चारुशीला 9 | Charushila

चारुशीला-9

रात्रीचे दीड दोन वाजले असतील. चारुशीला (Charushila)ला अचानक जागआली कोणीतरी कुजबुजत असल्याचा आवाज तिला येत होता.

तिच्या खोलीची खिडकी घरामागच्या बागेसमोर येत होती.थंडगार हवा यायची त्यामुळे रात्रीची ती नेहमी खिडकी उघडी ठेवत असे. कुजबुज जरा मोठयानी ऐकू येऊ लागली तशी ती उठून खिडकीजवळ आली. अंधार असल्यामुळे काही दिसत नव्हते. परंतु कोणीतरी दोघीजनी बागेतल्या बेंचवर बसल्याचे तिला खुपच पुसट दिसत होते.

पवन… पवन अशी हाक मारत तिने पवनला उठवले. अरे कोणीतरी बागेत बसले आहे. पवन पटकन उठला. आणि खिडकीबाहेर बघू लागला परंतु त्याला कोणीच दिसत नव्हते.आपण बाहेर जाऊन पाहुयां चारुशीला म्हटली. खरंतर पवनला खूप कंटाळा आला होता. तरीही तो. तिच्याबरोबर बाहेर गेला.

बेंचवर कोणीच नव्हते. “भास झाला असेल तुला ” नाही रे मी स्वतःच्या डोळ्यांनी पहिले. असं म्हणत चारुशीला विचारात पडली. असे कसे झाले. भास तर नक्की नव्हता.दोघे परत खोलीत आले. चारुशीला विचार करता करता झोपी गेली.

सकाळी 6 वाजता पवन कारखान्यात जाण्यासाठी आवरायला लागला. त्याच्या आवाजाने चारुशीला जागी झाली. आंघोळ करून ती किचन मध्ये नाश्ता बनवण्यासाठी गेली तेव्हा रुक्मिणी मावशी पोहे करत होत्या.“सुप्रभात मावशी… पोह्यांचा अगदी छान वास सुटलाय. रुक्मिणी मावशीला तिच्या कौतुकाने खूप छान वाटले.

तिने दूध गरम करायला ठेवले आणि पवन साठी पोह्याची प्लेट भरून टेबलवर नेऊन ठेवली तोपर्यंत पवन आलाच होता. खाऊन झाल्यावर तो कारखान्यात निघून गेला. चारुशीला ला वाटले अवंतिका आणि ती दोघी मिळून सोबत नाश्ता करूया म्हणून ती अवंतिकाला बघायला तिच्या खोलीमध्ये गेली.

ती खोली मध्ये नव्हती. बंगल्याच्या पुढच्या बागेमध्ये अवंतिका बागेला पाणी देत होती. “अवंतिका चल ना आपण दोघे मिळून नाश्ता करूया. थांब आलेच थोडेच राहिले आहे अवंतिका म्हणाली. दोघींनी मिळून नाश्ता केला. रात्री बागेत पाहिलेला प्रकार अवंतिकाला सांगावं की नाही या विचारात होती. तेवढ्यात घरच्या फोनवर पवन चा फोन आला. निवृत्ती राव आणि संपतराव दोन दिवसानंतर परत येणार असल्याचे त्यांनी चारुशीला सांगितले.

“ अवंतिका मला तुला एक सांगायचे होते. मला रात्री आपल्या पाठीमागच्या बागेत. बेंचवर कोणीतरी दोघी बोलताना दिसल्या होत्या.” अवंतिका एकदम चमकली. “अगं कोण कशाला इतक्या रात्रीचे तिथे बसायला येईल. शिवाय बाहेरचे गेट बंदच असते. तुला भास झाला असेल.” आता चारुशीला सुद्धा विचार करायला लागली की नक्की आपल्याला दिसली होते की भास होता.“हो असेल कदाचित “ असं म्हणून चारुशीला किचनमध्ये आवरायला गेली.

दुपारी चारुशीला सुशीला ताईंच्या खोलीमध्ये त्यांचे आवरायला गेली. पाहते तर काय तिथे नर्स नव्हती. पूर्ण खोली विसकटलेली सुशीलाताईंच्या व्हेंटिलेटर ची नळी काढलेली होती. चारुशीला ला एकदम धक्का बसला.

अवंतिका अवंतिका असं म्हणून तिने अवंतिकाला मोठ्याने आवाज द्यायला सुरुवात केली. अवंतिका पळतच सुशिलाताईंच्या खोलीमध्ये आली. “अवंतिका पटकन पवन ला फोन कर. आणि लगेच डॉक्टरांना घेऊन घरी यायला सांग.”अवंतिका पळतच पवनला फोन करण्यासाठी गेली. रुक्मिणी मावशी सुद्धा पळत आल्या. रुक्मिणीने बाथरूम चा दरवाजा उघडला आणि एकदम मोठ्याने कींचाळली.

क्रमश…..

3 thoughts on “चारुशीला 9 | Charushila”

  1. एकाच दिवशी २भाग नाही का टाकू शकत?
    वाचता वाचता link लागते आणि part संपूर्ण जातो. खुप उत्कंठा राहते नवीन भाग वाचायची.
    खुप छान लिखाण सीमा 💐💐💐

    Reply

Leave a Comment