आज रमेश सरदेसाई यांचा कंपनीतला शेवटचा दिवस, त्यामुळे ऑफीस तर्फे त्यांना निरोप देण्यात येणारं होता. (Retirement)त्या साठी आयोजित केलेल्या कार्य क्रमाला कुसुम ताईंना म्हणजेच रमेश रावांच्या अर्धांगिनीला आमंत्रित करण्यात आले होते.आज घरात एकच वातावरण होते की एकतर रमेश राव त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून थोडे निवृत्त होऊन नातवांसोबत वेळ घालवणार होते आणि राधा ताईंना थोडा वेळ देणारं होते.दोन्ही सूनांनी आग्रह धरला आई आज माझी पैठणी तुम्ही नेसायची तर मोठी सून अंजू म्हंटली की आई मी मोठी ना मग माझी पैठणी तुम्ही नेसायची… खरे तर दोन्ही सूना बहिणी प्रमाणे रहात होत्या…
त्यामुळे त्यांच्यात कधी तू तू मैं मैं नसायची. धाकट्या सुनेच्या पैठणीचा कलर खूप छान होता… अगदी जांभळा रंग उठून दिसणारं होता म्हणून अंजुच म्हंटली,” आई तुम्ही मेघनाची पैठणी नेसा”.रमेश रावांनी आवाज दिला,”चला मंडळी “आणि सगळे जण निघाले. मोठ्या मुलाने गाडी काढली तर धाकटा मुलगा आणि सून घरीच थांबले होते.ठरलेल्या वेळी सगळा स्टाफ हजर होता हॉल मध्ये. रमेश राव आणि कुसुम ताई गेल्या नंतर सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचे स्वागत केले.
निवेदिकेने प्रस्तावना सादर केल्या नंतर कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. देशपांडे सरांना विनंति केली की त्यांनी रमेश रावांचा सत्कार करावा आणि सौ. देशपांडे यांनी कुसुम ताईंना साडी ओटी आणि गजरा देऊन त्यांचेही आभार मानले.देशपांडे साहेबांनी बोलण्यास सुरुवात केली, रमेश रावांनी त्या कंपनी साठी किती मेहनत घेतली, वेळेला एखाद्या भावा प्रमाणे ते कसे खंबीर पणे उभे राहिले. हे सगळे ऐकत असताना समोर बसलेला रमेश रावांचा मुलगा आणि सून यांच्या डोळयात अश्रू दाटले आणि आपल्या वडीलांप्रती आदर वाढला.
कुसुम ताई स्टेज वर बसल्या होत्या आणि त्यांच्याही डोळ्यात ते आनंदाश्रू दिसले.खरे तर कुसुम ताईंनी घर सांभाळले म्हणून आज ते घर एक संध राहिले.रमेश राव कामा प्रति एकनिष्ठ असल्यामुळें पारिवारिक जबाबदाऱ्या त्यांनी कधी पार पाडल्या नाही कारण त्यांना विश्र्वास होता की कुसुम हे सगळं सांभाळू शकते.पण कुसुम ताईंना ही कधीतरी वाटले होते की आपल्या नवऱ्याने कधी तरी आपली बाजू समजून घ्यावी, कौतुक करावे पण तसे कधी होत नव्हते.त्यांनी दोन्ही मुलांना छान घडवले. आर्थिक बाब सगळी रमेश राव सांभाळत होते तरी मुलांचे संगोपन आणि सासू सासऱ्यांची सेवा या गोष्टी कुसुम ताई सांभाळत होत्या. नंतर नंतर तर त्यांनी रमेशरावांकडून कुठलीच अपेक्षा केली नाही.
देशपांडे सरांचे भाषण सुरु असताना कुसुम ताईंच्या नजरे पुढून तो अडोतिस वर्षाचा कालखंड सरकला होता.आता वेळ होती रमेश रावांनी मनोगत व्यकत करण्याची. माईक चा ताबा रमेश रावांनी घेतला. कंपनीतल्या प्रत्येक व्यक्तीचे कौतुक आणि आभार मानून खऱ्या अर्थाने त्यांचे मनोगत सुरू झाले.”उपस्थित मंडळींनो, खरे तर आज जो काही मी तुमच्या समोर उभा आहे तो फक्त आणि फक्त माझी अर्धांगिनी कुसुम हिच्या मुळे”त्यांचे हे वाक्य ऐकले आणि कुसुमताई अवाक होऊन त्यांच्या कडे बघत राहिल्या.पुढे ते म्हणाले, “मी जेव्हा ऑफीस मधुन घरी जायचो तेव्हा फक्त जेवण करून, थोडे मुलांशी बोलून झोपत होतो.
मी कधीही कुसुमला विचारले नाही की दिवसभरात तुला काही अडचण आली का? तू जेवली का? तुझी तब्येत बरी आहे का?खरे तर हे माझे कर्तव्य होते पण तिच्यावरचा विश्वास मला बळ देत होता म्हणुन मी निर्धास्त होतो. माझे वृध्द आई वडील होते खरे तर त्यांची सेवा अथवा त्यांना काही हवे नको बघण्याची जबाबदारी माझी होती. पण त्याही गोष्टी कुसुम इतक्या प्रेमाने सांभाळत होती त्या मुळे खरे तर माझ्या आई वडिलांचे आयुष्य वाढले होते. त्यांना काय हवे काय नको हे तर सांभाळत होतीच पण कधी कधी त्यांची चीड चीड पण सहन करत होती. एवढी क्षमाशील, धैर्य शिल पत्नी मला लाभली या प्रती मी त्या परमेश्वराचे सदैव आभार मानतो. उपस्थितांचे डोळे ही आता पाणावले होते.
