चारुशीला 26“
अवंतिका ला माहित आहे का समीरबद्दल “ चारुशीला(Charushila)ने पवनला विचारले. “अवंतिका समीरला चांगली ओळखते. समीरच्या आपल्या घरी कायम येणे जाणे होते. मध्यंतरी तो परदेशात गेला होता तेव्हापासून त्याचे येणे जाणे जरा कमी झाले होते. चांगला मुलगा आहे भरपूर शिकलेला आहे. साधा आणि समंजस आहे. अवंतिकाला छान सुखात ठेवेल. पवन ने चारुशीला ला सांगितले.
“ते सगळे ठीक आहे पवन पण अवंतिका ने त्याला पसंत केले पाहिजे ना “ चारुशीला(Charushila)असे म्हणताच पवन म्हटला “तू विचारशील का तुझी तर मैत्रीण आहे ना “ पवन मला वाटतं आपल्या दोघांपेक्षाही बाबांनी विचारलेले जास्त सोयीस्कर राहील. बोलता बोलता घर आलं. दोघेही घरात आले. जानू हॉलमध्ये टीव्ही पाहत बसली होती.
“जानू झोपली नाहीस अजून” अवंतिका ने विचारले. नाही ताई झोपच येत नव्हती. सगळे व्यवस्थित आहे ना. चारुशीलाने डोळ्यानेच खूनवून जाणूला विचारले. जानू ने ही सगळे व्यवस्थित आहे असे सांगितले. पवन तू हो पुढे मी येतेच. असे म्हणून चारुशीला जानूला घेऊन तिच्या खोलीत गेली.
काय जानू चौकशी मोहीम कुठपर्यंत आली. “ताई तुम्ही गेल्यापासून अवंतिका तिच्या रूम मध्येच बसली आहे. तिला मी आग्रह केला होता की आपण बागेत फिरून येऊया. पण ती म्हटली तिचा मूड नाहीये आणि ती तिच्या खोलीतच बसली. बाबा आल्यानंतर मी त्यांना जेवायला दिले तेही जेवून झोपायला गेले आहेत.
खूप छान आहेत स्वभावाने तुझे सासरे माझी चौकशी करत होते पुढे काय शिक्षण घेणार आहेस. काही मदत लागली तर सांग. अरे वा तुझे बाबांबरोबर बोलणे झाले. बरीच धीट आहेस ग तू. असं म्हणून चारुशीला हसली. चल झोप आता सकाळी बोलू.
“ताई आज सुद्धा अवंतिका बाथरूम मध्ये धूर करणार आहे का हे शोधून काढले पाहिजे आणि ती काय करते हे तर आपल्याला कळायलाच हवे.”
“अग पण आपण कसे जाणार तिच्या खोलीत तिने खोली लावून घेतली आहे ना? “ताई तू काही करून थोड्या वेळासाठी तिला तिच्या खोलीच्या बाहेर आन मी हळूच जाऊन तिच्या खोलीच्या खिडकीचि कडी काढून ठेवते म्हणजे आपण बागेतून मागच्या बाजूने जाऊन तिची खिडकी हळूच उघडून आत बघू शकतो. जानू ने चारुशीला ला तिची कल्पना सांगितली.
“मी प्रयत्न करते” चारुशीला एकदम गंभीर आवाजात म्हटली. थांब मी अगोदर माझं सगळं आवरून येते मग आपण बघू. असं म्हणून चारुशीला तिच्या खोलीत आवरण्यासाठी गेली. “ ताई किती उशीर चल ना “ चारूला आलेलं पाहताच जानू म्हटली. जानू हे बघ घरात गोंधळ होईल असं आपण काहीही करायचं नाही लक्षात ठेव. “हो ताई आहे माझ्या लक्षात जानू मान डोलावत म्हणाली.
चारुशीलाने अवंतिकाच्या खोलीचा दरवाजा वाजवला “अवंतिका झोपलीस काय ग? बराच वेळ आतून काही आवाज आला नाही. चारुशीला ने परत मोठ्या मोठ्याने दरवाजा वाजवायला सुरुवात केली. आता मात्र अवंतिकाला दरवाजा उघडणे भाग होते.दरवाजा उघडून बाहेर येत तिने पुन्हा दरवाजा ओढून घेतला.“ काय ग चारू इतक्या रात्रीची का आवाज देतेस. एक ना मला जरा मदत पाहिजे होती. चल ना किचनमध्ये. “आत्ता किचनमध्ये तुम्ही पूजेला गेला तिथून जेवून आलात ना? अवंतिका चिडूनच बोलली. “नाही अगं पवनला थोडा काढा बनवायचा होता. त्याला थोडी सर्दी झाल्यासारखे वाटत आहे. काढा कसा करतात मला माहित नाही मला दाखव ना प्लीज.”
