“ए हौशे उरक पटापटा हे काय तुपल घर नाय हात चालव जरा …अजून वाड्यातल्या खोल्या झाडायच्या हायत”(Dream)
सगुणा हौसावर अगदी खेकसली.“व्हय ग सगुणा आलेच इथलं उरकून”हौसाने शांतपणे उत्तर दिले.
“काल सासू एव्हडं बोलली तरि आली परत इकडं त्वान्ड घेऊन एखादीन जीव दिला आसता हिरीत… पार लाज सोडली बाय तू “ सगुणा एकदम खेकसून च बोलत होती.तरि हौसा एकदम शांत व्हती आता तिला कोणाच्या बोलण्याचा काहीच फरक पडत नव्हता.आता ती तयार झाली होती एका नवीन स्वप्नासाठी.
वाड्यात शेतीसाठी भागीरथी ताईंनी आणलेल्या गड्याची बायको होती सगुणा हौसावर खूप जळायची कारण रमा हौसा संग चांगली वागायची.हौसा काहीच बोलत नाही हे पाहून सगुणाला आणखी चीड आली आणि वाईट वंगाळ बोलत ती तिथून निघून गेली.
बाहेरच उरकून हौसा पटापटा वाड्यातल्या खोल्या झाडू लागली. रमा स्वयंपाक घरात होती आणि भागीरथी ताईंची देवपूजा चालली होती. मोठं मालक दिवाणखान्यात हिशोबाच्या वह्या चाळत बसलं व्हत आणि तात्या म्हणजेच बाजीराव कॉलेजला जायच्या तयारीत.
हौसा सगळ्यांकडे अगदी कौतुकाने पाहत होती. खोल्या झाडून झाल्यावर हौसा भागीरथी ताईंकडे आली. “हौसा उरकलं कां बाय सगळ जा आता लगबगीन घरला…..लेकरू वाट पाईत आसन जातानी रमाला सांगून जाय “ व्हय बाईसाहेब.
हौसा सयंपाकघरात आली आणि रमाला म्हणाली ताईसाहेब जाती मी घरी आता समदं कामं झालं.” रमाबरोबर तिथं सगुणा व्हती तिला मदत करायला.“सगुणा जाय बर आरणीतून घमील भरून कांद आन.”
सगुणाने हौसाकडं रागानं पायल आणि बाहेर गेली.हौशे धर थोडी लापशी हाय डब्यात सपनीला दे आन तू पण खा…जाय आता लवकर ““रमा नकु देत जाऊ बाई मला नाय आवडत असं चोरून नेलेलं माहित हाय तुला “
“असू दे जाय तू लवकर आता लेकरू वाट पाहत आसन. हौसाने डबा घेतला आणि घरी निघाली. आज तिच्या अंगात एक नवीनच शक्ती आली होती. सपनी पळतच पुढून आली.“आयवं आजी आली व्हती तुला बोलावलं हाय तीन… बारक्या घरी.
“ बर जाईन मी तुपल आवरून घी बर आणि हे पाय रमा मावशीन काय दिलंय तुपल्याला “हौसाने लापशीचा डबा सपनीच्या हातात दिला आणि चूल पेटवून दोन भाकरी टाकल्या आणि मिरची वाटली पाट्यावर.हौशीन लापशी खाल्ली आणि उरलेली साळच्या पिशीत ठेवली.
“आयवं मला नग भाकर मी लापशी नेती साळत.” सपनी म्हणाली“बर बया ने दुपारी साळतुन आल्यावर खा भाकर.
““ए सपने चल ना उशीर होतोय “ सपनीची चुलत बहिण सपनीला बाहेरून आवाज देत होती. सपनी साळत गेली हौसान फडक्यात मिरची भाकर बांधली आणि शेळीला सोडून ती मजुरीला गेली. दिसभर ती इचार करते व्हती बाजीराव कालेजतून आल्यावर काय सांगन कोणता कोर्स तिला भेटणं. दिवसभर बायकामधी दिस गेला आणि ती घरी आली.
सपनी अभ्यास करत व्हती. हौसाने हातपाय धुतलं.“सपने चल आपल्याला वाड्यात जायचंय.सपनी उड्या मारतच निघाली. ” कुटं निघाल्या मायलेकी सकाळ निरोप धाडला व्हता आली नाय तू ” आत्या समोरच उभ्या.
आत्या उशीर झाला व्हता सकाळी कामाला जायला म्हणून नाय आली. काय काम व्हत कां? हौसा न घाबरता बोलली.”तर तर वाड्यातुन तुपला पाय निघत नसलं नव्ह ” आत्या एकदम टोमणा देतच म्हणाल्या. “आत्या मला आता भांडायचं नाय लक्षमी यायच्या वक्ताला मी येती रातच्याला घरी ” हौसाने उत्तर दिले.
क्रमश……..
👌👌
भारी आहे सपान