“आयवं बाबा आता कधीच दिसणार नाय कांय? सपनी हौसाला मिठी मारत म्हणाली.“सपने मी काय सांगती नीट ऐक माय.. (Dream)
“आता तुझं बाबा कधीच परत येणार नाय आता फकस्त आपण दोघीच इथं असणार हाय. मला लई कामं करावं लागण बाळा आता. तवा तुला पण मला मदत कराया लागण. पण कधीच घाबरायचं नाय तुपली आय तुपल्या संग मरस्तवर हाय….जशी मपली आय मपल्या संग हाय. घाबरायचं नाय लई शिकायचं मोठ्ठ व्हायचं तुपल्या बाबाला पण असंच वाटत हुत “
सपनी तशी बारिकच हुती पण आई कायतरी चांगलंच सांगत आसन यावर तिचा भरवसा होता.दिस जात हुत दिसाआड रमा संच्याला हौसाकडं येऊन बसत होती. कधी भागीरथी ताई यायच्या. कमळी…. हौसाची जावं पण यायची. आत्या मात्र अजूनही हौसावर डुख धरून होती. हौसा 7-8 दिस माहेराला जाऊन आली.
आईनं लई लाड केल तीच आणि सपनीच. चार गोष्टी सांगितल्या. काय लागल तर हक्काच घर हाय हे तुपल आस दर्डावून सांगीतल. सुधीरला बहिणीसाठी लई वाईट वाटतं होत. बापाला पण पोरीची चिंता खात हुती.माहेरपण घेऊन हौसा परत तिच्या घरी आली.हौसा मजुरीन कामाला जायची सकाळी वाड्यावर कामाला जायची.
एक अर्धा एकरच तुकड होत त्यात ती भाजी पाला करायची आणि बाजाराच्या दिशी ईकाया न्यायची. न थकता सपणीसाठी ती मरस्तवर काम करायची. दिसा मागून दिस जात होत. एक दिवस भागिरथी ताई संध्याकाळच्या पारी हौसा कडं आल्या.“ हौसा बाजीराव सांगत होता ते मूर्ती बनवायचा कोर्स कधी सुरु करायचा? हौसा तर एकदम विसरूनच गेली होती याबद्दल.
“बाईसाहेब आता जर मी तालुक्याच्या गावाला गेले तर लोक कायबाय म्हणतीन…“
हौसा लोकांपायी तू कवर मोलमजुरी करणार माय….कवर शानाच्या पाट्या उचालणार लोकच हाय ती अशी बी जगू द्यायची नाय आन तशी बी “ “तुपला निर्णय तू घे सपनी आता हळूहळू मोठी हुईन तिच्या शिकायचं पण बघाया लागण ना माय तुला “
भागीरथी ताई पोट तिडकीने सांगत होत्या.“बाईसाहेब एकदा आत्यासंग बोलून घिती मंग सांगती “हौसा म्हणाली.“हौसा मी काशिसंग बोलली हाय तिची कायबी हरकत नाय”“
“काय हौसा एकदम चमकली“व्हय देवच पावला म्हणायचा “ भागीरथी ताई हसून म्हणाल्या.“ते काय नाय हौसा तू तू बाजीराव संग जाय तालुक्याच्या गावाला आन ते मुर्त्या बनवायचं तेवढं शिकून घे माय.”व्हय बाईसाहेब येईन मी उद्या.हौसा खूप दिवसांनी आनंदी दिसत होती. एक नवीन पाऊल टाकणार होती.
तीन पेटी उघडली आणि नारंगी रंगाच्या कपड्यावरून हात फिरवू लागली. “आव जाऊ ना मी उद्या तालुक्याच्या गावाला? हौसा पुटपुटली.
सकाळ झाली हौसा सगळी कामं उरकून सपनीला आनी सपनीची साळची पिशी घेऊन वाड्याकडं आली.सपनी तिथूनच साळत जाणार होती.
“ताई निघायचं कां “ बाजीराव ने इचारलं.हौसा भागीरथी ताईच्या पाया पडली आणि रमाला भेटून निघाली.लई दिसान…आज हौसा तालुक्याच्या गावाला आली होती. एका मोठया घरासमोर बाजीरावने गाडी थांबवली. दोघेही खाली उतरले आणि आत गेले.
आत गेल्या गेल्या हौसाने चारी बाजूला पाहिले सगळीकडे मुर्त्या च मुर्त्या आखीव रेखीव काहींना कलर दिलेला काही तशाच….चार पाच बापे माणसं काही पोरींना आणि बायकांना शिकवित हुत “हौशे तू इथं कशी माय “ मागून आवाज आला.
क्रमश…..
👌👌