सपान |Dream Part 11

“आल्या कां तोंड काळ करून…आग.. लॉक आमच्या तोंडात शान घालायला लागल्यात. (Dream)

नवऱ्याला दिलं ममईला पाठवून आणि ही फिरती गावजाणी सगळ्या गावभर “आत्या तोंडाला येईल ते बोलत होत्या.

“आत्या थोडं काम होतं म्हणून गेले होते. आख्या गावाला वरडून गोळा कायाला करता. घरात चला मी सगळं सांगते “हौसा अगदी काकूळतिला येऊन सांगत होती.“आयवं आज्जी मारिन कां व आता आपल्याला” सपनी जोर जोरात रडू लागली.

हौसा सपनी चा हात पकडून घरापुढे आले आणि कडी उघडून आत गेली. तशी आत्या तावातवान आत शिरली आणि तिच्या केसांना पकडून तिला बाहेर ओढू लागली. सपनी जोराजोरात रडू लागली.

“आत्या तुमचा मान ठेवती म्हणून अजून गप हाय. असलं बालंट मायावर घेण्याआधी मला काय हाय…. ते तर सांगू दया. हौसा विनंती करत होती. तसा हौसाचा मोठा भाया आत शिरला आणि हौसाच्या एक गालफाडित ठेवून दिली. हाऊसा वेदनेने विव्हळली.

सपनी हौसाला मिठी मारू लागली. “आव बाई वर हात उचलला… तुमी माणूस हाय का हैवान तुमी” मूत पिऊन यायचं आणि तमाशा करायचा काय येत तुम्हास्नी दुसरं “ हौसाची जाव कमळी हौसला जवळ घेत नवऱ्यावर ओरडत होती.

तसा त्यांन तिच्यावर हात उचलला आन कमळीण त्याल हातानं लांब ढकलून दिलं. खूप दारू पिल्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला.“कमळे लई माजली व्हय ग नवऱ्याला ढकलून दिलं कुठ फेडशील हे पाप “आत्या कमळीकडं रागानं बघत बोलली.

“तुम्मी पण एक बाईच हाय ना. मंग दुसऱ्या बाईला असं मारताना बघून तुमचं काळीज कसं फाटत नाय.” कमळी रागातच आत्याकडे पाहत बोलली. मंग काय तिची आरती ववाळू का… राती रुतीला लोकाच्या घरी शान खायला जायला लाज नाही वाटत का? आत्या अतिशय घाण शब्दात हौसा कडे पाहून बोलली.

“आत्या असलं वंगाळ बोलाया कस जमत व.सवताची…सून हाय ना? “नाना इथं नाय म्हणून तुमी तिला कायबाय बोलाया लागला.” कमळी आता खूपच चिडली होती. मोठ्या जावचं असं झालेलं हाल कमळी ला बघवत नव्हत. आज आपल्या मोठ्या जावं वर हात उचललाय उद्या आपल्यावरही तीच वेळ येऊ शकते याचा अंदाज तीला आला.

“काय चालंय इथं? बाहेरून एक भारदस्त आवाज आला. भागीरथी ताई ओरडतच आत मध्ये येत होत्या.हौसा काय झालं वं माय? हौसा उठून उभी राहिली आणि भाकरी ती ताईंच्या गळ्यात पडून रडू लागली.

“काशे लोकांची पोरगी सून म्हणून घरात आणली आणि तिचं असं हाल चालवल्यात व्हय ग? भागीरथी ताई आत्याकडे लालबुंद डोळे करून बोलत होत्या.

“ती पोर मपल्या घरी काय तरी पोट्या पाण्याचा व्यवसाय करता येईल का काय हे इचारायला आली होती.तेव्हढच दोन पैसं मिळालं तर रंग्या पण इथंच राईन. आरं किसण्या तुला लाज वाटाय पाये होतं बारक्या भाऊजई वर हात उचलला तू “ मूत पिऊन सगळं घरदार फुकलं आणि ह्या पोरीवर आळ घेतोय व्हय र “ भागीरथी ताई खूपच रागात होत्या.

“भागे तू पाटलीन आसन तुपल्या घरची इथं तुपंला काय बी बोलायचं संबंध नाय “ आत्या खूपच चिडली होती.मपला नसणं बोलायचा संबंध पण पोलिसांचा तर हाय ना? करायला सांगू का फोन? मग कोणाचा किती संबंध आहे कळनच. पोलिसांचं नाव काढताच आत्या एकदम नरमली.

“येऊ दे रंग्याला नाय इला हाकलून दिली तर नाव नाय सांगणार “ घराच्या बाहेर पडतच आत्या बोलत होती. बाईसाहेब बर झालं तुमी आला कमळी भागीरथी ताईकडे पाहून बोलू लागली. कमळी न तिच्या बारक्या पोराला भागीरथी ताईंना बोलवायला लावलं होतं.हौसाला काय बोलावं तेच कळेना

तिचं सगळं जगच हलल होतं. “हौसा गप वं माय. असा कसा मार खाल्ला वं तू तुला काय हात नाय काय. जर आपलल्या इज्जतीवर कुणी आळ घेत असन तर गप नाय रायचं. तुला तोंड पण हाय आणि हात पण एकदा वापरून पाय परत कोणी नादी बी लागायचं नाय.”

‘कमळे आणि हौसा तुम्ही दोघी बी शिकलेल्या हाय चांगल्या मंग असं मार खाऊन काय घ्यायचं.“बाईसाहेब काय करावं निस्त घाण घाण बोलत असती आत्या काय करायचं. “ कमळी रागातच बोलली.

वहिनी काय झालं? समीर आत येत म्हणाला. समीर म्हणजे मुंबईला रंग्या बरोबर राहत असणारा मुलगा.“काय नाय र आसच आपलं. हौसा पदराने डोळे पूशीत म्हणाली.” वहिनी मुंबई वरून फोन आल्ता. तुमाला कळला काय?“नाय र काय झालं? हौसा एकदम चिंतेतच म्हणाली.खरच नाय कळालं? नाय र समीर काय झालं? आता कमळीला पण दम धरवेना.

मंग तुमी सगळ्या आशा वहिनीच्या घरात? समीरने प्रश्न केला.आरं सासु सुनांचा भांडान झालं तवा आलो होतो. भागीरथी ताई म्हणाल्या.सांग कि र समीर काय फोन आला हे आजचं येणार हाय कां? हौसाने एकदम विचारले.हा आजचं येणार हाय पण…….. वहिनी.

क्रमश……

1 thought on “सपान |Dream Part 11”

Leave a Comment