आदर आणि कर्तव्य |Respect and Responsibility

बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो. Respect and responsibility हा विषय समजून घेत नाहीत.

सासु सुने मध्ये , जावा जावा मध्ये ,नणंद भावजय मध्ये दिर भावजय मध्ये ,भावा भावामध्ये एकमेकांविषयी खूपच आदर असत आणि तो असायलाही हवा. पण तो आदर मागून मिळतो का? तर अजिबात नाही तो कमवावा लागतो. नणंदेला जर भावजई कडून आदर हवा असेल तर तीही आपल्यासारखीच लोकांच्या घरून आपल्या भावाच्या घरात आली आहे आणि ती आता ह्या घराचा एक भाग आहे. हे समजून घेतले पाहिजे.

काही ठिकाणी एक भाऊ असतो आणि चार पाच बहिणी असतात. अर्थातच भावजय एकच असणार पण ननंदा मात्र चार-पाच अशा वेळेस आपणच आपल्या वहिनीला समजून घेतले पाहिजे मी म्हणते चार-पाच काय आणि एक काय वहिनी घरात एकटी काम करते आणि आपण माहेरी आलो म्हणून सोफ्यावर किंवा आईबरोबर दिवसभर गप्पा टाकायच्या आणि वहिनी मात्र राबते दिवसभर काही हरकत नाही तुम्ही माहेरी आलात थोडा आराम करा पण त्या बिचाऱ्या भाऊजयीला ही थोडीशी मदत केली तर काही वावगे होणार नाही.

काही ननंदा मात्र वहिनी हे दे वहिनी ते दे दिवसभर चालूच असते. का तर ती माहेरवाशीन असते. अगदी बरोबर पण त्याचबरोबर तुमची वहिनी एक माणूसही असते हेही लक्षात घ्यायला हवे. जितकी काळजी तुम्ही तुमच्या वहिनीची घ्याल. त्यापेक्षा दुप्पट काळजी ती वहिनी तुमची घेईल. काही कमी पडले की वहिनीचं कर्तव्य आहे असं म्हणून मोकळे. अशा वेळेस मला अशा ननंदांना सांगूशी वाटते तुम्ही सुद्धा कुणाच्यातरी वहिनी असाल. जे तुम्ही पेराल तेच उगवेल.

याचा अर्थ असा अजिबात नाही की तुम्ही माहेरी पण या आणि काम करा अगदी छोट्या छोट्या गोष्टींना हातभार लावला तरी त्या वहिनीच्या मनात तुमच्यासाठी प्रेम निर्माण होते. ताई तुम्ही बसा काही करू नका मी सगळं करते असं जरी ती म्हणत असली तरी तिचा सुद्धा जीव असतो. मग तुम्ही चार दिवस या किंवा आठ दिवस या. जर तुम्ही तुमच्या वहिनी ची काळजी घेतली तर वहिनी तुमच्या भावाची आणि आईची खूप काळजी घेईल हे लक्षात ठेवा.

तुम्ही जरी तिची काळजी घेतली नाही तरी ती तिच्या माणसांची काळजी घेतेच पण काय हरकत आहे असे वागले तर. वहिनीने जर आपल्याला चार वेळा फोन केला तर आपण निदान एखादा तरी फोन करावा काय हरकत आहे करायला. पण नाही तिथे सुद्धा काही ननंदांचा एटीट्यूड कामाला येतो. खूप जवळून मी पाहिले आहे.

आणि जाऊबाई म्हणजे तरी काय हो तुमच्यासारखीच तीही सासरी रुळण्याचा प्रयत्न करत असते. जर जावा जावांनी एकमेकींना समजून उमजून घेतले तर गोकुळ म्हणजे तरी काय?याहून काय वेगळं असणार.

सुखदुःखात एकमेकींना साथ द्या. आजारपणात एकमेकींना सांभाळा. एकमेकींच्या मैत्रिणी व्हा.सासू सुनेमध्ये सुद्धा आसच असलं पाहिजे सून आली म्हणून डायरेक्ट खुर्चीवर बसून घेणे कितपत योग्य आहे. प्रत्येक सासूने आपल्या सुनेबरोबर वागताना.. आपल्या मुली बरोबर तिची सासू अशी वागली तर कसे वाटेल हे लक्षात घ्यायला हवे. आपण बायकांनीच एकमेकींना समजून घेतल तर कुणाचीही ताकद नाही बायकांवर अन्याय करायची. आधी तुमची कर्तव्य पूर्ण करा तरच तुम्हाला आदर मिळेल. आदर हा मनाने दिला जातो आणि बळजबरीने तो कधीच खेचून घेता येत नाही. वरवर दिलेला आदर आणि मनापासून दिलेला आदर यात यामध्ये खूप मोठा फरक असतो. हे नेहमी लक्षात ठेवा मैत्रिणींनो तुम्ही त्यांना समजून घ्याल तर त्या तुम्हाला समजून घेतील.

जर तुम्हाला आदर पाहिजे असेल तर पहिल्यांदा तुम्ही तुमची कर्तव्य पूर्ण करायला शिका आदर आपोआप मिळेल.

2 thoughts on “आदर आणि कर्तव्य |Respect and Responsibility”

  1. Give respect….take respect …
    तुम्ही आज जे देणार.. तेच परत मिळणार आहे… काही अपवाद वगळता… कारण… स्वभाव.. पण… प्रेम माया करायला पैसा लागत नाही… फक्त प्रेम च पुरेसे आहे….

    Reply

Leave a Comment