिली.
त्यामुळे बाकीच्या मंडळींचे काही चालले नाही.आई वडील तिच्यावर प्रेम करत होते म्हणून त्यांनीच आवडीने तिचे नावं माया ठेवले.माया तिन वर्षाची झाल्यावर निर्मला पुन्हा आई होणारं होती. त्यावेळी मात्र केशव सहीत सगळयांना अपेक्षा होती की मुलगा हवा. निर्मलाला मात्र या गोष्टीचे टेन्शन आले होते कारण या वेळी केशव ही अपेक्षा ठेवून होते.नऊ महीने कसे गेले कळलेच नाही आणि अगदी दिवाळीच्या धनत्रयोदशी च्या दिवशीच निर्मला बाळंत झाली आणि तिला पुन्हा मुलगी झाली…खरे तर सगळे नाराज होते फक्त दिवस छान आहे या एका गोष्टीवर थोडी श्रद्धा ठेवून सगळ्यानी बाळाचे स्वागत केले.
केशवनेही नाराजी नाही दाखवली. दुसरे बाळंतपण होते म्हणून निर्मला सासरीच होती.नॉर्मल डिलिव्हरी झाल्यामुळे तिला तिसऱ्या दिवशी घरी सोडले… दिवाळीची धामधूम सुरु होती आणि पाडव्याच्या दिवशीच निर्मला बाळाला घेऊन घरी आली…अर्थात दुसरे अपत्य असल्यामुळे बारसे वगैरे करायचे नव्हते पण दिवाळीचे दिवस असल्यामुळे सगळ्यांनी बाळाला लक्ष्मी नावाने हाक मारायला सुरुवात केली आणि पुढेही तेच नावं कायम राहिले.आता मायाला खेळायला कोणीतरी बरोबर आले होते. म्हणून ती खुश होती. दोनच दिवसात केशव चे प्रमोशन झाले आणि त्यामुळे तर लक्ष्मी वर तर कौतुकाचा वर्षाव होत होता.माया लहान असल्यामुळे या गोष्टीचा तिला आनंदच व्हायचा की सगळे बाळाचे लाड करत आहेत. खरे तर केशव आणि निर्मला यांना दोन्हींही मुली सारख्याच होत्या… पण जसजसे लक्ष्मीचे कौतुक होत होते तसतसे यांचा पण तिच्या कडे बघण्याचे दृष्टीकोन बदलला गेला…आता दोघी मोठ्या होत होत्या… शाळेत जात होत्या.
माया तशी पहिल्यापासून समजूतदार होती. त्यामुळे लक्ष्मी ने काही हट्ट केला आणि तिला ती गोष्ट मिळाली तरी मायाला वाईट वाटत नव्हते. आणि तसे तिने कधी बोलून ही नाही दाखवले.बघता बघता दोघींची शिक्षणे पूर्ण होऊन नोकरीला जाऊ लागल्या. माया ने सरकारी नोकरीला पसंती दिली तर लक्ष्मी ने computor इंजिनियर म्हणून जॉब स्वीकारला.केशव राव पण आता रिटायरमेंट ला आले होते. त्यामुळे मायाचे लग्न उरकून घ्यावे असा विचार त्यांनी केला. तसे त्यांनी निर्मला ताईंना बोलूनही दाखवले. मायानेही स्थळ बघा म्हणुन सांगितले.खरे तर त्यांनी आजपर्यंत दोन्ही मुलींची कुंडली कोणाला दाखवली नव्हती. फक्त ती असावी म्हणून केशवरावां च्या आईनेच त्या वेळी ब्राह्मना कडे जाऊन कुंडली बनवली होती.आता स्थळ बघायला सुरुवात केली तर सगळे लोकं पत्रिका आणि फोटो मागवून घेत होते. त्यामुळे साडी नेसून माया ने बरेच फोटो काढले होते आणि तिला साडी नेसायला आवडायची ही.फोटो पत्रिका पाठवली की लोकं म्हणायचे मुलगी तर छान आहे, आम्हाला पसंत आहे, पत्रिका बघितली की कळवतो… आणि मग पत्रिका जुळत नाही या सबबी वर सगळे थांबायचे.
