मला बऱ्याच मित्र मैत्रिणींनी ऑस्ट्रेलियामध्ये इंडियन लोकांना कशी वागणूक दिली जाते याबद्दल विचारले आहे.( Indian people in Australia )
सॉरी उत्तर द्यायला जरा उशीरच झाला.तर आता इंडिया मधून आलेल्या लोकांना ऑस्ट्रेलियामध्ये कशी वागणूक दिली जाते हे सांगायचे झाले तर प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकतो.
माझा अनुभव सांगायचा झाला Australia मधली लोकं खूपच cool आहेत. त्यांना कुणाचं घेणं देणं नसतं. कोण काय खातो कोण काय घालतो कोण कसं बोलतं कोणाचा नवरा कसा दिसतो कोणाची बायको कशी दिसते कोण गोरा आहे कोण काळा आहे याच्याशी त्यांना काहीही घेणेदेणे नसते ते आपापल्या मस्तीत जगत असतात. अगदी उंदराचे पिल्लू दिसलं तरी so cute म्हणणारे हे लोक आहेत.
कोणाचेही कौतुक करण्याचे कसब मात्र यांच्याकडूनच शिकावे. थंडी वाजली तर एकावर एक चार स्वेटर घालून फिरतील पण तेच गरम झाले की शर्टही न घालता नुसत्या बर्मुडावर फिरतात अगदी न लाजता. त्यांना जे कम्फर्टेबल वाटतात ते ते घालतात मग ते कुणाचाही विचार करत नाहीत. अगदी बायकाही खूप कमी कपडे घालतात.नवीन नवीन मलाही ते पाहताना कसे तरीच वाटायचे.
नंतर हळूहळू कळायला लागले. ऑक्टोबर ते जानेवारी खूप कडक उन्हाळा असतो. टेंपरेचर कधीकधी 47 48 सेल्सिअस वर जाते. त्यामुळे खूप गरम होते म्हणून इथल्या बायका उन्हाळ्यामध्ये खूप कमी कपडे अंगावर घालतात. आपल्या इकडे कितीही कडक उन्हाळा असला तरी फुल जीन्स आणि शर्ट घालतो अगदी कंफर्टेबल नसले तरी आपण घालतोच. आणि चुकून कोणी बरमुडा शर्टवर कामावर आले तर बापरे काहीतरी घोर महापाप केल्यासारखे त्याला सुनावले जाते इथल्या लोकांचे मात्र तसं नाही जे तुम्हाला कम्फर्टेबल आहे ते तुम्ही घाला मग तुम्ही ऑफिसमध्ये काम करा नाहीतर बाहेर.
तर आता मूळ मुद्द्यावर येते Australian लोकं इंडियन लोकांना अजिबात त्रास देत नाहीत इंडिया मध्ये बऱ्याच वर्तमानपत्रांमध्ये आज गोऱ्या लोकांनी ह्या इंडियन ला त्रास दिला त्या इंडियनला त्रास दिलाअसे काही बाही वाचायला मिळते. पण तो त्रास का दिला हे पूर्णपणे सांगितले जात नाही.
माझ्या बारा वर्षाच्या अनुभवानुसार.. मला आजवर एकही ऑस्ट्रेलियन माणूस असा भेटलेला नाही की त्याने माझ्याकडे तुच्छतेने पाहिले आहे. जगा आणि जगू द्या हे इथल्या लोकांचे ब्रीदवाक्य आहे. आपण जर सकाळी सकाळी बाहेर निघालो तर आपण कधीही न पाहिलेले किंवा अनोळखी लोकही आपल्याला गुड मॉर्निंग म्हणून छान स्माईल देतात तेच मात्र त्यांच्या घराशेजारी कुणाचे घर आहे ते त्यांना ठाऊक नसते. कारण ते कुणाच्या फंदातच पडत नाहीत.जर त्यांच्या वाकड्यात कोणी गेलं नाही तर तेही कुणाच्या वाकड्यात सहसा जात नाहीत.
