आयवं” सपनी पळतच हौसा कडे आली.आत्याचे शब्द हौसाच्या काळजाला लागले होते.(Dream) नवरा जेव्हा कामासाठी दूर गेलेला असतो तेव्हा त्याच्या बायकोकडे लोकांचा पाहण्याचा उद्देश खूपच वेगळा असतो.
पण जेव्हा घरातले सुद्धा त्यात सामील होतात तेव्हा ती बाई अगदी कोलमडून जाते. असंच काहीस हौसाच आज झालं होतं. लोकांनी प्रतिव्रता सीतेलाही सोडले नाही तर आपण कोण हे हौसा पूर्णपणे जाणून होती.
परंतु स्वतःच्या सासूकडून असं काही तिला अजिबात अपेक्षित नव्हते.
“आयवं ऊठ ना काय झालं तुला’ हौसाच्या शेजारी बसून सपनी रडायला लागली.हौसाच्या जावनं तोंडावर पाणी मारलं तेव्हा हौसा शुद्धीवर आली.” काय झालं व बाई उठा ना आत्याच काय मनाला लावून घेताय तुम्ही तुम्हाला माहित आहे ना त्यांचा सभाव “
हौसाच्या हाताला धरत तीने तिच्या झोपडीत नेलं. परंतु हौसाच्या मनाला खूपच लागले होते. नवऱ्यासाठी मुलीसाठी कमरेला पदर खोचून येणाऱ्या परिस्थितीबरोबर ती दररोज दोन हात करत होती. खंबीरपणे ती सगळ्या परिस्थितीला सामोरे जात होती. आता मात्र तिचं सगळं अवसानच गळून गेलं.
थोड्यावेळाने ती जरा भानावर आली. सपनी अगदी बारीक तोंड करून तिच्याकडे पाहत होती. तिने सपनी ला जवळ घेतलं आणि जोरात मिठी मारून बोलू लागली.
“काय झालं व माय हे सगळं सोन्यासारखा मपल्या संसाराला कोणाची दिष्ट लागली. सगळं व्हत्याच नव्हतं झालं. नवरा लांब गेला ना शेत राहिल ना घर…. देवा किती परीक्षा बघणार व आता. सगळं सहन केल व्हत ना मी…..काय चुकलं मपल.
“हौसाचा बांध सुटला सपनी पण रडायला लागली. थोड्यावेळाने हौसा एकदम शांत झाली झाली आणि वर छताकडे पाहू लागली.सपनीला आता भूक लागली होती तीन सकाळची टोपल्यात असलेली चतकुर भाकर घेतली आणि तशीच कोरडी चावू लागली.
हौसाने ते पाहिलं आणि एकदम उठून उभी राहिली. “सपने थांब बाय पटकन कालवान टाकते”. सपनी ला अशी कोरडी भाकर खाताना पाहून तिला एकदम गलबलून आले होते. काही झालं तरी सपनीची ती कधीच आबाळ होऊन देणार नव्हती.
आई व्हती ना ती एक.पटकन बेसन करून तिने दोन भाकरी थापल्या आणि दोघी जेवायला बसल्या हौसाच्या डोळ्यात अचानक एक जबरदस्त तेज आले होते. आता तिने ठरवले होते. कोणाच्याही बोलण्याने अजिबात कोलमडून जायचे नाही. आपल्या एका पोरीसाठी आणि नवऱ्यासाठी अख्या जगाशी लढायला ती तयार झाली.
रात्र बरिच झाली हुती. तीन… भांडी घासली कोंबडी आत घेतली सपनीला थापटून थापटून झोपवलं. तिच्या मनात वेगळंच काहीतरी चालू होतं. आज आत्या जे बोलल्या ते तिच्या मनावर घाव करून गेल होत.कोपऱ्यातली तिच्या लग्नातली पत्र्याची पेटी समोर घेऊन बसली. पेटी उघडली आणि……तयार झाली एका नव्या उंच भरारी साठी डोळ्यात एक मोठं सपान……….घेऊन सपनी साठी.
क्रमश….
🥰🥰