“हौसा बर झाल आलीस बया बघ बाई रमाला काय व्हतंय ते मला तर काय बी सांगना झाली. (Dream)“ हौसा वाड्याच्या बाहेर आल्या आल्या भागीरथी ताई हौसाला म्हटल्या.
“काय झालं बाईसायब सगळं ठीक हाय ना इतक्या कां घाबरल्या हाय तुमी “ हौसाने काळजीच्या स्वरात विचारलं.काय कळना झालंय दुपारपासून आतून दरवाजा लावून घेतलाय नुसता रडायचा आवाज येतोय. काय बी बोलना आणि दरवाजा पण उघडना.
” हौसा बघ माय तुझी तर मैत्रिण आहे ना ती “ भागीरथी ताई खूपच काळजीच्या स्वरात बोलल्या.“बघती मी “ “ताईसायब आव ताईसायब दरवाजावर थाप मारत हौसा रमाला आवाज देऊ लागली. तरी रमा काही दरवाजा उघडेना.
“बाईसाहेब तुमी तुमच्या खोलीत जा मी करते काहीतरी. हौसा भागीरथी ताईंना म्हटली. तशा भागीरथी ताई त्यांच्या खोलीत निघून गेल्या.“रमा बाय माये उघड ना दार बया. सुधीर आला व्हता त्यानं निरोप आणलाय तुपल्यासाठी. “
हौसा एकदम हळू आवाजात म्हटली. तसं रमाने हळूच दरवाजा उघडला. तिच्या हाताला ओढत तिला आत ओढले आणि दरवाजा परत बंद केला.
“हौसा….. हौसाच्या गळ्यात पडत रमा रडू लागली. “काय झालं रमा….आधी सांग सुधीर नी काय निरोप आणला मपला… सगळं ठीक हाय ना आई दादाच”… रमाने रडतच विचारले.
“व्हय बया सगळं ठीक हाय मोरल्या महिन्यात जत्रा हाय तवा तुला न्यायला येणार हाय तुपला दादा. हौसा तिचा हात हातात घेत म्हणाली.
“आता काय झालं सांग पटापटा सपनी घरी एकलीच हाय अंधार बी झालाय.”हौसा काय सांगू ग..सगळं संपल माझं…पोटाला पॉर सॉर नाय. नवऱ्याचा पाय घरात टिकणा झालाय. आज तर बाहेरून कळलं ह्यांचं गावात कायतरी चालू हाय “
रमा हुंदके देत म्हणली. “आग रमा तुपल्या जिभला काय हाड बीड हाय कां नाय मोठया मालकांबद्दल असं काय बोलायला लागलीस. सगळ्यां गावाला माहित हाय किती चांगल हायत मालक “ हौसा तिच्याकडे पाहत म्हणाली.
“हौसा मला बी पटलं नाय जवा मला कळालं तवा….पण दुपारी कपडे धोयाला द्यायचं म्हणून खिसा तपासला तवा खिशात एक चिट्ठी व्हती ती वाचली. “ आता मात्र हौसाला काय बोलावं ते कळेना.
“हे पाय रातच्याला मालक परत येते तवा काय ते इचार. “ “हौसा….मला हे सोडून तर देणार नाय ना? काय करू मी आई दादाला हे कळालं तर त्यांना नाही सहन हुणार ग “ रमाला खरंच खूप मोठा धक्का बसला होता.
“रमा रडायचं बंद कर बर आणि आधी आपल्या सासूबाईंना जाऊन भेट लय घाबरल्यात ग त्या. मी उद्या शान काढायला येईल तवा बोलू. रातच्याला मालकांशी बोलून चिट्ठीच काय ते इचार. “ “सपनी एकटी हाय ना घरी मला जायला पाये. “ रमाचा हात हातात घेत हौसा म्हणाली. मान हलवत रमाने होकार दिला.
तशी हौसा लग पटापटा तिच्या झोपडीकड चालू लागली. येताना तिने सपनीला तिच्या बारक्या जावकडं ठेवले होते.“मोठं मालक असं कधीच करणार नाय लई देवमाणूस हाय ते हौसा स्वतःशीच बोलत होती.” आनंदरावाचा आणि रमाचा संसार एकदम सुखात चालला होता. आनंदरावांचा रमावर खूपच जीव होता.
पण रमाने चिठ्ठी वाचली म्हटल्यावर त्यात काहीतरी तथ्य असणार. हौसाची आता द्विधा मनस्थिती झाली. आणि तिला रमासाठी खूपच वाईट वाटू लागले. विचार करत करत घर कधी आले तिलाही कळलं नाही.
“काय झालं व्हत ग हौशे “ लांबूनच हौसाच्या सासूबाईने तिला विचारले. “काय नाय आत्या तीच पॉट लई दुखतं व्हत “ “व्हय तर मी यडी बिडी हाय कां काय समदं ठाऊक हाय मला काय चालंय तुमचं “ आता मात्र हौसा च एकदम तोंड पडलं. आत्या ला कसं कळालं हेच तिला कळना.
“आजकाल तुला वाड्यात जायला कायपण कारण लागतंय हौसा लॉक तोंडात श्यान घालाया लागल्यात “ आत्या एकदम अंगावर येतच म्हणाल्या. आता मात्र हौसाच्या पायाखालची जमीन सरकली हातापायाला एकदम कंप सुटला आणि ती धाडकन जमिनीवर पडली. “आयवं” सपनी पळतच हौसाकडे आली.
क्रमश……
👌👌