कधी कधी साड्या घातलेल्या बायका जर त्यांना दिसल्या तर अगदी परग्रहावरून आल्यासारखे आश्चर्याने पाहून यू लुकिंग सो ब्युटीफूल असं म्हणायलाही ते विसरत नाहीत.कुठल्याही कामानिमित्त जर आपण बाहेर गेलो तर आपण इंडियन आहोत म्हणून सगळ्यात शेवटी ठेवतात आणि ऑस्ट्रेलियन लोकांना अगोदर नंबर दिला जातो असे अजिबातही नाही.
ऑस्ट्रेलिया हा खूपच मल्टीकल्चर देश आहे. खूप देशातील लोक येथे एकत्र राहतात. त्यांच्या मते इंडियन लोक ही खूप हुशार असतात. कारण वरच्या हुद्द्यावर इथे सगळे इंडियन लोकच काम करतात.ऑस्ट्रेलियन मुलं त्यांच्या मुलावर अजिबात दबाव टाकत नाहीत. जे शिकायचे आहे ते शिकतात जिथे जॉब करायचा आहे तिथेच त्यांची मुले जॉब करतात.मुलगा मुलगी नववी दहावीला गेले की सॅटर्डे संडे सुट्टी मध्ये पंप’ मॅकडोनाल्ड, रेड रूस्टर, पिझ्झा हट अशा ठिकाणी काम करतातआणि त्यातून ते त्यांचा खर्च चालवतात. आई बाप कितीही श्रीमंत असले तरी आपला मुलगा मुलगी सॅटर्डे ,संडे कामाला जातो याची त्यांना अजिबातही लाज वाटत नाही. येथे मुलांसाठी काही कमवून ठेवायची पद्धत अजिबात नाही. आई वडील त्यांचे ते कमावतात आणि त्यांचे ते खर्च करतात.
मुलं मोठी झाल्यानंतर त्यांनी त्यांचे करिअर आणि घर किंवा घर खर्च स्वतः चालवतात. इथली मुलं इंडियन मुलांच्या कम्पेअर लवकर स्वावलंबी होतात.डॉक्टरचा मुलगा क्लीनर होतो क्लीनर चा मुलगा डॉक्टर होतो मिलेनियर ची मुलं मॅकडोनाल्ड मध्ये काम करतात. कितीही श्रीमंत माणूस असला तरी त्याची गाडी तोच चालवतो ड्रायव्हर ठेवायच्या फंदात कोणीच पडत नाही. अगदी मंत्री असला तरी. इथे ना फरशी पुसायला बाई येते ना स्वयंपाकाला बाई येते. त्यामुळे इथल्या बायका फिजिकली फिट आहेत.रेल्वे स्टेशनवर एखादी ज्यूस ची बाटली घ्यायची असेल आणि त्यासाठी 50 सेंट जर कमी पडत असतील तर आजूबाजूला कोणाकडेही मागायला ते लाजत नाहीत मग तो सूट घातलेला माणूस असो नाहीतर साधा माणूस असो. आणि बाकीचे हे लोक त्यांच्याकडे जर 50cent असतील तर ते पटकन काढून देतात.खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा अशी पद्धत इथे अजिबातच बघायला मिळत नाही. ते जसे आहेत तसे स्वतःला प्रेझेंट करतात.
आठवडाभर जेवढे कमवतात तेवढे वीकेंडला ते घालवतात सेविंग करायच्या जास्त फंदात ते पडत नाहीत. त्यामुळे फारशा लोकांकडे स्वतःची घरेही नसतात ऑस्ट्रेलियामध्ये इंडियन लोकांनी येऊन मोठी मोठी घरे घेतली आहेत आणि ऑस्ट्रेलियन लोकांना भाड्याने दिलेली आहेत.आहे की नाही गंमत.आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोण कसे दिसते याला इथे अजिबातही महत्त्व नाही. हुशारीच्या जोरावर जो पुढे जाईल तो पुढे जाईल. मग तो इंडियन असो नाहीतर ऑस्ट्रेलियन त्यांना काही फरक पडत नाही.हा माझा पर्सनल अनुभव आहे सगळ्यांनाच असे अनुभव येऊ शकतात असे अजिबात नाही.
छानच लिहिलेस. आगे बढो
Thank you.