“पवनला ताप वगैरे नाही ना अवंतिका ने काळजीच्या स्वरात विचारले. नाही ग नुसती सर्दी झाल्यासारखे वाटत आहे. चल ना चारुशीलाने अवंतिका चा हात पकडून तिला किचनमध्ये नेले. तोपर्यंत जानू आत जाऊन तिने तिच्या खिडकीची कडी आल्हाद काढून ठेवलीआणि बाथरूमचा दरवाजा उघडून आत पाहिले. आत मध्ये एका घमेल्यात लाकडे पेटवली होती. धमेल्याच्या भोवती तीन-चार बाहुल्या ठेवल्या होत्या. घाबरून तिने बाथरूमचा दरवाजा बंद केला आणि ती अवंतिकाच्या खोलीच्या बाहेर आली.
किचनमध्ये जाऊन तिने चारुशीला ला पाणी प्यायला आले असे सांगितले. आणि डोळ्याने खूनवले की काम झाले आहे. अवंतिका तु जा आता झोपायला काढा उकळेपर्यंत मी थांबते जानू पण आहे माझ्या सोबतीला. असे म्हणून तिने अवंतिकाला पाठवून दिले. जानू ने अवंतिकाच्या खोलीत पाहिलेला सगळा प्रकार चारुशीला सांगितला. ताई आत्ताच्या आत्ता तुझ्या सासऱ्यांना आणि दाजींना घेऊन तिचे काय चालले आहे हे आपल्याला सांगितलेच पाहिजे. तिचे जे चालले आहे ते खूपच भयानक आहे.
थांब जानू उद्या मी गोधू मावशीला भेटायला जाणार आहे त्यांच्याकडून मला बरीचशी माहिती कळेल असे वाटत आहे. काय ते आपण सोक्षमोक्ष लावूनच टाकू. चारुशीला सुद्धा भीती वाटायला लागली होती. दोघीजणी एकमेकींचा हात पकडून अवंतिकाच्या खोलीच्या मागच्या बाजूला गेल्या. जानू हळूहळू पुढे गेली आणि तिने हळूच थोडीशी खिडकी उघडली. “ ताई आत मध्ये दोघीजणी आहेत “ जानू चारुशीलाच्या कानात कुजबुजली.
काय? चारुशीला पण एकदम धक्का बसला. “अगं पण तू अवंतिकाच्या खोलीत गेलीस तेव्हा तुला कोणी दिसले नाही का? चारुशीला ने विचारले. “नाही ताई तेव्हा मला तिच्या खोलीत कोणीच दिसले नाही”. आता मात्र चारुशीला ला काहीच कळेना. तिने जानूला बाजूला सारून खिडकी अजून थोडीशी उघडून आत पाहिले. आत मध्ये एकदम छोटा बल्ब चालू होता त्यामुळे खोलीत बराचसा अंधारच होता.दोघीही पाठमोऱ्या उभ्या असल्यामुळे दुसरी बाई कोण हे तिला ओळखता आले नाही. त्या बाईने बाथरूम मध्ये जाऊन ते घमेले बाहेर आणले. आणि त्या घमेल्या भोवती तीन-चार बाहुल्या ठेवून. काहीतरी मंत्र पुटपुटून त्या घम्याल्यात काहीतरी टाकत होती. अवंतिका खाली डोळे मिटून बसली.
आता मात्र चारुशीला घरात काहीतरी भयंकर चालू आहे याची जाणीव झाली. खिडकीतून बघत असताना तिचा एक हात सटकला आणि खिडकी अजून थोडी उघडून आवाज झाला. अवंतिका ने पटकन मागे वळून पाहिले. चारुशीला आणि जानू दोघेही पळतच तिथून निघाल्या. अवंतिका ने खिडकीतून बाहेर पाहिले अंधार असल्यामुळे तिला कोणीच दिसले नाही.
अवंतिकाला मात्र खिडकी आपण बंद केली होती ती उघडली कशी? नक्कीच आपल्याला कोणीतरी खिडकीतून आत बघत होते याचा तिला संशय आला.
क्रमश…..
खूप छान 👍👍
Thank you रोहिणी.
👍👍
Thank u जयश्री.
सीमा खुप छान उत्कंठा वाढवते आहे तुझी कादंबरी
खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