“काय झालं सांगशीन कां आता पटदिशी” भागीरथी ताई समीर ला जवळ जवळ ओरडल्याच.(Dream)
“वहिनी रंगा दादाचा मुंबईला ऍसिडेन्ट झाला. “समीर घाबरतच बोलला.“काय” हौसा एकदम खाली बसली.भागीरथी ताई, कमळी आणि सपनी यांना पण धक्का बसला.
“समीर नीट सांग बाबा काय झालं? लई नाय ना लागल बाबा. हौसा उरक माय तू चल आपुन गाडी सांगू आणि ममइला निघू बाजीराव येईन आपल्या संग समीर तू पण चल र “ भागीरथी ताई म्हणाल्या. हौसा रडू लागली सपनीला कमळी बाहेर घेऊन गेली.
“काकू रंगादादा आपल्यात नाय रायला लई मोठा असिसिडेन्ट झालाय 4-5 लोक गमावल्यात “ समीर रडतच म्हणाला.भागीरथी ताई एकदम सुन्न झाल्या.तशी हौसा तडकन उभी रायली आणि समीर ला ढकलत म्हणाली “काय बोलू यायला र तू तुला तरि वळतंय कां. कालच म्हणाला होता ना मोरल्या सनवारी येणार हायत म्हणून”… हौसा खूप रागात बोलत होती.
““वहिनी खरच सांगतुय रंगादादाच्या खोलीत राणाऱ्या पोरांनी फोन केला होता. सकाळीच झालंय एका ट्रकणे रिक्षाला उडवल. त्यात रंगादादा व्हता. “ती पोर रंगादादाला हिकडंच घेऊन येणार आहे.
आता हौसाला एकदम भोवळ आली आणि ती जमिनीवर पडली. भागीरथी ताईना पण धक्का बसला. हौसा च्या तोंडावर पानी मारत समीर तिला उठवू लागला.“हौसा ऊठ ना वं माय भागीरथी ताई तिच्या मानेखली हात घालून उठवत होत्या.
“समीर शेजारी जाय आणि तिच्या सासूला आणि जावला सांग.”तसा समीर बाहेर गेला.हौसाने थोडे डोळे उघडले “ बाईसाहेब समीर खोटं बोलत व्हता ना?
“नाय व माय तो कायाला खोटं बोलन.” भागीरथी ताईं हौसाला जवळ घेत म्हणाल्या. “नाय आस नाय व्हणार मला लगेच जायचं हाय बाईसाहेब कायतरी करा आणि मला तिकडं घेऊन चला” हौसा रडतच बोलू लागली. “महिना झाला नदर नाय पडलं माह्या “ बाईसाहेब काय झालं व सगद हे….. कस जगायचं म्या आता सपनीला काय सांगू. कोण हाय मला आता. आता म्या तरि जगून काय करू हौसा मोठयान हम्बरडा फोडला.
भागीरथी ताईंना समदं त्यांच्यासंग झालेलं डोळ्यासमोर आलं. पाटील गेलं तवा त्यांच बी लई हाल झालं व्हत.
“आग…. ए सटवे झालं कां तुपल्या मनासारखं खाल्लं ना मपल्या पोराला लई आनंद झाला आसन तुला आता “आत्या ओरडतच घरात आली आणि हौसाला मारायला धावली. “काशे सांभाळ बाय स्वतःला त्या पोरीला आसल नक बोलू माय ““भागीरथी ताई आत्याला धरत खाली बसवून बोलल्या.कमळी पळतच आली आणि हौसाच्या गळ्यात पडून रडू लागली. समीर ही सपनीला घेऊन घरात आला. घरात सगळी का रडत आहे हे सपनी ला कळेना.
“समीर सपनीला घेऊन वाड्यावर जाय रमाकड ठिव बाजीरावला आणि आनंदराव ला हीकड घेऊन ये बाबा जा लवकर.समीर सपनीला घेऊन गाडीवर वाड्याकडं निघाला.तवर आजूबाजूच्या आया-बाया जमा झाल्या. हौसा मोठमोट्यानं हंबर्डे फोडत होती. उरावर मारून घेत होती. सगळं संपलं होत. समोर सगळा अंधार होता.
तेव्हड्यात ऍम्ब्युलन्स च्या सायरन चा आवाज जोरजोरान ऐकू येऊ लागला. अंगावर काटा येईल इतका कर्कश आवाज होता तो. ऍम्ब्युलन्स घरासमोर येऊन थांबली बाहेर गडीमाणस गाडीकडं गेली. हौसा एकदम बेशुद्ध झाली तिची दातखळी बसली होती.
भागीरथी ताईंनी बायांना कांदा फोडून आणायला सांगितला आणि नाकापुढं धरला. आणि हातपाय चोळू लागल्या. हौसा शुद्धीवर आली पण आजूबाजूला काय चाललय हेच तिला कळेना. एकदम सुन्न झाली.
क्रमश…..
So sad