सपान |Dream part 10

“हौसाताई कॉलेज मधले सगळे कोर्ससाठी तुला दरोरोज तालुक्याच्या गावी जावं लागणार.(Dream) “ पण मी आज एका ठिकाणी जाऊन आलो मला तो कोर्स तुझ्यासाठी योग्य वाटतो “ बाजीराव हौसाला म्हटला.“

“कोणता व तात्या? त्याला पैसं द्यायला लागण ना?” हौसा एकदम काळजीने बोलली.

हौसाताई सगळं सांगतो….“आपल्या सगळ्यांच्या घरात विठ्ठलाची मूर्ती, राधा कृष्णाची मूर्ती, शंकराची पिंड, स्वामींची मूर्ती अशा अनेक मूर्ती असतात. तर यातल्या प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या मुर्त्या बनवायचा एक कारखाना आपल्या तालुक्याच्या गावाला आहे.

त्यांना अशी लोकं पाहिजे कि ती त्यांना मूर्ती बनवून देतील. मूर्ती कशा बनवायच्या हे ते तुला शिकवणार.”

“आयो तात्या इतक्या भारी मूर्ती बनवायचं म्हणल्यावर काय साधं सुद काम नाही. त्याला भारी कलाकारच लागत्यात. “ हौसा एकदम नाराज झाली. तिला वाटलं आपल्याला हे जमणारच नाही.“

बाजीराव आरं साधी गावाकडे राहणारा आपण. चूल बनवायची म्हणलं तर आपल्याला दुसऱ्याकडून बनवून घ्यायला लागतिया आणि तू तर फार मूर्ती कडे गेलास. राहू दे बाबा हौसा जा बाई तुपल्या घरी बरीच रात झाली हाय”

भागीरथी ताईंना बाजीराव चा रागच आला. पोरीला आशेला लावलं आणि असलं काहीतरी सांगत बसला. हौसा ऐकून तर घे तात्या सांगत्यात अजून’” रमा म्हणाली.

“हौसाताई मूर्ती बनवायची म्हणजे ती कारखान्या वाली लोक तुला त्या मूर्तीचा साचा देणार. त्या मूर्तीला लागणारे सिमेंट पण देणार. तू फक्त त्या साच्यामध्ये सिमेंट ओतले. की काही वेळानंतर आपोआप मूर्ती तयार होते. फक्त त्यात काही बारीक सारीक कला लागतात तेच ते एका आठवड्यात तुला शिकवणार. आणि त्यासाठी तुला भांडवल गुंतवायची सुद्धा गरज नाही.

ते त्यांच्या गाडीने तुला सिमेंट पुरवतील तुझ्या घरी देतील आणि मूर्ती तयार झाल्यानंतर ते घ्यायला पण स्वतःच येणार. एका मूर्ती मागे त्यांचा खर्च जाऊन वरचे सगळे पैसे तुला देणार. “ आता मात्र रमा हौसा आणि भागीरथी ताई बाजीराव कडे एकदम आश्चर्याने बघायला लागल्या.

“काय सांगतुस बाजीराव असलं पण असतंय होय “ भागीरथी ताई बाजीराव ला म्हणाल्या.”हो आई असे खूप सारे उद्योगधंदे आहेत जे तुम्ही घरी बसून करू शकता.” आता मात्र हौसा एकदम आनंदी झाली.

“बाईसाहेब जाईन म्या एक आठवडा तालुक्याच्या गावाला आणि मूर्ती बनवायचं शिकूनच येईन. फकस्त सपनी कड लक्ष ठिवायला लागण.” हौसा भागीरथी ताईंना म्हणाली. “हौसा ताई तू कोर्स तुला दहा वाजता पण सुरू करता येईल आणि सपनी ची शाळा सुटायच्या आधी परत तू घरी येशील. आणि मी दररोज जातोच कॉलेजला मी माझ्या गाडीवर तुला घेऊन जाईल.“हा हे बाकी बराबर हाय. भागीरथी ताईंनी बाजीराव ला दुजोरा दिला.

“आणि सपनीची ची काळजी तू नको करू म्या हाय ना कधी मंदी उशीर झाला तर मी सपनी ला घरी घेऊन येइन. “ आता रमाला सुद्धा खूप आनंद झाला. “कवापासून चालू आहे तो कोर्स “ हौसाने अगदी उत्सुकतेने विचारले. “त्यांचे शिकवायचे काम कायम चालूच असते. तुझी तयारी झाली की सांग मग मी तुला तिथे घेऊन जाईन. “ बाजीराव म्हणाला.“ व्हय तात्या मोरल्या आठवड्यात सपनीच चा बाप येणार आहे. तवा त्यांना विचारते आणि मग ठरवू.”हो हौसा तुझी तयारी झाली की सांग.

हौसाने रमाला एकदम घट्ट मिठी मारली. भागीरथी ताईंच्या पाया पडली. “हौसा बाईच्या जाती जातीने पैक कमावलेलं कधी पण चांगलंच बाई. कोणावर काय येळ काळ सांगून येत नाही बघ ” भागीरथी ताईंनी स्वतःवर आलेली वेळ दुसऱ्या कोणत्याही बाईवर येऊ नये इतक्या पोट तिडकीने तिलासांगत होत्या.

“”तात्या हे कामं झालं ना सपनेच्या बापाला मुंबईला पण राहायची गरज नाय पडणार. आमी दोघं मिळून करू. तुमचे हे उपकार मी इसरणार नाय.” हौसाला एकदम भरून आलं. हौसाताई परत असं म्हणली तर मी तुझ्याशी बोलणार नाही.” बाजीराव लटकेच रागात म्हणाला.

होऊ पाहणारी नवीन सुरुवात तिला स्वप्नासारखी वाटू लागली. आता फक्त तिला काळजी होती. रंग्या तिला परवानगी देतो की नाही. खूप रात्र झाली होती भागीरथी ताईंनी हौसाला जेवायचा आग्रह केला. सपनी आणि हौसा दोघीजणी जेवून त्यांच्या घराकडे गेल्या. पुढे मात्र वेगळंच काहीतरी वाढून ठेवलं होतं.

क्रमश……

1 thought on “सपान |Dream part 10”

Leave a Comment