एका यशस्वी पुरुषा मागे एक स्त्री असते या पंक्ती ला खऱ्या अर्थाने न्याय दिला तो कुसुम ताईंनी असे प्रत्येकाला वाटत होते.अनाथ आश्रमात वाढणाऱ्या कुसुम ताईंना नात्याची खरी ओळख झाली ती लग्ना नंतर. रमेश रावांचे वडील हे सामाजिक काम करत असताना एका अनाथ आश्रमात गेले होते तेव्हा कुसुम ताईंनी त्या आश्रमा तर्फे होणाऱ्या कार्यक्रमात त्यांच्या साठी लोकरीची शाल विणून दिली होती आणि आश्रमाच्या संचालकांनी ती गोष्ट रमेश रावांच्या वडिलांना सांगितली कार्यक्रम झाल्यावर रमेश रावांचा वडिलांनी आश्रमाच्या संचालकांना विचारले होते की तुमची परवानगी असेल तर कुसुम ला आम्ही आमची सून म्हणून स्वीकारू शकतो का? एवढ्या प्रतिष्ठित माणसाने अशी मागणी करावी आणि आपण नाही कसे म्हणावे? संचालकांनी लगेच होकार दिला.
रमेश राव वडिलांच्या शब्दा बाहेर नव्हते. त्यांनीही संमती दिली आणि कुसुम ताई या घरात आल्या. सासू सासऱ्यांनी पण मुली सारखा जीव लावला त्यामुळेच त्या या घरात रमल्या आणि त्यांनी आपल्या परिवारासाठी सर्वस्व दिले”. खरे तर खूप अबोल असणारे रमेश राव आज खूप मोकळे होत होते. असंख्य साठलेल्या गोष्टींना आणि आठवणींना त्यांनी आपल्या शब्दाने उजाळा दिला होता आज. आयुष्याची घडी बसवताना घरच्या लक्ष्मी ची साथ असणे महत्वाचे आहे हे त्यांच्या आईच्या शिकवणीचा धडा खऱ्या अर्थाने कुसुम ताईंनी गिरवला होता.
रमेश राव आता खरचं भावनिक झाले होते. तो सोहळा एका कंपनीचा नसून एका परिवाराचा वाटत होता कारण रमेश रावांचे तिथल्या प्रत्येक सहकाऱ्या बरोबर खूप छान संबंध होते.रमेश राव पुढे म्हणाले,”मुले कधी मोठी झाली विचारांनी आणि शिक्षणाने हे माझे मलाही कळले नाही. लग्नाची वय झाली आहे तसे कुसुमनेच पुढाकार घेऊन दोन सूनांची निवड केली. आणि खऱ्या अर्थाने आमचा परिवार पूर्ण झाला.दोन्ही सूना अतीशय गुणी आणि कुसुम बरोबर त्यांचे असणारे संबंध बघता मला खरच खूप बरे वाटते..””बघता बघता घरात नातवाचे आगमन झाले पण मी त्या आनंदाला ही मुकलो होतो.
कारण ऑफीस चे काम हे माझे दैवत मी मानायचो.आज या दिवशी बाकी आयुष्या बद्दल मला काहीच बोलायचे नाही, पण माझ्या धर्म पत्नी बद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि दोन्ही मुलं आणि सूनांचेही खूप कौतुक करतो की त्यांनी मला आणि माझ्या व्यस्तातेला समजून घेतले” आता मात्र कुसुमताई खूपच गहिवरल्या.त्यांच्या सुनेने स्टेज वर जाऊन त्यांना सावरले त्याचं प्रमाणे मिसेस. देशपांडे यांनीही त्यांची पाठ थोपटली.
सुग्रास अशा भोजनाची मेजवानी रमेश रावांचा मुलाने पूर्ण स्टाफ साठी आयोजित केली होती. त्याचा सगळ्यांनी आस्वाद घेतला.कार्यक्रम संपला आणि सगळे घरी निघाले. घरी पोहचताच धाकट्या मुलाने आणि सून बाईने स्वागताची जंगी तयारी केली होती . पायघड्या आणि फुलांचे डेकोरेशन केले होते.हळद कुंकू ओले करुन त्याची ताट बाहेर आणली गेली आणि कुसुम ताईंनी त्यात पाऊल ठेवून त्यांनी त्या पावलाने घरात पदार्पण केले दोन्ही सुनांनी त्या पावला वर हात ठेवून तो हात स्वतः च्या डोक्यावर फिरवून त्यांचा आशिर्वाद घेतला दोघांचे पुन्हा औक्षण करण्यात आले.
दोन्ही मुलांनी बाबांना एक पाकीट दिले ज्यात होते युरोप टूर ची दोन तिकिटे तर दोन्ही सुनांनी कुसुम ताईंची ओटी भरली त्यात त्यांनी त्यांच्या साठी घेतलेले चार पंजाबी ड्रेस होते जे त्यांना युरोप ला जातांना उपयोगी पडणार होते.घरात मदतनिस म्हणून काम करणारी यमु पण दोघांचे औक्षण करायला आली…. औक्षण झाले आणि म्हंटली चला सगळे उभे रहा वहिनी साहेब आणि साहेबांच्या बाजूने मी फोटो काढते.सगळे हसायला लागले….. कुसुम ताईंनी दोन्ही सुनांना जवळ घेतले तर नातू मांडी वर घेतले, रमेश रावांनी दोन्ही मुलांच्या खांद्यावर हात ठेवले आणि यमु ने आवाज दिला एक दोन तिन आणि क्लिक चां आवाज आला हा हसरा परिवार एका फोटोत कैद झाला.