“हौसा कसं होत ग मूर्ती बनवायचा कोर्स? रमाने अगदी उत्सुकतेने विचारले. भागीरथी काही त्यांच्या खोलीत निघून गेल्या होत्या. (Dream)
“रमा काय सांगू… तुपल्याला आपल्या कदमबाई आठवत्यात का? आपल्याला पहिले ते सातवीपर्यंत होत्या.”“व्हय तर चांगल्याच आठवत्यात.मंग मुर्त्या बनवायचा कोर्स पण त्याच घेत्यात?हौसा एकदम आनंदात म्हणाली.
काय सांगती? हे लई भारी झालं. रमालाही आनंद झाला. अशा प्रकारे हौसाचा कोर्स चालू झाला. जाताना येताना बाया कुजबुज त होत्या. बाजीराव बरोबर जाण येण लोकांना खूपत होते. एका विधवेने गपगुमान घरात बसून राहावं अशी लोकांची अपेक्षा परंतु भागीरथी ताईंच्या धाका मुळे कोणी काही बोलत नव्हते.
हौसालाही सगळं कळत होत परंतु तिला तिच्या सपनीची स्वप्न पूर्ण करायची होती त्यामुळे ती सगळ्यांकडे दुर्लक्ष करत होती.आत्या ला पण मधून मधून खुमखूमी यायची नाय नाय ते बोलायची पण हौसाला आता कुणाचाच काही फरक पडत नव्हता.
बघता बघता हौसाने मूर्ती बनवायचे काम शिकून घेतले. कदम बाईंची तिला चांगली साथ मिळाली.
आणि हौसाने मूर्ती बनवायचे घरी चालू केले. पाच-सहा दिवस कदम बाई येऊन तिला मदत करत होत्या. गावातल्या बायका नाक मुरडत तिच्याकडे येऊन मूर्ती पाहत होत्या.
आठवड्यातून एकदा कदम बाईचा माणूस मटेरियल टाकून जायचा आणि हौसाने बनवलेल्या मुर्त्या घेऊन जायचा. हौसाला आता पोटापण्यापुरता पैसा मिळू लागला होता.
खूप जीव वतून ती काम करायची. कदम बाई तिच्या कामावर खूपच खुश होत्या.हौसाने थोडे थोडे कामं सपनीला पण शिकवले होते. ती सुद्धा हौसाला मदत करायची.हौसाच्या गाठीला आता थोडा थोडा पैसा साठू लागला.
एक दीड महिन्यांनी ती कदम बाईंना भेटायला जाऊ लागली.एक दिवस बाई म्हणाल्या.“हौसा मला वाटतं तू घरी आब्यास करून तेराविची परीक्षा दिली पाये.हौसा एकदम चमकली.बाई मला शाळा सोडून आता नऊ धा वरीस झालं आता मला जमन कां?“कां नाही जमणार हौसा सगळं जमतंय तू प्रयन्त तर कर.
बाईच्या आग्रहाखातर हौसाने बाहेरून परीक्षा द्यायची ठरवलं. मूर्ती बनवून ती आता अभ्यास सुद्धा करू लागली. रमा भागीरथी ताई अधून मधून यायच्या. भागीरथी ताईंना हौसाचे खूप कौतुक वाटायचे. त्यांनी रमालाही पुढच्या शिक्षनासाठी आग्रह केला. परंतु रमाला काही त्यात रस नव्हता.
दिवस जात होते हळूहळू हौसा जास्त मूर्ती बनवू लागली. आजूबाजूच्या बाया तिच्यावर जळत होत्या. पण हौसाला आता काहीच फरक पडत नव्हता. आत्या सुद्धा अधून मधून हौसाकडं पैसं मागायची हौसाही सून या नात्याने द्यायची. त्यानिम्मिताने का होईना आत्याच तोंड बंद राहायचं.
हौसाने एक छोटस छान घर बांधलं. बाहेर मूर्ती बनवण्यासाठी एक खोली काढली. मटेरियल ठेवण्यासाठी वेगळी छोटी खोली केली. तिचे कामं आता खूप वाढले होते.मदतीसाठी आता ती गावातल्या गरजू बायकांना बोलावून त्यांना रोजगार देऊ लागली.
सपनी आता समजूतदार झाली होती आईला मदत करायची. एक दिवस अचानक कदम बाईंनी हौसाला बोलावून घेतले.आणि त्या जे काही म्हटल्या त्यानें हौसाच्या पायाखालची जमीनच सरकली.
क्रमश……
👌👌