केशवराव आणि निर्मला ताईंना कळलेच नाही असे का होते. एक दिवस निर्मला ताई केशव रावांना म्हणाल्या,”आपण जाऊ या का एखाद्या गुरुजींना पत्रिका दाखवायला”? तसे तर केशवराव इच्छुक नव्हते पण त्यांनी निर्मला ताईंसाठी होकार दिला.दोघे गुरुजीं कडे गेले. गुरुजींनी पत्रिका बघितली आणि सांगितले की मुलीला मंगळ आहे त्यामुळे मंगळ असणारच स्थळ बघावे लागेल. आता मात्र हे दोघे थोडे चिंतित झाले. दोघेही तिथून बाहेर पडले पण माया समोर ह्या बद्दल काहीच म्हणायचे नाही असे त्यांनी ठरवले.अशातच दोन तिन वर्ष गेली. आता लक्ष्मी चे ही लग्नाचे वय झाले. परंतु लक्ष्मी IT मध्ये काम करत असल्यामुळें तिने कंपनीतल्याच एका मुलावर प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणारं आहोत असे सांगितले…पहिल्यापासूनच लाडकी असल्यामुळें तिला सहज संमती मिळाली आणि मयानेही समजुतीने घेऊन तिचे लग्न आपणं करुन देऊ असे आई बाबांना सांगितले. खरे तर केशवराव आणि निर्मला ताईंना त्या क्षणी मायाचा अभिमान वाटला…लक्ष्मी चे लग्न थाटामाटात पार पडले…. तो पर्यंत समाजात माया ला मंगळ आहे याची चर्चा सुरु झाली होती आणि ती मायाच्या कानापर्यंत आली होती. तिनेही आई बाबांना जाणवू दिले नाही की तिला ही गोष्ट समजली आहे….आता घरात मायाने सांगितले की माझे लग्न हा विषय आता आपण बंद करू या. माझी सर्व्हिस सुरु आहे. मी तुमच्यावर कधीच अवलंबून नाही रहाणार आई बाबा… तुम्ही माझी काळजी करू नका दिवस असेच जात होते… वर्ष दोन वर्षाचा काळ लोटला. आताशा माया ऑफिस मधुन आली की थोडी फ्रेश वाटत होती. तिच्या चेहऱ्यावरच्या टेन्शन ने आता हास्य घेतले होते. केशव रावांना आणि निर्मला ताईंना हे बघून बरेच वाटायचे.अशातच एका संध्याकाळी ऑफीस मधुन येताना माया बरोबर एक व्यक्ती आली. मायाने आई बाबांना ओळख करुन दिली,”हे आमच्या डिपार्टमेंट मधे आलेले मनिष सर”.मनिष ने दोघांना वाकून नमस्कार केला. सरकारी नोकरी असल्यामुळें मनिष ची बदली होऊन तो मायाच्या ऑफीस मध्ये आला होता.
अर्थातच मायाचे साहेब म्हणुन.ऑफिस मध्ये हळु हळू स्टाफ शी ओळख झाली आणि मग एक सिनियर मॅडम ज्यांचे नावं मधू कुलकर्णी होते. त्यांनी मनिष ला माया बद्दल सांगितले.. हळु हळु माया आणि मनिष यांच्यात संवाद होऊ लागला.मग कुलकर्णी मॅडम ने एक दिवस माया ला सांगितले की, “मनिष सर तुझ्या बद्दल लग्ना साठी विचार करत आहेत”. माया त्यावेळी खूप रडली आणि तिने सांगितले की, “माझ्या पत्रिकेत मंगळ आहे. मी कोणाच्याही आयुष्यात गेले तर त्या व्यक्तीचे काहीही वाईट होऊ शकते”. असे म्हणुन ती पुन्हा रडू लागली. कुलकर्णी मॅडम नी मनिष सरांना ही गोष्ट सांगितली. मनिष सर म्हंटले की होणाऱ्या सगळ्या परीस्थितीला मी जबाबदार राहील आणि मी तसे लिहून देतो.हळु हळु माया त्यांच्याशी बोलताना मोकळेपणा ठेवु लागली. साधारण चार महिन्यांनी आता आज मी घरी येऊन आई बाबांना भेटतो असे सांगितले. त्या प्रमाणे आज् दोघे घरी आले… बोलणी झाली…त्यानेही त्याच्या आई वडिलांना या बाबतीत सांगितले…. ते थोडे काळजीत होते पण मुला पुढे काही बोलू शकले नाही.हो नाही करता करता लग्न करायचे ठरले..
माया मनातून घाबरलेली होती पण मनिष सतत तिला समजावत होता, “काही होणारं नाही, कारण माझा जन्म आईच्या आईकडे झाला आणि ते ही घरात, एका खेड्यात. त्यामुळे माझी तर कुंडली च नाही. जन्म तारखेवर आणि साला वर ऍडमिशन घेतली. त्यामुळे पत्रिका जुळवायचा प्रश्नच नाही…. मने जुळली तर आपण प्रत्येक संकटावर एकमेकांच्या सोबतीने मात करू”.मायाला खूप धीर आला.. लग्नाची तारीख ठरली. लग्न पार पडले… तिला प्रत्येक दिवस खूप टेन्शन यायचे. मनिष आणि ती बरोबरच ऑफीस ला जात होती म्हणुन तिला तेव्हढी काळजी नव्हती. सहा महिने झाले लग्नाला आणि मग माया थोडी रिलॅक्स रहायला लागली.बघता बघता मायाचे लग्न उशिरा होऊन आता ती प्रेग्नंट राहिली होती तर लक्ष्मी प्लॅनिंग करत होती….खरचं मायाच्या आयुष्यात मनिष च्या रूपात एक सच्चा जोडीदार आला आणि संसारात सगळे मंगल मंगल घडत होते.