सपान |Dream Part 16

“हौसा तू इथं कशी माय “ मागून आवाज आला.हौसाने चमकून मागे पाहिलं.(Dream)

ती एकदम आश्चर्यचकित झाली. “बाई तुमी “ हौसाला पहिली ते सातवी ज्या कदम बाई शिकवायला होत्या त्या साक्षात समोर उभ्या. हौसा लगेच बाईंच्या पाया पडली.

“हौसाताई तू ओळखतेस कदम बाईंना…बाजीरावने कुतूहलानेविचारले.“व्हय आमच्या साळच्या बाई हायत या. “बाईंनी हौसाला आत नेले. हौसाच्या बोडक्या कपाळावरून त्यांनी ओळखले.

“बाई तुमी इथं कशा” हौसाने विचारले. हौसा हे घर माझेच आहे. रिटायर झाल्यावर मी आणि गुरुजी ज्या लोकांना गरज हाय त्यांना मूर्ती बनवायला शिकवतो ते पण मोफत.

“हौसा लई हुशार होतीस तू पण लई लवकर लगीन केल तू.बाई कौतुकाने म्हणाल्या.व्हय बाई लगीन झालं एक पोरगी पण हाय सपना नाव ठीवलंय तीच. आणि कारभारी देवाघरी गेलं पाच महिन झालं “ हौसा एकदम आवंढा गिळत म्हणाली.

“ते काय आपल्या हातात आसत कां बाई…पण तुला इथं बघून लई आनंद झाला बघ “ बाई म्हणाल्या.“हौसाताई मी जातो आता कॉलेजला घ्यायला येतो परत”काळजी करू नको वेळेत येईन “हौसाच्या चेहऱ्यावरील काळजी बघून बाजीराव म्हणाला.

“तुझा भाऊ व्हय ग हौसा “ बाजीराव गेल्यावर बाईंनी विचारलं.“नाय बाई तुमास्नी रमा आठवती कां?“व्हय तर तुमी दोघी चांगल्या मैत्रिणी होत्या” बाई म्हणाल्या.“तिचा लहाना दीर हाय बाजीराव.”“म्हणजे रमा तुपल्याच गावात दिली तर मैत्रिणी मैत्रिणी नी साथ सोडली नाय तर “ बाई हसून म्हणाल्या.

“व्हय बाई आमच्या गावची पाटलीन हाय रमा.” हौसा हसत म्हणाली.“आरे वा खूप छान” बाई सुद्धा हसत म्हणाल्या.“बर हौसा चल तुला मूर्ती कशा बनतात ते दाखवते.बाई सर्व माहिती व्यवस्थित सांगत होत्या. एकूण 12 जण होते. 9 पुरुष आणि तीन बायका.

गुरुजी त्यांना शिकवत होते आणि सर्व अगदी मन लावून मूर्ती बनवत होते. बाईंनी हौसाला हातात घालायला हातामौजे दिले साडी खराब होऊ नये म्हणून गळ्यात ऍप्रॉन दिले आणि तिला त्या एकटीला वेगळं बसवून शिकवू लागल्या.हौसा खूप मन लावून शिकत होती. तिला ते कामं आवडतंही होत. वेळ कसा गेला कळला नाही.

चार वाजले आणि बाजीराव आला. हायपाय धुवून बाईंचा निरोप घेऊन हौसा निघाली.खूप खुश होती हौसा आज. आपण काहीतरी करू शकतो हा आत्मविश्वास तिला आला होता.रस्त्या ने ती बाजीरावला सगळं सांगत होती. खूप दिवसांनी हौसा आज एकदम मोकळी झाली होती.बाजीरावला सुद्धा खूप आनंद झाला.

बोलता बोलता वाडा आला.वाड्यात आल्यानंतर तिचे डोळे रमाला आणि सपनीला शोधू लागले. दोघी परसदारात झोक्यावर बसून झोका झोका खेळत होत्या. सपनी खूप आनंदी दिसत होती. आणि रमा सुद्धा.

तिला त्यांना आवाज द्यायचे धाडस झाले नाही ती दोघींकडे बघत तशीच उभी राहिली.“हौसा आलीस व्हय ग माय ““व्हय बाईसाहेब “भागीरथी ताई मागून आल्या.

“दिल आसत एखाद लेकरू वटीत देवान रमाला बी तर काय झालं आसत. बघ कि किती आनंद दिसतोय तिच्या तोंडावर “ भागीरथी ताई रमा आणि स्पनिकड बघत म्हणाल्या.यावर हौसाला काय उत्तर द्यावं ते सुचेना.

कसं झालं तुपल मूर्ती बनवायचा कोरस? बाईसाहेब काय सांगू तुमास्नी….. हौसाने सगळे घडलेले भागीरथी ताईंना सांगितले. त्यांना सुद्धा खूप बरे वाटले चला ओळखीचं कुणीतरी हाय म्हणल्यावर काळजी नाय.

“आयवं… सपनाचा हवसाकडे लक्ष गेलं आणि ती पळतच आली. “माय लई मज्जा हाय एका पोरीची मावशीसंग झोका झोका खेळाया भेटतंय “ सपनीच गाल ओढत हौसा म्हणाली.

क्रमश……

Leave a Comment