सपान |Dream Part 9

“नवरा इथं नाय तर लईच त्वान्ड सुटलय तुपल्याला….आपल्या हद्दीत रा जरा” हौसाची सासू हौसाला एकदम रागाने बोलली. (Dream)

हौसाला आता कोणत्याही प्रकारचा वाद घालायचा नव्हता. तिला काही करून बाजीराव ला भेटायचे होते. सासूच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तिने सपनी चा हात पकडला आणि तरातरा वाड्याकडे निघाली. आपल्या सासूचे इतके घाणेरडे विचार असतील हे मनात आणूनच तिला सासूची किव येत होती.

“जरा बी लाज नाय बया ह्या बाईला नवरा घरी नाय तर पार मोक्कार सुटली बाजारबस्वी “ आता हौसाची सासू जोर जोरात बोलू लागली.“आयवं आजी मारिन काय आता “ सपनी एकदम रडवेली होऊन म्हणाली.

“नाय व माय आज्जी हाय ती आज्जी मारत नसती कधी. चल तू तडातडा “ वाड्याच्या बाहेरच रमा तुळशीला दिवा लावत होती. “मावशी… सपणीने पळत जाऊन रमाला घट्ट मिठी मारली. रमा सपने चे खूप लाड करायची त्यामुळे सपनेलाही रमाचा लळा लागला होता.

“आमी नाय बोलणार एका पोरीसंग “ रमा मुद्दामच रागवत म्हणाली. दोन दिस झालं आमची कुणाला आठवणच येत नाय. “ “ चालू द्या मायलेकींचं… हौसा हसतच म्हणाली.

“ रमा तात्या आल्यात का ग “व्हय व्हय मगाच आल्यात “ रमा ने उत्तर दिले. “चल ना मग मपल्या संग आपण ते कोर्स विचारणार होतो ना “ “जाय तू पुढं मी सपनीला खाऊ देऊन येती.” सपनी चा हात पकडून रमा तिला स्वयंपाक घरात घेऊन गेली.

“बया हौसा आलीस व्हय माय ये बस “ भागीरथी ताई एकदम प्रेमाने हौसाला म्हणल्या.“ बाईसाहेब ते तात्यांना कोर्स विचारायचं होतं “ हौसा एकदम दबक्या आवाजात म्हणाली.“व्हय व्हय थांब मी आवाज देती.

भागीरथी ताईंनी बाजीराव ला मोठ्याने आवाज दिला.तसा बाजीराव आतल्या खोलीतून बाहेर आला.“बाजीराव ते हौसाच्या कोर्स च काय झालं र…

“व्हय आई इचारलं मी तीन कोर्स चे फॉर्म पण आणलेत. पण आता हौसा ताईला कोणता कोर्स करायचा आहे निवडावे लागेल.” बाजीराव म्हणाला.हाय कां आता तात्या तुमीच सांगा कि कोणतातरी कोर्स मला काय कळतंय त्यातलं

“ हौसाताई असं कसं चालेल थांब मी तुला त्या कोर्सची नावे सांगतो… “फॅशन डिझायनर, ग्रामसेवक, नर्स एवढेच तीन कोर्स आहेत आपल्या तालुक्याच्या गावाला. पण त्यासाठी तुला दररोज तालुक्याच्या गावाला शिकायला जावं लागेल.” हौसा एकदम उदास झाली.

“तात्या लई आशन आली व्हती. दररोज जाऊन येऊन नाही जमायचं मला. त्याला पैका पाणी लागन. ““हौसाताई आजून एक कोर्स हाय त्यासाठी तुला फक्त आठवडाभर तालुक्याच्या गावाला जावं लागेल. आणि त्यानंतर तू घरी राहून डायरेक्ट कामाला सुरुवात करू शकतेस

बाजीराव ने एकदम हौसाला म्हटले. आणि हौसा पण एकदम चमकली.“काय.. खरच आसल पण असतंय काय तात्या.” “व्हय हौसाताई “बाजीराव ने हसत उत्तर दिले. हौसाच्या डोळ्यात एकदम चमक आली.

“बाजीराव खरंच असल् पण कोर्स आसत्यात व्हय र “ उगं त्या पोरीची गंमत करू नको. भागीरथी ताई रागवतच बाजीरावला म्हणाल्या.“नाय आई खरच सांगतोय मी.

”तात्या कसला कोर्स असतोय तो? मला जमन का? काय इंग्रजी बिंग्रजी नाय ना? म्हंजी मी फकस्त एक आठवडा तालुक्याच्या गावाला जाऊन शिकली कि मला लगेच नोकरीं लागण काय? हौसा एकदम बावरून गेली.

“व्हय हौसाताई सांगतो सगळं……”

क्रमश…

1 thought on “सपान |Dream Part 9”

Leave a Comment